Skip to main content

गुवाहाटी आणि बागपत

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 14/07/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही. घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत. जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे? काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत. दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला? अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ मी "ऐसी अक्षरे" संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो

वाचने 45457
प्रतिक्रिया 173

प्रतिक्रिया

In reply to by मन१

मनोबा आणी क्लिंटन यांच्याशी सहमत. अनेक सदस्यांचे प्रतिसाद वाचुन संताप्/खेद/किव अस बरंच काहि वाटुन गेलं. इथं वावरणार्‍या सदस्यांचे विचार असे असु शकतात तर मग खाप मंडळींचे काय घेउन बसलात. का कुणास ठावुक पण मार्टिन ल्युथर किंग चे हे वाक्य डोळ्यासमोर आले.
"History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people." --Martin Luther King, Jr.

गुवाहाटीच्या घट्नेबद्दल बोलायचं, तर प्रत्येक वर्तमानपत्र आणि चॅनेलची बातमी वेगळी आहे. तिचं वय १५-१६ ते २० असं सांगितलं जातंय.कुठे तो पब होता तर कुठे बार-कम रेस्तरॉ आहे असं लिहिलंय. एकेठिकाणी त्या वाढदिवसाच्या पार्टीत त्या ग्रुपमधलं एटीएम कार्ड हरवल्यामुळे त्यांना तिथून बाहेर हाकललं असं म्हटलंय तर कुठे तिला उद्देशून काही अश्लाघ्य बोलल्यामुळे तिने भांडण काढलं आणि परिणिती म्हणून त्या गटालाच बाहेर हाकललं असं म्हटलंय. त्यामुळे तिचं वागणं चूक की बरोबर याबाबत आपण उहापोह करून उपयोग नाही, आणि जरी ती पूर्णतः चुकीची वागली असली तरी तिच्यासोबत असं घडणं नक्कीच न्याय्य नाही. आता अशा घटना घडताना मुली काय करतात, आरडाओरडा/प्रतिकार करतात का हा प्रश्न आहे. वानगीदाखल खाली काही प्रसंग लिहितेय. १. काळ १९९६ ते २०००. स्थळ सांगली बसस्थानक. सिनीयर मुलींनी बसमध्ये चढताना कोणत्याही परिस्थितीत सॅक छातीशी घट्ट धरायला सांगितले होते. पायर्‍या चढताना आपसूक दोन्ही हातांनी पुढचे बार धरले जातात, अशा वेळेस एक-दोन माणसांच्या पाठीमागे उभे राहून फक्त हात पुढे आणून ग्रोपिंग केले जायचे. हाताच्या बाह्या मागे दुमडल्यामुळे कपड्यांवरूनही हात ओळखू यायचे नाहीत आणि पायर्‍या चढून वरती जाईतो त्या माणसाने हात काढून घेतल्यामुळे कुणी केलं असेल हे कळायचे देखील नाही. माझ्या वेळच्या दोन मुलींनी बसने येणे जाणे याप्रकारामुळे बंद केले. आता इथे तर जंगली महाराज रोडपेक्षा जास्त लोक असूनही काही करता आले असते का? आमच्यातल्या एकीला असा अनुभव आल्यावर आम्ही पाळतीवर राहून एकाचा अंगावर आलेला हात तसाच पकडून ठेवला आणि त्या हाताला एकदम चक्क कचाकचा चावलो. त्या हाताच्या मालकामध्ये आणि आमच्यात तीन माणसे होती आणि तो कसाबसा आमच्यापर्यंत पोचला होता. बसमध्ये आमच्याच ओळखीचे रोजचे येणारे जाणारे असल्याने बाकीच्यांनी त्या माणसाला बुकलून काढले, पण म्हणून असले प्रकार पूर्णपणे बंदही झाले नाहीत. २. साधारण २००४ साली कुर्ल्याचा प्लॅटफॉर्म क्र. ८ चा एका बाजूचा जिना बंद केला गेला होता. तेव्हा जिन्यावर मुद्दाम गर्दी करून हे असलेच प्रकार चालायचे. ३. आझाद मैदानाकडून सीएसटी स्टेशनाकडे येणारा रस्ता. तिथे हे विकृत लोक कानाला फोन लावून एकट्या