साहित्यः
१ वाटी पिवळी मुगाची डाळ धुवून, ३० मिनिटे भिजवणे. प्रेशर कुकरला लावून शिजवून घेणे
२ वाट्या बारीक चिरलेला पालक
१ छोटा कांदा बारिक चिरलेला
१ टोमॅटो बारीक चिरलेला
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
२ लाल सुक्या मिरच्या
कढीपत्ता
१ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हींग
१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१/२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
तेल / साजुक तूप
पाकृ:
एका भांड्यात तेल किंवा तूप गरम करून जीर्याची फोडणी करावी.
जीरे तडतडले की त्यात लाल सुक्या मिरच्या, हींग, कढीपत्ता घालावा.
त्यात बारीक चिरलेला लसूण , आले व हिरव्या मिरच्या घालून परतणे.
आलं + लसणाचा कच्चा वास गेला की त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतणे.
कांदा चांगला परतला की त्यात टोमॅटो घालून तो मऊसर शिजवून घेणे.
आता त्यात बारीक चिरलेला पालक , हळद व मीठ घालून ५ मिनिटे शिजवणे.

त्यात शिजवलेली मुगाची डाळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढणे.
उकळी आली की ५- ७ मिनिटे आणखीन शिजवणे.
लिंबाचा रस घालून मिक्स करणे.

आणखीन लसणाचा स्वाद हवे असल्यास वरुन थोडे अजून चिरलेले लसूण व लाल सुकी मिरचीची फोडणी ओतावी.
ही डाळ तुम्ही जीरा राईस, साधा भात, नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करु शकता.

प्रतिक्रिया
मस्त !!!
अच्छा ? मी तुरडाळीच करते. चला
लेकाच्या हट्टापायी , त्याचा
कुठल्याही डाळीवर लसुण आणि
मस्तच.............नेहमीप्रमाण
श्रावण म्हणून खास शाकाहारी पाकृ
फोटो दिसले नाहीत.
मस्त !!
एकदम मस्त
आता अळुचे फतफते करा
बाकी काही असो हे नाव मात्र
In reply to आता अळुचे फतफते करा by JAGOMOHANPYARE
पहिला फोटू पाहिल्या
अभिनंदन.
झकास !!
दंडवत
परा, पण गोष्ट राहिली लिहायची.
In reply to दंडवत by परिकथेतील राजकुमार
व्हा बाजूला.... आम्हाला सगळं
In reply to परा, पण गोष्ट राहिली लिहायची. by चिंतामणी
गरज नाय !
In reply to परा, पण गोष्ट राहिली लिहायची. by चिंतामणी
डाळ आवडली
झक्कास..
चिगो
In reply to झक्कास.. by चिगो
नेहमीप्रमाणे मस्तच
छान
ग्रेट!
मस्तंच !
सोपी आणि चटकदार रेसिपी..
सोपी आणि चटकदार रेसिपी..
यम्मी! फोटो पाहून सकाळी ९
मस्त!