काही विषय लिहायचे राहून जातात. विदर्भात होणार्या शेतकरी आत्महत्यांबाबत मी एक अभ्यास टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसाठी केला होता. सोबत अंजली पवार ही कार्यकर्ती मैत्रीण होती. ज्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकर्यांच्या विधवांची सद्य:स्थिती,
असा विषय होता. सुमारे ७५ डिप केसस्टडीज केल्या. या अभ्यासात आम्ही विदर्भातले ५ जिल्हे खेडोपाडी विभागून फिरलो. दोघी एकेकट्या फिरत होतो. यात काही अत्यंत विपरित अनुभव वाट्याला आले. आज त्यापैकी एक सांगते आहे.
काही भागांत आत्महत्यांचे प्रमाण खूपच जास्त होते. एकेका लहानशा गावात १२ ते १६ आत्महत्या झालेल्या होत्या. सरकारने मदतीसाठी पात्र ठरवलेल्या व्यक्तींनाच आम्ही भेटणार होतो, ही एक चौकट असली, तरी संख्या अमाप होती. निवड कशी करावी याचे निकष नव्हते. अधिकाधिक गावांमध्ये जाऊन परिस्थिती पहावी आणि प्रत्येक गावातील एक वा दोन केसेस निवडाव्यात असे ठरले. यानंतर आम्हांला या स्त्रियांसाठी प्रत्यक्ष काय उपक्रम राबवता येतील, याविषयी अभ्यास मांडायचा होता.
त्या भागातील तहसीलदारांना भेटून याद्या मिळवणे आणि मग प्रवास आखणे सुरू झाले. त्यात काही जुन्या केसेस होत्या. त्या बायका माहेरी निघून गेल्या, गावात राहत नाहीत ( कुठे गेल्या माहीत नाही), क्वचित कुणा तरुण मुलीचा पुनर्विवाह झाला असे समजायचे. चार-आठ तास पायपीट करून त्या गावातून परत यावे लागायचे. त्यामुळे काही जागी आम्ही स्थानिक कार्यकर्ते मदतीला येतील का पाहत होतो, ज्यांच्याकडे थेट माहिती असते.
एका कार्यकर्त्यांना मी भेटले. कामाच्या वेळी मी माझी लेखिका इत्यादी ओळख पूर्ण बाजूला ठेवत असते. त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. अत्यंत उद्धट, मग्रुरीने ते बोलत होते. रेडलाईट एरियातले भडवेही सभ्य वाटावेत. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले,"यादी आमच्याकडेही आहे. कोणत्या बायकांना भेटायचे ते मी सांगू शकतो. तुम्हांला कोणत्या कॅटॅगिरीतल्या बायका पाहिजेत ते सांगा."
मी भांबावले. म्हटलं,"कॅटॅगिरी अशी काही नाही. पण चार-पाच वर्षांपूर्वीची केस असेल तर त्या बाईची काही ना काही व्यवस्था झालेली असते. मला या एक-दोन वर्षांतल्या केसेस सांगा.आणि ज्यांना लहान मुले आहेत, मदतीची जास्तीत जास्त गरज आहे, त्या सांगा."
ते हसत हसत उत्तरले,"म्हणजे तुम्हांला 'ताज्या विधवा' पाहिजेत तर!"
माझा चेहरा एकदम कसनुसा झाला. स्त्रीत्वाचा हा अपमान पाहून डोळ्यांत पाणी आलं.
मी लेखनात शिव्यांचा, अपशब्दांचा अनेकदा प्रासंगिक वापर करते; त्यामुळे लेखन अश्लील बनते, असा अनेकांचा आक्षेप असतो. पण 'अस्सल अश्लील भाषा' म्हणजे काय असू शकते, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
मी शांत राहण्याचा प्रयत्न करत त्यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. तेवढ्यात एका मोठ्या हिंदी / इंग्लीश न्यूज चॅनलची ओबीव्हॅन बाहेर येऊन थांबली.
ते गृहस्थ लगेच मला म्हणाले,"ए पोरी, आता मला वेळ नाहीये तू जा."
