"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके"
स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला.
अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता.
गायधनी दोशी: "ह्यालो...?"
पलीकडचा आवाज:
"गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. "
क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.)
मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं... आजकाल सगळेच माझा कॉल कट करायला लागलेत!!"
आणि एका वडापाव वॉर ला सुरूवात झाली...
एका बाजूला होते मोहित वडेवाले: पर्वतीमधे मुख्य शाखा असलेलं पुण्याचं एक नंबरचे वडापाव विकणारं उपहारग्रूह. मालक तुळजापुरचा आणी उपहारग्रूहात काम करणारी सगळी मुले तुळजापुरची असल्यामुळे तुळजापुरात एकही शाखा नसताना 'तुळजापुरी' असा शिक्का बसलेलं पुणेरी उपहारग्रूह.
दुसरीकडे होते दोशी वडेवाले: सदाशिव पेठेत मुख्य शाखा असलेलं पुण्याचं दोन नंबरचं वडापाव विकणारं उपहारग्रूह. पुण्यात अधिकाधिक रोजगार निर्माण करणारं उपहारग्रूह. पुण्याच्या बर्याच्श्या विद्यार्थ्यांचे पोटाचे निर्णय वडापाव वर पर्यायाने दोशी वडेवाल्यांवर अवलंबुन होते.
(क्रमशः)
वाचने
5259
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
(No subject)
वाड्याच्या पहिल्या घासातच खतम ?
आन देव, आन देव..
:-D
पहिली ३-४ वाक्ये वाचून
असं नका करु मालक...
ह्याचं नाव
काहीही
उत्तम धागा, या मरजर मध्ये
लय भारी....
पहिल्यांदा वाटले कि काहीतरी
हम्म. पुढील घडामोडी बद्दल
हम्म!
खुसखुशीत
जल्ला हा अन्तु बर्वा मरणाचा
अन्तुजी थोडासा अभ्यास कमी
सगळ्यांना धन्यवाद!
च्यायला !