Skip to main content

दिसतं तसं नसतं

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 21/07/2012 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
देशातील एका थोर नेत्याने राजीनामा दिला आहे आणि दिल्ली धास्तावली आहे. पण राजीनाम्यासाठी दिलेली कारणे वरकरणी असून आतमधे वेगळीच मागणी असण्याची शक्यता वाटते. कुणीतरी भलत्याच गैरसोयीच्या प्रकरणाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. दिल्लीची ही जुनी सवय आहे. कुणी शिर्जोर बनू लागला की त्याची प्रकरणे बाहेर काढ किंवा त्याचा व्हिडीयो प्रसारीत कर. असे चालू असते. मग तो पक्षप्रवक्ता असो की राज्यपाल सर्वांना समान न्याय. हे सारे आम्हास माहीत असल्याने राजीनामा ही आमच्यासाठी फार मोठी बातमी नसून पडद्यामागे काय शिजतय याबाबत खरी उत्सुकता आहे.

वाचने 2212
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मला तर खूप उत्सुकता आहे. अवघे सहा खासदार पण हवा जोरात आहे. बातम्याही जोरदार आहेत. मटा दुवा. 'घड्याळा'चा काटा सरकेना, 'पवार प्ले' संपेना ! मंत्रीपदात काही फेरबदल, काही मोक्याच्या जागा, महाराष्ट्रातील राजकारणात काही दबाव, असं काही असावं. पण, जे चाललं आहे, ते आहे मजेशीर. -दिलीप बिरुटे

In reply to by मदनबाण

हम्म, लवासा, सिंचनावरची श्वेतपत्रिका ही कारणं तर आहेच. अजुनही काही तरी असावं. पवार साहेबांचं बेरजेचं राजकारण असतं. कै तरी नक्कीच दडलं आहे, काय हाती लागेल ते काळच सांगेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पवार साहेबांचं बेरजेचं राजकारण असतं. खरयं... कै तरी नक्कीच दडलं आहे, काय हाती लागेल ते काळच सांगेल. हॅहॅहॅ... ते राष्ट्रवादीच घड्याळ नेहमी वेळ १०.१० दाखवतं ! चावी द्यायची वेळ झाली असेल आता ! ;)

In reply to by मदनबाण

मुख्यमंत्री बदलावं म्हणुन हा दबाव आहे, २०१४ च्या निवडणुकांवर डोळा ठेवुन मिशन राष्ट्रवादीचा प्रवास सुरु झाला असावा- इति पेप्रं. हॅहॅहॅ... ते राष्ट्रवादीच घड्याळ नेहमी वेळ १०.१० दाखवतं ! चावी द्यायची वेळ झाली असेल आता ! राजकारणात मधुन मधुन चाव्या द्याव्याच लागतात घड्याळ असो खुर्ची, फिरवावीच लागते. भाकरी फिरवली नाही तर करपते असे मागे साहेब बोलले होते. काही तरी फिरवाफिरवी आहे. :) -दिलीप बिरुटे [पवार साहेबांचा फ्यान]