मी माऊ. मी फार फार हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे मी प्रचंड लाडावून ठेवलेली आहे.
कुणी म्हणून काय विचारता? मी स्वत: मी इतकी स्वयंपूर्ण आहे की माझे लाड मी स्वत:च करत राहते. सतत मी फक्त माझेच लाड करते आणि माझेच गुणगान गाते.आता ज्यांना मुळात गाणंच समजत नाही त्यांना माझे गाणं बेसूरच वाटतं. जाऊ दे.
तसे माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी राहतात. पण माझी बातच काही वेगळी. मी काही कुठल्या इतर तुच्छ प्राण्यांकडे लक्ष देत नाही. मी आपली स्वत:च्याच आनंदात मग्न घुर्र घुर्र करत बसते.
काही प्राण्यांना कळते काहींना नाही. त्यांना मी पुन्हा तीच घुर्र घुर्र ऐकवते. शेवटी त्यांना मी काय बोलतेय ते कळतेच. आहेच मुळी मी तशी हुश्शार!
मला माझा आवाज ऐकायला फार फार आवडतो. आणि इतर कुणाचाच बिलकुल आवडत नाही. कुणी येऊन माझ्या जवळ उगीच काहीतरी बोलले तर मी सरळ एक फटका ठेऊन देते. माझ्या प्रेमळ स्वभावाचा फार गैरफायदा घेतात नाहीतर लोक!
घरात मी सगळ्यात उंच ठिकाणी आपली आपणच जाऊन चढून बसते. तिथून सगळे इटुकले पिटुकले दिसतात. मन फार फार आनंदी आणि समाधानी होते. मी डोळे मिटून स्वस्थ बसून राहते. कशाचीही फिकीर बाळगत नाही. वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही.मग सगळेजण कौतुकानी म्हणतात, 'ऐट बघा महाराणीची! '
मला एरवी काही ना काहीतरी खाऊ खात राहायला फार फार आवडते. पण माझ्या घरातल्या बायका त्याबद्दल काहीबाही बोलत राहतात, 'जंत झालेत मेलीला, औषध द्यायला हवे!'
पण मी मात्र मला आवडते तेच करत राहते. त्यांना वेड्यांना कळत नाही माझे कसे सगळे बरोब्बर होत असते ते.
इथे आजूबाजूचे काही प्राणी उगीचच मला त्रास देतात. त्यांना वेड्यांना असे वाटत असते की घरातल्या बायकांनी दिल्याशिवाय आपल्याला काही खाऊ मिळणार नाही. मी मात्र मला हवे तेंव्हा हवे ते घेते आणि मजेत राहते. ते माझ्यासारखे स्वयंपूर्ण नाहीत. म्हणूनच असे गुलामगिरीत खितपत पडतात.
तसे बाहेरही काही प्राणी एकेकटेच आहेत. त्यांना वाटते आपण आपली आपण शिकार करून राहतो , म्हणजे आपण फार फार हुशार झालो. माजोरडे मेले!
असले अहंकारी प्राणी मला बिलकुलच आवडत नाहीत. मी त्याना माझ्या जवळपास थाराच देत नाही मुळी.
या सगळ्याच प्राण्यांना माझ्या वागण्याचे फार फार आश्चर्य वाटते आणि ते परत परत माझ्याशी काहीतरी बोलायला येत राहतात. मीपण त्यांना मोठ्या मनानी माझ्या गुरगुराटात सामील करून घेते.
कुणाला जर माझे गाणे कळले नाही तर अतिशय उंच स्वरात आणि तीव्र सप्तकात 'म्र्यांव म्र्यांव' करते. माझा तो मधुर आवाज ऐकून अजून खूप प्राणी, माणसे वगरे सगळे जमतात आणि माझ्याकडे कौतुकानी आणि आश्चर्यानी पहात रहातात. ज्यांना त्यातले माधुर्य आणि गांभीर्य कळत नाही असे करंटे जीव मात्र उगीच तक्रारीचा रटाळ सूर लावतात. त्यांना २-४ वेळा नख्या मारल्या कि लगेच त्यांना सगळे काही कळते. माझी पद्धतच अशी लोकविलक्षण आहे!
