अनिरुद्ध अभ्यंकरांची 'वय सोळावं सरलं की' ह्या तरल कवितेतल्या भावना साठीच्या 'हिरवट' चष्म्यातून पहायचा एक चाळा! ;)
वय साठावं लागलं की
सगळं 'हिरवट' सुचू लागतं
बसल्याजागी डुलकी घेत
स्वप्नात 'पाखरू' दिसू लागतं
मंडईच्या 'बागे'मध्ये
चाफ़ा केवडा दिसू लागतात
पूजेसाठी फुलं आणायला
'म्हातारे' ही निघू लागतात
न बघता प्रत्येकाच्या
नजरा कुठे कळू लागतं
वय साठावं लागलं की.....
अवसेच्या रातीला
बोचरी अनावर थंडी होते
खोकणार्या म्हातार्याला
भेटायला 'ब्रँडी' येते
'औषधाची' ही भाषा
प्रत्येकजण बोलू लागतं
वय साठावं लागलं की.....
पिरपिरणारा पाऊस अन
करवादणारी 'प्रीत' असते
गवतीचहा, आलं घालून
आता चहाची रीत असते
नाठाळ मन चॅनलवर
'मल्लिका'ला शोधू लागतं
वय साठावं लागलं की.....
पांढरट करड्या केसांमध्ये
'अनुभवाचं' सार असतं
त्या मोत्याच्या नजरबिंदूत
'नायके' काही फार नसतं
'नवं-जुनं' काही बघता
'जस्ट डू इट!' गर्जू लागतं
वय साठावं लागलं की....
चतुरंग
वाचने
4041
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो रंगा !
पांढरट
हा हा हा!!
व्वा!
शौकीन..
In reply to व्वा! by बेसनलाडू
मस्त..
क्या बात है !!!!!!
हम्म..
आवडले
मस्त!
रंगाशेठ
'साठी ' ची