जून महिन्यापासून माझा चातुर्मास सुरु होतो. रोजचे काम आटपून घरी जायला उशीर होतो. आहे त्या वेळात जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षकदिनाच्या आसपास व्याख्यानांची मागणी वाढते.मुंबईतल्या अशा एका शाळेत माझा रतीब ठरलेला आहे.गेल्या आठवड्यात मुख्याध्यापकांचा फोन आला तेव्हा मी सवयीनी उत्तर दिलं,
हो लक्षात आहे .सालाबादप्रमाणे यंदाही ....वगैरे वगैरे..
मुख्याध्यापकांनी माझं वाक्य अर्धवट थांबवलं..
फोन त्यासाठी केला नाहीय्ये...तुमच्यासाठी एक भेटवस्तू शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यानी पाठवली आहे ती कशी आणि कुठे पाठवू ?
भेटवस्तू आणि विद्यार्थ्यानी ?
माझी पहिल्यापासून एक सवय आहे मी अशा विद्यार्थ्यानी पाठवलेली वस्तू स्विकारत नाही.
सर हे प्रकरणजरा वेगळं आहे.
म्हणजे? सर आठवतं का तुम्हाला २००० सालच्या बॅचचा तो विद्यार्थी?
नाही बा. मी स्पष्ट कबूली दिली.
सर ती कविता आठवते का?
आता जरा जरा धूसर काहीतरी आठवायला लागलं .खरं सांगायचं तर कविता या प्रकाराच्या वाटेला मी आणि कविता सुद्धा माझ्या वाट्याला जात नाही.कायमचा एक समांतर प्रवास.
तरीपण ही कविता माझ्या डोक्यात बरेच दिवस घर करून छळ करत होती.
ओके. ओके .तो विद्यार्थी?
होय तोच.
मुख्याध्यापकांचा निश्वास फोनवर ऐकू येण्याईतपत मोठा होता.
----------------------------------------------------------------दहावीचा अभ्यास ह्या व्याख्यानाचा शेवट मी करत होतो.
दहा मिनीटे आई वडील यांचा आदर ,कुटुंब आणि त्याची अभ्यासातली आवश्यकता , कौटुबीक सामंजस्य असा काहीसा भाग यात असतो . एक वजन येण्यापलीकडे या मुद्द्याचा फारसा उपयोग नसतो पण आवश्यकता डावलूनही चालत नाही.
सर... एक मिनीट असं काहीसं ओरडत एक विद्यार्थी ताडताड चालत हॉलच्या बाहेर पडला. जाता जाता एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकायला विसरला नाही.
मी कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापकांकडे सहज हा विषय बोललो. ते किंचीत हसले.
"हे अपेक्षीत होतं मला . "हा कागद वाचा. एक मुक्त कविता होती. दहावीच्या विद्यार्थ्याकडून एव्हढी सिरीयस कविता ...
खुळा अश्वत्थामा
कळत नकळत झालात पालक
पालकाचे आता झालात मालक.
वासनेचा रोजचा खेळ
निपचीत पडून वाहिले अंधाराचे बेल.
उपाशी पोटाला शेंगदाण्याचा घास
तरीसुद्धा थांबली नाही भावंडाची रास.
पिंजरा वितांचा झुरळांच्या रिंग मास्तरचा
तोरा मात्र ब्रुनीईच्या सुलतानाचा.
पोटुश्या आईने करपवली ताई
ताई ..छे तीच तर खरी आई.
शपथ तिच्या विझल्या डोळ्याची
वाकल्या कण्याची
संधी मिळता रास ओतीन मोत्यांची
खाल्लात आबांचा रुपया बंदा
राख विझायच्या आत सावकारी दांडा
तुमचे शोक माज मुजोरी
कमी पडली असती कुबेराची तिजोरी.
गुरांना गोचिडाची भिती
आम्ही सुद्धा झेलू
तुमची रक्तपिती.
चारच वर्षे सक्तीची
वाट बघतोय मुक्तीची.
करीन जखमांची ढाल
येईल माझी वेळ
खुळ्या अश्वत्थाम्यासारखे
मागणार नाही तेल.
----------------------------------------------------------------आज मुलगा एका बहुदेशीय कंपनीत इंजीनीयर आहे.
त्या वेळी मी आणि काही इतर मित्रांनी जमा केलेली मदत त्याला किती वर्षं पुरली असेल मला कल्पना नाही.
पण त्याचा मार्ग नक्कीच सुकर झाला असावा.
----------------------------------------------------------------
शैक्षणीक क्षेत्रात सहन करावे लागणारे वार काहीवेळा युद्धात होणार्या जखमांसारखेच
जिव्हारी लागतात.
एक मात्र कळत नाही शिक्षकानी दरवर्षी किती जखमा सहन करायच्या?
वाचने
7978
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली
लेखन आणि
असेच......
In reply to लेखन आणि by विसोबा खेचर
आपण मोठी माणसं समजतो त्यापेक्षा मुलांना
अगदी
In reply to आपण मोठी माणसं समजतो त्यापेक्षा मुलांना by चतुरंग
अस्वस्थ
सहमत आहे..
In reply to अस्वस्थ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to सहमत आहे.. by प्राजु
हेच म्हणतो
In reply to अस्वस्थ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to हेच म्हणतो by बेसनलाडू
+१
In reply to +१ by प्रियाली
अश्वत्थामा
In reply to +१ by धनंजय
हम्म..
In reply to अश्वत्थामा by प्रियाली
पण
In reply to हम्म.. by प्राजु
गडबड गोंधळ
In reply to अश्वत्थामा by प्रियाली
अश्वत्थामा
In reply to +१ by धनंजय
अश्वत्थाम्याचा संदर्भ -
In reply to +१ by धनंजय
नक्की ???
In reply to अश्वत्थाम्याचा संदर्भ - by चतुरंग
मला जर अशी कविता सापडली
In reply to नक्की ??? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
१० वीच्या मुलाचे विचार
In reply to अश्वत्थाम्याचा संदर्भ - by चतुरंग
खुळा अश्त्थामा
भांडवल(?)
In reply to खुळा अश्त्थामा by विनायक प्रभू
भांडवल
खुलाशाबद्दल धन्यवाद
In reply to भांडवल by विनायक प्रभू
विनायकराव,
In reply to भांडवल by विनायक प्रभू
छान
छान
उत्तम लेख ,