Skip to main content

स्टफ्ड चिकन लॉलिपॉप

स्टफ्ड चिकन लॉलिपॉप

Published on बुधवार, 25/07/2012 प्रकाशित
साहित्यः चिकन विंग्स = १०-१२ (ह्याचे लॉलिपॉप्स करुन घ्यावेत) आले = २ चमचे बारीक चिरलेले लसुण = २ चमचे बारीक चिरलेले हिरवी मिरची = १ बारीक चिरलेली काळि मिरी पावडर = २ चमचे अंडी = २ सोया सॉस = १ चमचा व्हिनेगर = १ चमचा चिली सॉस = १ चमचा कॉर्नफ्लॉवर = ३-४ चमचे तांदुळाचे पीठ = २ चमचे खायचा लाल रंग = १/४ चमचा मिठ चवीनुसार तेल तळण्यासाठी स्टफिंगसाठी : Mozerella cheese = १/२ कप पुदिना = ४-५ पाने बारेक चिरुन काळि मिरी पावडर = १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. चिकन विंग्स स्वच्छ धुवुन घ्यावेत. त्याचे लॉलिपॉप्स करुन घ्यावेत. २. एका बाऊल मधे हे लॉलिपॉप्स घ्यावेत. त्यात २ अंडी, बारीक चिरलेले आले, लसुण व हिरवी मिरची टाकावी. त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, काळि मिरी पावडर व चवीनुसार मिठ टाकावे. हे सर्व निट मिक्स करावे. ३. त्यात कॉर्नफ्लॉवर, तांदुळाचे पीठ व खायचा लाल रंग टाकुन सगळे मिक्स करुन २-३ तास marination साठी ठेवावे. कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण consistency प्रमाणे कमी जास्त करु शकतो. ४. स्टफिंग साठी एका बाऊल मधे Mozerella cheese, पुदिना, काळि मिरी पावडर व चवीप्रमाणे मिठ टाकुन हाताने एकदम मऊ होई पर्यंत मळुन घ्यावे. ५. Marinate केलेला एक लॉलिपॉप घ्यावा. त्यात वरील स्ट्फिंग भरावे व बाजुला ठेवावे. lolly ६. तळण्यासाठी तेल गरम करावे. ह्यात हे स्ट्फ केलेले लॉलोपॉप्स टाकावेत. साधारण पणे ३-४ मिनिटामधे हे शिजतात. चिकन शिजल्यावर ते बाहेर काढावे व गरम गरम serve करावे. टिपः १. चिकन विंग्स चे लॉलिपॉप करण्या साठी आधी त्याचे ३ भाग करुन घ्यावेत.त्यातील २ भागाचे लॉलिपॉप होतात. शेवटच्या भागाचा सुप किंवा स्टॉक करण्यासाठी वापर करु शकतो. २. लॉलिपॉप घरी करता येत नसल्यास चिकन शॉप मधुन करुन घ्यावेत. l2 lol4 lol5

याद्या 11040
प्रतिक्रिया 36

श्रावण संपला कि करून बघेन..

श्रावण संपला कि करून बघेन..

ह्या तैंच्या हाताला एवढी मोठी मेहंदी लागो, कढइला लहानसे होल पडो अनि शेवटी त्या ट्रेलाही एक लहानसा तडा जावो. कमीत कमी हे अत्याचार तर थांबतील.

मस्त ! पण चायनिज वाल्यांकडे जे चिकन लॉलिपॉप असतात ते इतके डार्क लालेलाल का असतात की त्यात कलर घातलेला असतो ?

In reply to by sneharani

सगळ्यांनाच माहित आहे "श्रावण चालू आहे"

In reply to by नाना चेंगट

तसही, सगळी दुनियादेखील चालू आहे, काय म्हणतोस?

In reply to by नाना चेंगट

लई निरागसता डोकावली प्रतिसादातून ;) लई अवांतर करतोस ब्वा तू ;) गप्प बसा आता.

In reply to by sneharani

संपादक झाल्याबद्दल अभिनंदन ! :) धागा टाकू का अभिनंदनाचा?

In reply to by नाना चेंगट

हट ए, उगाच संपादक पद गळ्यात नको टाकू. मी काय संपादक नाहीये करूही नको, तेव्हा अभिनंदनाचे कष्ट वाचले तुमचे :) अवांतर : घालवतोस की काय मला इथून ;)

In reply to by sneharani

>>>अवांतर : घालवतोस की काय मला इथून Wink ऑ ! सदस्य ==> संपादक ==> गच्छंती असा प्रवास असतो की काय ?

श्रावण चालू असल्याने गरीब बिचा-या कोंबड्या जरा मुक्त श्वास घेत होत्या. हे असले पाहून कोणाच्या मनावर परीणाम झाल्यास जबाबदार कोण? आणि त्या कोंबड्यांचे काय? त्यांचा जीव श्रावणातच जाणार. असो. शेवटचा फोटो विषेश कातील आहे.

In reply to by Mrunalini

तुझा मुक्काम परदेशात असतो तो. पण ह्या धाग्याचा आणि विषेशत: फटुंचा परीणाम आमच्या देशात होणार ना. म्हणून म्हणले.

लॉलिपॉप कसले दिसतायेत ...पाहूनचं खावेसे वाटत आहेत गं :) जबरदस्त :)

हंम्म्म! कर बाई कर. अन खा तुच. उद्या शुक्रवार जिवती पुजन, सोमवार. मंगळवार्....नाही . पण एक कर धागा पुन्हा एकदा टाक अमावस्येनंतर. गणपती नंतर.

हं ! दिसतंय छान पण आजकाल असं तळलेलं, तिखट, मसालेदार काही आवडत नाही. कच्च्या भाज्यांच सँडविच वगैरेच बरं वाटतं. असो.

In reply to by शिल्पा ब

अभिनंदन हो...! :) जुलै म्हणून सातवा की श्रावण म्हणून पाचवा ? ;) हलकं घ्यालच. (जड असं पण अलाऊड नसेल नै ;) ) बाकी आम्ही लॉली पॉप खात नाही तरी कढईला भोक पडेल इ.इ.... आहेच.

२० तारखेला मुलाचा वाढदिवस होता म्हणुन करुन पाहिले . फार चविष्ट झाले. नशिबाने एका दुकानात लॉलीपॉप करुन मिळाले. मस्त ! मुलाने तर फक्त तेव्हढेच हादडले बाकीचे पदार्थ तस्सेच राहुन गेले.

In reply to by इरसाल

अहो आमच्या एका अतिशय प्रिय मित्राचा वाढदिवस पण २०लाच आहे. त्यामुळे माझा मुलगा अन तो एकमेकाला फोन करुन "हॅप्पीबर्थडे टु अस " अस गातात. चला आता तुमच्या मुलाची अन भावाची सुद्धा आठवण येइल मला २०ला.

अपडेट केली आहे रेसिपी. करुन झाल्यावर खायच्या आधी दक्षिणेला तोंड करुन नैवेद्य दाखवा. (मी ऑस्ट्रेलियात असते ना म्हणुन)