शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स
सध्या "ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स" या लेखकाचे "शांताराम" हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक वाचते आहे, अर्धे झाले आहे. पहीली काही प्रकरणे, भारतातील अनुभवांबद्दल एखादी पाश्चात्य व्यक्ती इतके सकारात्मक लिहू शकते हे वाचून, आश्चर्यमिश्रीत आनंदाचा धक्का बसला. हातातून पुस्तक खाली ठेववेना. विशेषतः पुस्तकातील मराठी संवाद आणि मराठी पात्रांनी भुरळ घातली. लेखकाची नीरीक्षणशक्ती देखील अफाट, खरच अफाट आहे हे जाणवले. पण पुढे पुढे लेखकाची जीवनशैली, चरस, हशीश घेणे आदि सवयी बघता, मुंबईचे अतिरेकी कौतुक, लोकांची स्तुती सर्व अतिरंजित वाटू लागले. खरं तर पुस्तक काही काळ दूरच ठेवले. झोपडपट्टीच्या दादाशी अध्यात्मिक गप्पा करणे, शिवसेनेच्या राजकीय बळाचा उल्लेख, थोड्या पानांनंतर मुस्लीम समाजातील काही गुंड लोकांना दिलेला "लाईमलाईट" (प्रकाशझोत)- त्यांचे झोपडपट्टीची आग विझवण्याचे काम व त्या कामाची तोंड भरभरून स्तुती, वगैरे गोष्टी अगदी अगदी निखालस पेरलेल्या वाटू लागल्या.
एकंदर "फर्स्ट इम्प्रेशन" जबरदस्त होते पण ते हळूहळू मावळत चालले आहे. प्रसंग अतिरंजीत, काल्पनिक आणि मीठमसाला - फोडणी घालून "पेश" केल्यासारखे वाटत आहेत. तसे करायला काही हरकत नाही पण मग आत्मानुभावाचा आव कशाला?
बाकी काल्पनिक जॉनर मधील म्हणून वाचावयास उत्तम पुस्तक आहे. विशेषतः जीवनविषयक बर्याच टीप्पण्या मार्मीक आहेत. जसे - लेखक आणि लेखकाची मैत्रिण कार्ला गप्पा मारत असतात आणि विषय निघतो की "आत्ता या क्षणी तुम्हाला जर एखादा वर मिळाला तर काय मागाल?" कार्ला म्हणते "सत्ता (पॉवर) कारण सत्ता ही सर्वोत्तम गोष्ट आहे" त्यावर शब्दाने शब्द वाढत जाऊन वाचकाला तिचे म्हणणे कळते की "सेक्स हा मुख्यत्वे करून पॉवरगेम असतो." तर याउलट "प्रेम हे शरणागतीचे दुसरे रूप असते आणि म्हणून प्रेमात पडण्यास आख्खे जग घाबरते" वगैरे. अन्य टीप्पण्या मधेमधे पेरलेल्या आहेत आणि वाचण्याजोग्या आहेत.
"प्रबाकर खरे" हे पात्र लेखकाचा मित्र आहे. आणि या पात्राचे व्यक्तीचित्रणदेखील उत्तम झाले आहे. प्रबाकरचे तोंडभर , निखळ, निष्कपट स्मितहास्य या पुस्तकात वाचकाला वारंवार भेटत राहते. सर्वच पात्रे छान रंगवली आहेत.
पण एक सूचना - लेखक भारतीयांच्या हृदयास हात घालू पहातो आणि पहीली बरीच प्रकरणे त्याला यशही मिळते, पण ती एक "कॅल्क्युलेटेड" (धूर्त) लेखकी चाल असावी. तेव्हा थोडे डोके शाबूत ठेऊन हे पुस्तक वाचा.
मुंबईत राहूनही , मला काही माहीत नसलेल्या डार्क (अंधार्या) गोष्टी या पुस्तकरुपाने माहीत झाल्या उदाहरणार्थ - (१) मरणोन्मुख पण बेघर लोकांना आसरा देऊन त्यांच्या अवयवांचा चालणारा व्यापार (२) सतत उभे राहून चरस पीणारे साधू. उपयोग न केल्याने त्यांचे सडणारे पाय आणि त्यांचे चरसी भक्तगण.
या अर्धवट वाचलेल्या पुस्तकात भारतीयांबद्दल खूप चांगल्या गोष्टी वाचल्या. भारतीय असल्याचा परत एकदा खूप अभिमानदेखील वाटला.
एकंदर पुस्तक वाचण्याजोगे आहे. थोड्या दिवसात परत वाचायला सुरुवात करेन. ज्यांनी कोणी वाचले असेल त्यांनी आपापले मत जरूर या धाग्यावर नोंदवावे. धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अपर्णा वेलणकरांनी मराठी
एकंदर "फर्स्ट इम्प्रेशन"
यहि सब कुछ चुकाना है
आमची पण जाहिरात...
@ वल्ली, अनुप ढेरे, रमेश
शांताराम
शांतारामा
स्मिता आणि पिडा धन्यवाद.
छान...
हे पुस्तक वाचायच नेहमीच राहुन जातं...
पुस्तक रंजक आहे. पण ते हमखास
शांताराम गाईड
शांताराम सिनेमा
काय सांगता ?
रंजक नाव