Skip to main content

नागपंचमी स्पेशल --- पुरणाचे दिंड ----

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 23/07/2012 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य -- हरबरा डाळ एक वाटी, गुळ बारीक चिरलेला दीड वाटी, जायफळ पुड एक छोटा चमचा, पारीसाठी साहित्य -- एक वाटी कणीक...चिमूटभर मिठ घालून घट्ट भिजवुन ठेवणे. कॄती-- प्रथम डाळ शिजवुन घ्या त्यातले पाणी (कट) काढून घ्या,त्यात गुळ घालून पुरण चांगले तयार करुन घ्या ( पुरण शिजल्याची खूण म्हणजे पुरणात जर उलथने मधोमध उभे राहिले तर झाले) त्यात जायफळ पुड घाला,आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या......:) पुरण गार करायला ठेवा. कणकेची पारी लाटून घ्या त्यात एक ते दीड चमचा पुरण भरुन ती पारी चारी बाजुनी दुमडून घ्या, चौकोनी घडी करुन घ्या, अशे सर्व दिंड बनवा, एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा....नंतर त्यावर चाळणी ठेवुन त्यात हे सर्व कडबु ठेवा, दहा ते पंधरा मिनिटे वाफ़वुन घ्या.... झाले तय्यार पुरणाचे दिंड.....आता खायला घेताना दिंड मधुनच थोडे फ़ोडा व त्यात भरपुर साजुक तुप घालुन गट्ट्म करा....... :p टीप -- ह्याच्या जोडीला बटाटा भाजी करतात....एक गोड --एक तिखट.. ह आता तुम्ही म्हणाल फ़ोटू कुठाय....आत्ता दुपारी करणार आहे मी दिंड...त्यावेळी फ़ोटो टाकीनच...:)

वाचने 7695
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सहीच... बत्तीस शिराळा इथे खुपच मोठ्या प्रमाणावर पुरणाचे दिंड केली जातात. तीन वर्षापूर्वी गेलो होतो कोल्हापुरात, तेव्हा तिथे जाऊन आलो होतो. तेव्हा सर्वप्रथम खाल्ले होते. अप्रतिम लागतात. फोटोची वाट बघतोय :) :)

आज माझ्याही डब्यात आहेत 'पुरणाची दिंडं'..आईनी सकाळीच केलीयेत. मला तर आत्ताच भूक लागली.

आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या...... हे काय समजले नाही हाटुन घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे ?

In reply to by पियुशा

पियु- अग हाटणे म्हणजे पुरणयंत्रातून न काढता रवीने किंवा एखाद्या तांब्याने तळ बाजुने नुसते पुरणावर आपटणे,म्हणजे पुरणातील डाळ ओबडधोबड बारीक होते....:)

आलो की दाबून हाणतोच आता दिंडे.........

पुरणाची दिंड माझा आवडता पदार्थ आहे :) फोटो लवकर टाका निवेदिता ताई :) गेल्या वर्षी मी मिपावर दिंडाची पाकृ दिली होती http://www.misalpav.com/node/18711

छान फोटू निवेदिताताई. सानिकाची पाकृही आठवली. काल परवा अचानक मेंदी काढायला मिळाल्याने खरी नागपंचमी वाटत आहे.

तो ३ नंबरचा फोटो पाहून तों.पा.सुटले... आवडेश... :)

धन्यवाद सगळ्यांना............. :)