चौसष्ट घरांच्या समरांगणी वजीर सर्वात उपद्व्यापी. तो सरळ, तिरका, कसाही चालेल. पण त्याला देखील मर्यादा आहेत. घोड्याप्रमाणे तो अडीच घरं चालु शकत नाहि.
आमचे बारामतीकर काका या वजीराचे देखील बाप म्हणावे लागतील. सगळं काहि सुरळीत असताना शेवटच्या बॉलवर अच्यानक गुगली टाकावी आणि फलंदाज काहि कळायच्या आत बाद व्हावा असल्या भयंकर चाली आमचा राजा खेळतो.
गेल्या दोन दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधुन बाहेर पडण्याच्या बातम्या येत होत्या. आजतर "सकाळ" वर राजीनाम्याची बातमी अधिकृतरित्या पब्लीश झाली. निमीत्त होतं मंत्रीमंडळातील दुसर्या स्थानाच्या वादाचं. पवारांना म्हणे प्रणवदादा गेल्यानंतर मंत्रीमंडळात ते स्थान हवं होतं... पण ते गेलं मॅड्ड्मच्या लाडक्या अँटोनी कडे. पवारांनी तडक आपला राजीनामा सादर केला. कारण दिलय कि पक्षबांधणी करता वेळ द्यायचा आहे. सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे म्हणे.
अर्थात, हि सर्व वरवरची कारणे. असली गोम काय असावी ? पाटबंधारे विभागावर महाराष्ट्र सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे... ते प्रकरण दाबायला हे दबाव तंत्र असावे असा एक युक्तीवाद आहे. पण एव्हढ्या क्षुल्लक कारणासाठी हा चाणक्य राजीनाम्याचे अस्त्र खचितच उपसणार नाहि.
राहुलबाबा सरकारात मोठी भुमीका वठवण्याची तयारी करताहेत. दिल्ली त्यासाठी सज्ज होतेय. एक मेजर गेअर शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा मुहुर्त काढुन पवारांनी हि चाल केली असावी काय?
२०१४ ला प्रधानमंत्री पदाची शेवटची संधी साधायला तिसर्या मोर्च्याची तयारी म्हणुन तर हे सर्व चाललं नसेल?? काहिही असो. आपण हा खेळ कौतुकाने बघत राहावा हेच बरे.
वाचने
4440
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
बारामतीचे काका हे राजकारणातले
कसला
चाणक्य वगैरे अति होतंय!!
In reply to कसला by चिरोटा
कसला माचो आणि कसला चाणक्य?
In reply to चाणक्य वगैरे अति होतंय!! by श्रीरंग
हाहाहाहा!!
In reply to कसला माचो आणि कसला चाणक्य? by पक पक पक
(No subject)
In reply to कसला माचो आणि कसला चाणक्य? by पक पक पक
मेलो......
In reply to कसला माचो आणि कसला चाणक्य? by पक पक पक
पवारांची हुकलेली संधी
In reply to चाणक्य वगैरे अति होतंय!! by श्रीरंग
१४५
In reply to पवारांची हुकलेली संधी by क्लिंटन
पवार/केसरी
In reply to १४५ by चिरोटा
५४५ पैकी फक्त ९ खासदार असताना
थत्तेचाचांचे विचार वाचायला
आजच्या डेक्कन क्रोनिकलला
राजकारणातला एक जबरदस्त
जरा
पत्त्यान्चा खेळ
प्रतिक्रिया
हा माणूस मराठी असल्याची खंत
माणूस?
(आमचा गुळमुळीत) निषेध
In reply to माणूस? by काळा पहाड
प्रामाणिकपणा
In reply to (आमचा गुळमुळीत) निषेध by अस्वस्थामा
म्हणजे उद्योग/व्यवसाय करायला
In reply to प्रामाणिकपणा by काळा पहाड
हे राम!
In reply to म्हणजे उद्योग/व्यवसाय करायला by विश्वनाथ मेहेंदळे
कडक प्रतिसाद.
In reply to म्हणजे उद्योग/व्यवसाय करायला by विश्वनाथ मेहेंदळे
एका वयस्कर (वय ७०च्या आसपास
In reply to माणूस? by काळा पहाड
अगदी खरं आहे. एका कनवाळू
In reply to एका वयस्कर (वय ७०च्या आसपास by प्यारे१
ते शेतकरी असल्याची मला
एक अंक संपला...