मिपावर सध्या द.भारतीय पदार्थ फेस्टिवल चालू आहे की काय वाटलं (मागच्या दोनही इडली पाकृ पाहून) म्हणून मग म्हंटलं आपणही एक द.भारतीय पाकृ टाकावी :)
दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी गेलेलो असतांना तिथल्या प्रत्येक ठिकाणी 'राईस-प्लेट' मध्ये कोबीची एक वेगळ्या प्रकारची भाजी (साइड डीश) खाण्यात आली आणि आवडली. एकदा तशी भाजी करावी म्हणून जरा आंतरजालावर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला , फार काही माहिती मिळाली नाही पण जे काही मिळाले आणि जी काही चव आठवणीत होती त्याला समोर ठेवून तशीच भाजी बनवण्याचा एक प्रयत्न केला आणि सुदैवाने तो सफल झाला :) .
मिळालेल्या माहिती नुसार त्याला पोरीयाल (Poriyal) म्हणतात असे समजले, माझी हि माहिती चुकीची असल्यास कृपया निदर्शनास आणावे. माहिती अपुरी किंवा चुकीची हे तुम्ही सांगालच पण एक नक्की कि ज्यांना कोबी आवडत नाही किंवा कोबी खाऊन खाऊन कंटाळा आलाय त्यांनी जरूर हे करून पहावे, कदाचित कोबीची ही अशी भाजी आवडेल :)
साहित्य :
कोबी - १ मोठी वाटी बारीक किसलेला
ओले खोबरे - अर्धी वाटी बारीक किसलेले
उडीद डाळ(पांढरी) - १ टे.स्पून
लाल सुक्या मिरच्या - २
तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, मीठ, साखर - गरजेनुसार / आवडीप्रमाणे
कृती :
१. फोडणीसाठी तेल घेऊन ते व्यवस्थित तापले की लगेच उडदाची डाळ टाकून ती व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून/परतून घ्यावी. (हवे असल्यास आता मोहरी वा जिरं हि टाकू शकता. डाळ पूर्ण तळल्या/भाजल्या नंतर मोहरी-जिरं टाकल्याने ते जळण्याची शक्यता कमी असते ).
२. डाळ व्यवस्थित परतली कि लगेच त्यात कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग हे फोडणीस टाकून मंद आचेवर परतून घ्यावे.
३. किसलेला कोबी आता ह्या फोडणीत टाकावा आणि मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यावे. झाकण ठेऊन मंद आचेवर कोबी ५ मिनिटे शिजू द्यावा.
४. कोबी शिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ-साखर आणि त्याचबरोबर किसलेले ओले खोबरे व चिरलेली कोथिंबीर घालावी व व्यवस्थित परतून पुन्हा मंद आचेवर साधारण २-३ मिनिटे शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करून ५-७ मिनिटे झाकण तसेच ठेवून भाजी शिजू द्यावी.
५. आवडत असल्यास कोथिंबीर व ओले खोबरे वरून पेरावे/भुरभुरावे. अश्या प्रकारे कोबी-पोरीयाल खाण्यासाठी तयार :)
उडीद डाळीचा खमंगपणा आणि ओल्या खोबऱ्याचा 'क्रिमीनेस' ह्यामुळे भाजी खूपच चवदार बनते, थोडक्यात नेहमीच्या कोबीच्या भाजी पेक्षा एकदम वेगळी.
टिप :
हि भाजी एक साइड डीश आहे त्यामुळे हि भाजी एखाद्या पातळ भाजी बरोबर जास्तं चांगली लागते. फक्तं 'हीच' भाजी आणि पोळी कदाचित जरा 'बोरिंग' किंवा खूप कोरडे-कोरडे वाटू शकेल. पण साइड डीश म्हणून कोशिंबीर, रायते, चटणी ह्यापेक्षा जरा वेगळा प्रकार म्हणून हे नक्की करून बघा :)
वाचने
14438
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. पण कोबी किसलेलाच हवा का?
छान. पण कोबी किसलेलाच हवा
In reply to छान. पण कोबी किसलेलाच हवा का? by शिल्पा ब
कोबी किसलेलाच हवा असे काही
In reply to छान. पण कोबी किसलेलाच हवा का? by शिल्पा ब
हो !
In reply to छान. पण कोबी किसलेलाच हवा का? by शिल्पा ब
??
In reply to हो ! by परिकथेतील राजकुमार
भले मग सालं निघाली तरी चालेल
In reply to हो ! by परिकथेतील राजकुमार
पोरी याल @भले मग सालं
In reply to भले मग सालं निघाली तरी चालेल by बॅटमॅन
परा- "म्हणे" म्हणलास हे बरे केलेस.
In reply to हो ! by परिकथेतील राजकुमार
छान पाककृती आहे ,आवड्ली करुन
पोरियाल म्हणजे
या वीकांताला जावेच कुठे तरी
In reply to पोरियाल म्हणजे by चैतन्य दीक्षित
धन्यवाद चैतन्य अधिक
In reply to पोरियाल म्हणजे by चैतन्य दीक्षित
चैतन्य दिक्षित
In reply to पोरियाल म्हणजे by चैतन्य दीक्षित
येस्स, अवियल
In reply to चैतन्य दिक्षित by स्पंदना
अवियल चा शोध भीमाने लावला
In reply to येस्स, अवियल by चैतन्य दीक्षित
मस्त आहे
छान...ही कृती पाहिजेच होती.
धन्यवाद गवि आणि हो, तुम्ही
In reply to छान...ही कृती पाहिजेच होती. by गवि
कोबी नारळाच्या दुधातच शिजू
नारळ खोवणं वगैरेचा व्याप होतो
In reply to कोबी नारळाच्या दुधातच शिजू by कवितानागेश
हुम्म्म...
मदत करा.
फक्त जिरे, आले, टोमॅटो,
In reply to मदत करा. by रेवती
नाहीतर फक्त शेझवान सॉस घाल.
In reply to फक्त जिरे, आले, टोमॅटो, by कवितानागेश
मला अशी आवडते.
In reply to नाहीतर फक्त शेझवान सॉस घाल. by रेवती
अगदी अश्याच प्रकारे मी करते
In reply to मला अशी आवडते. by प्रभाकर पेठकर
तुम्ही कोबीची पीठ पेरून केली
In reply to अगदी अश्याच प्रकारे मी करते by रेवती
पीठ पेरलेली को. भा. हा नवीनच
In reply to तुम्ही कोबीची पीठ पेरून केली by उदय के'सागर
पोरीयालची पाकृ
@पोरीयाल कोबिची भाजी....
पोरीयल - कोणतीही सुकी भाजी
सोपी आणि मस्त!
मस्त
पचडी ?