जाणार्‍या मुलीच्या बरोबरीने चालतात आणि घाणेरड्या शद्बांत बोलत राहतात (रेट सांग म्हणणे ही त्यांची सगळ्यात वरची पातळी असेल तर पुढचं काय असेल हा विचार करा). न राहवून काही बोलले तर "मी फोनवर बोलत होतो आणि बहुतेक तुलाच इच्छा दिसतेय, तु फुकट आलीस तरी कुणी नेणार नाही.... आणि यापलिकडचे बोलले जाते" आणि हे सगळं संध्याकाळी सात वाजताही घडतं. ४. प्रवासात दोन ट्रेन समोरासमोर आल्यावर एकाने झेप घेऊन समोरच्या ट्रेनमधल्या मुलीला इतक्या अमानुषपणे ग्रोप केले की तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. पुढचा प्रवास त्या मुलीने सुन्नपणे केला. तिला कसे समजवावे हे न समजून आम्हीदेखील गप्पच होतो. ५. चुकून जनरल डब्यात चढल्यावर उतरताना माझ्या मैत्रिणीला एकदा पाठीमागून खेचले गेले, ट्रेन चालू झाली होती पण नशीबाने ती वाचली. ओढण्याचा जोर इतका होता की तिच्या कुर्त्याची मागची बाजून त्या लोकांकडेच राहिली. नुकतीच केलेली खरेदी सोबत असल्याने किमान पुढचा अप्रिय प्रसंग टळला. ६. ठाणे-पनवेल लोकलसेवा नवीन असताना रात्री ११ वाजता ठाण्याहून शेवटची लोकल गेल्याचं कळलं, म्हणून आम्ही (दोन बहिणी-त्यांचे नवरे-माझी आई) नवी मुंबई बसस्थानकाकडे चाललो होतो. मी चारेक पावलं पुढे चालत असेन. समोरून येणार्‍याला आम्ही सगळे एकत्र असावेत असं वाटलं नसावं. आधी दुरून चालणार्‍या त्या माणसानं अचानक जवळ येत हातातल्या सिगारेटचा मांडीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मी चपळाईने दूर झाले, प्रतिक्षिप्त क्रियेमुळे जोरात किंचाळले, घरचे-आजूबाजूचे धावून आले आणि तो मनुष्य पळून गेला.. ७. ग्रुपमधल्या मुलींना अपशब्द वापरल्याचा प्रतिकार केल्याबद्दल दोन मुलांना अंधेरीमध्ये ठेचून मारले गेले याला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. नेहमीच सगळीकडे आपली आपण काळजी घ्यावी असं म्हटलं जातं आणि येऊन जाऊन सगळे मुलींच्या कपड्यांवर घसरतात. गुवाहाटीतली मुलगी काय आणि अगदी सांगली पासून मुंबईच्या मुलींपर्यंत जीन्स-टॉप किंवा पंजाबी ड्रेस हा बहुतकरून असलेला पोषाख असतो आणि मी वरती लिहिलेल्या ठिकाणी अशाच कपड्यांतल्या मुली असाव्यात, हे मुंबईत वावरलेल्यांना वेगळे सांगायला नको. तरी देखील दोन वर्षे वयाच्या चिमुरडीपासून ते पंच्याहात्तर वर्षे वयाच्या वृद्धेपर्यंत कुणावरही बलात्कार होतोच ना? हे वरती लिहिलेले सगळे प्रसंग मी स्वतः किंवा माझ्या अगदी जिवलग असलेल्या स्त्रियांनी अनुभवलेले आहेत. गप्प न बसण्याला 'एवढीच मिजास असेल तर स्वतःच्या बापाचा रस्ता वापरा" हे सांगणं म्हणजे काहीच वाटू नये इतकं घाणेरड्या शब्दांत बोललं जातं. चालत असताना कधी कुणाचा हात कसा येईल हे माहित नसतं, त्यामुळे गर्दीतून चालेली मुलगी पहा, तिचे हात नेहमी अ‍ॅलर्ट आणि क्रॉसमध्ये असलेले दिसतील. आम्ही बिचार्‍या नाही, पावलोपावली स्कॅन करणार्‍या नजरा आणि संधीसाधू धक्के मारणारे लोक असतील तरी मुली घरात बसत नाहीत. पण मग वर उल्लेखलेल्यासारखी घटना पाहिली-ऐकली की त्रास होतो, खरंच खूप जास्त त्रास होतो. तो येशू एका गोष्टीत म्हणतो, "ज्याने आजवर एकही पाप केले नाहीय त्या माणसाने पहिला दगड मारावा". मला त्याच धर्तीवर म्हणावंसं वाटतंय की "अशी एक मुलगी आणून दाखवा की जिला आजवर असल्या प्रकारचा एकदाही त्रास झाला नाहीय." घरातल्या मुलींकडे एकदा सहज चौकशी करा, कळेत काय उत्तर आहे ते.