मी म्हटलं,"मला तुमच्याकडच्या या दोन फाइल्स बघायच्या आहेत. मी इथेच कोपर्यात बसून त्या बघून घेते. तुमचं काम संपलं की तुम्ही मला हवीये ती माहिती सांगा. रात्र झाली तरी थांबेन. पण उद्या तुम्ही नागपूरला जाणार आहात तर पुन्हा कधी न् कसे भेटाल?"
त्यांनी गुरगुरत होकार दिला. आत्महत्यांच्या केसेसच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या, लेख यांच्या कात्रणांच्या फाइल्स मी बघत, वाचत एका बाजूला बसले.
माझा एकूण अवतार, भाषा पाहून मला इंग्लीश अजिबात समजत नसावं असं गृहित धरून त्यांनी चॅनलवाल्यांशी इंग्लीशमध्ये संभाषण सुरू केलं. मीही मान उचलून त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं नाही, पण ऐकत राहिले.
ती माणसं सांगत होती की, "कितीही दिवस थांबायला लागलं तरी चालेल. आम्ही थांबू. आमची सर्व व्यवस्था व्हॅनमध्ये आहे. खेड्यात आमची काहीही अडचण होणार नाही. पण आम्हांला या खेपेला एक 'लाइव्ह आत्महत्या' कव्हर करायची आहे."
हा या दिवसातला दुसरा धक्का होता. हे कादंबरीत लिहिलं तर किती खोटं, भडक आणि अवास्तव वाटेल... माझ्यातला लेखक जागा होऊन पुटपुटला.
व्यवहार ठरवून ते लोक गेले.
दोन दिवसांतच मी बसमधून जात असताना एक रडवेला माणूस बसमध्ये चढला. कुणी ओळखीच्यानं त्याला विचारलं, तर म्हणाला,"शेजारचा पोरगा बापासह शेताकडे निघाला होता. सोबत वासरू होतं. मध्येच ते वासरू दावं सोडून पळालं आणि दुसर्याच कुणाच्या शेतात घुसलं. मुलगा त्याच्यामागे पळाला. वासरू बिनकाठाच्या विहिरीत पडणार हे पाहून मुलगा त्याला धरायला गेला आणि घसरून वासरासह विहिरीत पडला. एकुलता मुलगा होता. त्याच्या बहिणीला बोलवायला मी जातोय."
दुसर्या दिवशी पेपरमध्ये ही बातमी अपघात म्हणून होती. तिसर्या दिवशी दुरुस्तीसह आत्महत्या म्हणून होती. हे सर्व त्या गृहस्थांचे प्रताप असणार असं मनात येऊन मी मुंबईतील एका मीडियावाल्या मैत्रिणीला फोन करून त्या चॅनलबाबत विचारलं, तर तिनं सांगितलं की," त्यांची ब्रेकिंग न्यूज खळबळजनक ठरली आहे. विहिरीत कॅमेरे सोडून त्यांनी शूट केलंय. त्यांनी हे कसं जमवलं याचाच आम्ही विचार करतोय."
वाचने
7542
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिपली
+१ हेच आल मनात
In reply to पिपली by श्रावण मोडक
माफ करा
अहवाल उपलब्ध आहे
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे, याच अपेक्षेने लेख
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
किमान
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
भीषण दिसतंय सगळंच...लाईव्ह
लेख वाचून खूप वाईट वाटले...!
आयाम...
तपशीलांना काहीच अर्थ नाही.
In reply to आयाम... by नीलकांत
ताज्या विधवा.... काय म्हणाव
काय म्हणाव या
In reply to ताज्या विधवा.... काय म्हणाव by स्पंदना
भयानक!!!
भयानक!
किंचीत असहमत
In reply to भयानक! by पैसा
असहमतीशी सहमत
In reply to किंचीत असहमत by सहज
-१/+१
In reply to असहमतीशी सहमत by पैसा
काय प्रतिसाद द्यावा हेच समजत
बापरे!
सर्व रोगाचे कारण,
"विहिरीत कॅमेरे सोडून त्यांनी