त्या समोरच्या बोळात एकदा मी अशीच फिरत फिरत गेले होते. तर समोरून एक अवाढव्य गलिच्छ प्राणी आला. तो त्याच्या लांब नाकातून आवाज काढत होता. त्याचा आवाजही मोठ्या भोन्ग्यासारखा होता. आणि मी माझ्या नेहमीच्याच तीव्र शब्दात कडक समज दिली की असे नाकातून आवाज काढणे योग्य नाही.
त्याला पटले आणि तो हसू लागला. शेवटी आनंदानी हसत तो एकीकडे माझ्याकडे वळून वळून बघत निघून गेला. 'हत्ती.....' का काहीसे नाव होते म्हणे त्याचे.
इथे प्राणी फार दंगा करतात हल्ली. मला तो बिलकुल आवडत नाही. खेळ म्हणजे कसा असावा तर माझ्यासारखा. मी माझ्या स्वत:च्याच शेपटीशी मस्त खेळात बसते, हवे तेंव्हा, कधीही, लहर आली की. उगीच इतर लोकांवर आणि बाहेरच्या फुटकळ वस्तूंवर अवलंबून रहायची सवयच नाही मला मूळी.
स्वत:ची शेपटी अगदी योग्य प्रमाणात पुढे घ्यायची आणि त्याच्याच भोवती गोल गोल फेर्या मारायच्या, तीच पकडायची, तीच चावायची. कित्ती कित्ती मज्जा!
पण हे प्राणी उगीच इकडे तिकडे फिरत बसतात आणि नुसता गोंधळ घालत राहतात. मूर्ख नुसते. परवा तर मला अगदीच दया आली त्यांच्या वेडेपणाची. प्रत्येकाला जावून चावून आले. नंतर सगळ्यांनी माझी माफी मागितली, आणि अशी चूक पुन्हा करणार नाही असे कबूल केले, आणि तेही अगदी कोपरापासून नमस्कार करुन!
आता कळले का तुम्हाला मी कशी लाडावलेली आहे ते.
करणार ना मग माझे लाड?
--तुमची सर्वांची अत्यंत आवडती माऊ
डिस्क्लेमर: हे माझ्या मांजरीचे आत्मवृत्त आहे. याची प्रेरणा मला लोबसांग राम्पांनी लिहिलेल्या त्यांच्या मांजरीच्या आत्मवृत्तावरुन, 'लिविंग विथ द लामा' वरून मिळाली आहे. या बद्दल कुणाला काही शंका असल्यास त्यांनी स्वत: माझ्या माऊशी याबद्दल चर्चा करून खात्री करून घ्यावी. माझी माऊ कधीही कुणाचेही शंकानिरसन अगदी विनामुल्य करून देईल.
वाचने
5967
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक-ठाक...
-
अर्रे वा...
मूळात मांजरीसारख्या
In reply to अर्रे वा... by अर्धवटराव
पाशवी शक्तींनी पाशवी
पाशवी शक्तींनी पाशवी
In reply to पाशवी शक्तींनी पाशवी by बॅटमॅन
आवडलं
हे काये?
या लेखावरुन एका गाण्याची
___/\___ काही रेफरन्सेस लागले
म्यॉव!
In reply to ___/\___ काही रेफरन्सेस लागले by प्यारे१
मांजराचं रुपक वापरुन भारतीय
भारतीय समाजव्यवस्थेवर केलेलं
In reply to मांजराचं रुपक वापरुन भारतीय by गवि
म्याऽऽव!
व्वा...
छान आहे म्याऊ
भारी आहे मनीचे मनोगत
लोंबसंग राम्पा हा एक अचाट
-
मावड्यांच्या डोळ्यातुनच
या निमित्ताने कॅट्स डायरी
अतिशय प्रेरणादायी
आगाउच धन्यवाद.
In reply to अतिशय प्रेरणादायी by मनीषा
बोके असतातच आत्मज्ञानी :)
आवडेश.
हा हा हा...
हा हा. मजेशीर.
मांजरी आवडत नाहीत
एक
एका हरवलेल्या मांजरीची सत्यकथा