साहित्य -- हरबरा डाळ एक वाटी, गुळ बारीक चिरलेला दीड वाटी, जायफळ पुड एक छोटा चमचा,
पारीसाठी साहित्य -- एक वाटी कणीक...चिमूटभर मिठ घालून घट्ट भिजवुन ठेवणे.
कॄती-- प्रथम डाळ शिजवुन घ्या त्यातले पाणी (कट) काढून घ्या,त्यात गुळ घालून पुरण चांगले तयार करुन घ्या ( पुरण शिजल्याची खूण म्हणजे पुरणात जर उलथने मधोमध उभे राहिले तर झाले) त्यात जायफळ पुड घाला,आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या......:) पुरण गार करायला ठेवा.
कणकेची पारी लाटून घ्या त्यात एक ते दीड चमचा पुरण भरुन ती पारी चारी बाजुनी दुमडून घ्या, चौकोनी
घडी करुन घ्या, अशे सर्व दिंड बनवा, एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा....नंतर त्यावर चाळणी ठेवुन त्यात हे सर्व कडबु ठेवा, दहा ते पंधरा मिनिटे वाफ़वुन घ्या....
झाले तय्यार पुरणाचे दिंड.....आता खायला घेताना दिंड मधुनच थोडे फ़ोडा व त्यात भरपुर साजुक तुप घालुन गट्ट्म करा....... :p
टीप -- ह्याच्या जोडीला बटाटा भाजी करतात....एक गोड --एक तिखट..
ह आता तुम्ही म्हणाल फ़ोटू कुठाय....आत्ता दुपारी करणार आहे मी दिंड...त्यावेळी फ़ोटो टाकीनच...:)
वाचने
7695
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहीच... बत्तीस शिराळा इथे
वा, मस्त
आता हे पुरण वाटायचे नाही
पियु- अग हाटणे म्हणजे
In reply to आता हे पुरण वाटायचे नाही by पियुशा
वाहवा....
फोटू कुठायत...?
फोटु बघून प्रतिसाद दिल्या
पुरणाची दिंड
हे घ्या फोटो.....भरपुर खा दिंड!
हे घ्या पुरणाचे दिंड! जरा
वा !
छान फोटू निवेदिताताई.
मस्तच तै
धन्यवाद