आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं.
तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती. परिचय नव्हता. करुन घ्यावासा वाटत होता पण धीर होत नव्हता. एक दिवस जोरदार पावसाचा मारा छत्रीवर झेलत मी चालत होतो. कोपर्यावर एका बंगल्याच्या आडोशाने ती अंग चोरत उभी होती. तिच्याकडे पाहिले. तिने सुद्धा नजर मिळवली. काय झाले कळले नाही. मी रस्त्याच्या कडेला होत छत्री थोडी बाजूला सरकवली. पटकन ती छत्रीत आली आणि आम्ही चालू लागलो. सुरवातीला असलेला पावलांचा वेगळा ताल केव्हा एकताल झाला ते कळलेच नाही. जणू जन्मांतरीची भेट व्हावी अन सगळं काही परिचित असावं तसंच.
तिच्या सोबत घालवलेला हर एक क्षण रोमरोमात भिनून गेला. तिच्याबरोबर हळु हळू माझा मी बदलत होतो. स्वभावाचे टोकदार कंगोरे कदाचित कमी होत होते. तु बदलला आहेस असं मित्र म्हणत तेव्हा मी हसून उडवून लावायचो. पण एकंदरीत जग कसं सुंदर वाटायला लागलं होतं. सगळं काही तेच होतं. माझी नजर बदलली होती. तेच आकाश, तेच ढग, तीच नदी, तेच तळे, तोच गाव, तेच रस्ते, सर्व काही तेच. पण आता सर्व हवेहवेसे आणि नवेनवेसे वाटत होतं. चर्चा वादविवाद यांचा कंटाळा आला होता. बास ! ती आहे आणि मी आहे. याशिवाय बाकी काही नको.
कधी कधी मनात विचार यायचा ती नव्हती तेव्हा कसं होतं आयुष्य ! आणि आता ती आहे तेव्हा त्या आयुष्यात काय कमी होतं त्याची जाणीव होत होती. उगाच भटकणं, तंद्री लावून विचारात गुरफटणं, अकारण दारु पिणं, सिगारेटी फुंकणं अचानक कमी झालं. का कोण जाणे तिने कधी हे करु नको ते करु नको असं म्हटलं नाही, पण बदल झाला.
असंच आयुष्य एकमेकांना साथ देत जगायचं ही शपथ घेतली होती. शपथ मोडण्याचा कधी प्रसंग आलाच नाही. हातात हात मिसळून आयुष्यातील सुख दु:खांना सामोरं जायचं ठरवलं खरं. पण माझ्या आयुष्यातील दु:खांचा जाब विचारायला आणि रदबदली करुन सुख मिळावं म्हणून याचना करायला नक्षत्रांच्या गावाला न सांगता निघून गेली. लख्ख चांदणं पडलं की त्या चांदण्यामधे तिचा चेहरा दिसतो. तेच ते हलके स्मित आणि केव्हाही झर झर वाहू लागतील असे टपोरे डोळे. त्यांच्याकडे पहातांना उरातील क्षोम झाकावाच लागतो तरी तिला ते कळतंच आणि एक अश्रू सर्रकन तिच्या गालावरुन ओघळतोच. चमचम करत विझून जातो.
काळेकुट्ट ढग भरुन येतात तेव्हा तिच्या काळ्याभोर केसांची आठवण येते. मन पुन्हा पुन्हा बावरतं आणि जिकडे तिकडे तिचाच भास होऊ लागतो. तिच्याशिवाय जगणं भाग आहे पण तिच्याशिवाय जगणं अवघड आहे. सुरेल महफिल चालू असतांना अचानक तंबोर्याच्या तारा तुटाव्या आणि सगळं शांत शांत व्हावं. कोपर्यातल्या घड्याळाचा टीक टीक जीवघेणा आवाज येत रहावा आणि गायकाने महफिलीतून निघून जावे. अभागी श्रोत्याच्या नशीबी फक्त रिकामा रंगमंच आणि लोंबकणार्या तारांचा तंबोरा पहाण्याचे भाग्य असावे.
आयुष्यात सर्व काही मनासारखं होत नाही पण जे झाले त्याची आठवण गोंजारत जगणे भाग असते. जेव्हा जेव्हा आठवणींचा पूर व्याकूळ करतो तेव्हा दोन्ही हात वर करत एखाद्या डोंगराच्या माथ्यावर उभे राहून फक्त हेच सुर येतात "तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है , जहाँ भी जाऊ ये लगता हैं तेरी महफ़िल है "
वाचने
8438
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम...
अतिशय सुरेख प्रकटन...
जबरदस्त
+१
In reply to जबरदस्त by sneharani
+१
In reply to जबरदस्त by sneharani
आवडले...
(No subject)
:)
नाही....
In reply to :) by पैसा
छान शेवटचा पँरा आवडला
हं .. अजून एक !
(No subject)
ह्म्म्म्म्म
आवडलं!
(No subject)
मस्त ......
मस्त
(No subject)
सुंदर प्रकटन...
हळुवार
ए! नाना!
नान्या, भारी!!
लै भारी नान्या!!
त्या नान्याला धरुन बदडा रे
सुंदर
सुरेख !!
!
तू नहीं तो जिन्दगी में और क्या रह जाएगा ?? ...
(No subject)
मस्त रे नाना.
चांगलय...
तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल ह्ये !!
ह्ये ह्ये ह्ये
In reply to तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल ह्ये !! by जेनी...
मस्त
काटा आला वाचताना. प्रेमभंगाचे
+१ -१
In reply to काटा आला वाचताना. प्रेमभंगाचे by मृत्युन्जय
दु:खी मनाच्या व्याकूळ
काय बोलु?
जबरदस्त
वो जब याद आये बहुत याद आये.....
नाना..
नान्या किधर है रे तू?
असंच म्हणतो...
In reply to नान्या किधर है रे तू? by विजुभाऊ
+++
In reply to असंच म्हणतो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com+१
In reply to असंच म्हणतो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या आयडी ला पंख लावलेत का ही
In reply to असंच म्हणतो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंच माहिती नाही का?
In reply to या आयडी ला पंख लावलेत का ही by अनुप ढेरे
जाने कहां गये वो दिन..
In reply to नान्या किधर है रे तू? by विजुभाऊ
काय शिंची कटकट आहे! उगीच