Skip to main content

लसूणी डाळ पालक

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 26/07/2012 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी पिवळी मुगाची डाळ धुवून, ३० मिनिटे भिजवणे. प्रेशर कुकरला लावून शिजवून घेणे २ वाट्या बारीक चिरलेला पालक १ छोटा कांदा बारिक चिरलेला १ टोमॅटो बारीक चिरलेला २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या २ लाल सुक्या मिरच्या कढीपत्ता १ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हींग १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण १ टीस्पून बारीक चिरलेले आले १/२ टीस्पून हळद १ टेबलस्पून लिंबाचा रस मीठ चवीनुसार तेल / साजुक तूप . पाकृ: एका भांड्यात तेल किंवा तूप गरम करून जीर्‍याची फोडणी करावी. जीरे तडतडले की त्यात लाल सुक्या मिरच्या, हींग, कढीपत्ता घालावा. त्यात बारीक चिरलेला लसूण , आले व हिरव्या मिरच्या घालून परतणे. आलं + लसणाचा कच्चा वास गेला की त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतणे. कांदा चांगला परतला की त्यात टोमॅटो घालून तो मऊसर शिजवून घेणे. आता त्यात बारीक चिरलेला पालक , हळद व मीठ घालून ५ मिनिटे शिजवणे. . त्यात शिजवलेली मुगाची डाळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढणे. उकळी आली की ५- ७ मिनिटे आणखीन शिजवणे. लिंबाचा रस घालून मिक्स करणे. . आणखीन लसणाचा स्वाद हवे असल्यास वरुन थोडे अजून चिरलेले लसूण व लाल सुकी मिरचीची फोडणी ओतावी. ही डाळ तुम्ही जीरा राईस, साधा भात, नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करु शकता. .

वाचने 10212
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

ह्या शनिवारी करुन बघेन....

लेकाच्या हट्टापायी , त्याचा कसला हट्ट माझीच लहानपणीची स्वप्नं त्याच्या नावावर खपवतोय्,असली एक बादली आणली आहे घरी, तेंव्हापासुन रोज साधं वरण , आमटी, कढी सगळे पातळ पदार्थ त्या बादलीतुनच सर्व्ह होतात घरी, आता हा एक प्रकार करुन पाहेन.

कुठल्याही डाळीवर लसुण आणि मिरचीची वरुन दिलेली फोडणी जाम आवडते. त्यामुळे हा प्रकार तर अतिशय आवडला आणि हा माझ्यासाठी तोंपासु आहे.

मस्तच.............नेहमीप्रमाणेच...... बादली आवडली, मी ही घेउन येते एक छोटी बादली, तेवढेच हॉटेलमध्ये जेवल्यासारखे वाटेल..:)

टाकल्याने अनेकांना आनंद झाला असणारच. असो. बाकी नेहमीप्रमाणेच. XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

फोटो दिसले नाहीत... मजकूरही दिसला नाही.. म्हणून जळजळ झाली नाही. :-)

पहिला फोटू पाहिल्या पाहिल्या,एकदम गरमा/गरम भाताबरोबर,पापड/लोणचं घेऊन सुरवात करावी,असं वाटतय. .... बाकी नेहमी प्रमाणे उरलेल्या सर्व गोष्टींसाठी आमचा तुम्हाला विनम्र शॅल्युट.

नेहमी प्रमाणेच, चवदार, टेसदार, खमंग, पौष्टीक, क्षुधावर्धक, यज्ञकर्मातील समिधा..... इ.इ.इ. पाककृती. अभिनंदन.

__/\__ सानिकातैचे घर असावे शेजारी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सानिकातैचे घर असावे शेजारी हे ठिक. पण पुढे रोज रोज शाकाहारी पदार्थच (पनीर आणि मश्रुम सोडुन) बनवावेत. असे लिहून टाक.

In reply to by चिंतामणी

रोज रोज शाकाहारी पदार्थच (पनीर आणि मश्रुम सोडुन) बनवावेत.
सानिकातै बनवणार असेल तर आपण नॉनव्हेज देखील खाऊ.

मलाही कोणत्याही डाळीला लसुणाची फोडणी दिलेली जाम आवडते.

आता इथे पालक शोधणे आले.. ;-)

In reply to by चिगो

तुम्ही तुमच्या पालकांपासुन दुर आहात हे खरे पण नवे पालक शोधणे म्हंजे........

पाककृती मस्तच नेहमीप्रमाणेच.

गरम भात आणि डाळ पालक , अगदी आवडता पदार्थ :)

ती लसूण आणि सुक्या मिरच्यांची फोडणी बघूनच आत्मा थंड झाला...