In reply to by मस्त कलंदर

भयानक. येऊन जाऊन सगळे मुलींच्या कपड्यांवर घसरतात मी नवव्या यत्तेत असताना शाळेचा युनिफॉर्म अंगावर असताना दोन मैत्रिणींच्याबरोबर बसस्टॉपकडे निघाले असताना (कसल्यातरी सरावामुळे शाळेनंतर अर्ध्यातासाने, म्हणून गर्दी ओसरली होती पण दुपारीच) एका मनुष्याने अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. आम्ही बधत नाही म्हटल्यावर त्याने त्याच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवले. घाबरून, जीव मुठीत धरून बेभान पळत सुटलो आम्ही. बसमधला प्रवास तर वेदनादायीच असतो. किती अनुभव सांगावेत आणि किती नाही. अंगावर पूर्ण कपडा असला तरी नजरेनी होणारी चिरफाड थांबवणे केवळ अशक्य. अर्धवट वयातील मुले करणार नाहीत अशी कृत्ये सत्तरीतले आजोबा करताना अनुभवले आहे. स्त्रियांनी रात्री सुरक्षितपणे फिरावे ही स्थिती येण्यापासून आपण बरेच दूर आहोत.

In reply to by मस्त कलंदर

:( दुर्दैव हे की जर प्रतिकार केलाच तर मुलीलाच आपला समाज दोष देउन मोकळा...त्यातही बायका आल्याच. पुन्हा त्यांनाच अशा प्रकारांना सामोरं जावं लागलं की लागले टाहो फोडायला.

In reply to by मस्त कलंदर

+१ मस्तकलंदर. घाणेरडी भाषा हा तर अगदी हाताला नाही लागली तरी शब्दानी भोगण्याचा प्रकार झाला. मुंबईची लोकल तर असल्या बेवारशी कुत्र्यांचा एक उकीरडाच! एक एक स्व्तःवरचाच प्रसंग सांगितला तर पान पुरायची नाहित संतापान लिहिताना. पण मला वाईट वाटत ते या गोष्टीच की अश्यावेळी बाकिच्या स्त्रीया किंवा ज्या मध्यमवयीन बायका असतात त्या का नाही पुढं होउन विरोध करत? एकिच्या माग जर अश्यावेळी प्रत्यक्ष पहाणार्‍या दोन जरी स्त्रीया उभारल्या तरी खुप मदत होइल.

In reply to by स्पंदना

दोन आठवड्यापुर्वीचा प्रसंग - कनकपुरा रोड, बेंगळुर वेळ: १९:३० - २०:०० खचाखच भरलेली BMTC. बसमधे एका बारला धरुन मी आणी एक ५०-६० चा गॄहस्थ उभे होतो. बाजुच्या सीट्वर एक महिला मुलाला बाजुला घेउन बसली होती. पुढच्या बसथांब्यावर एक तरुणी पुढच्या दाराने बसमधे चढली. आमच्या बाजुच्या सीट्वरील महिलेने मुलाला उचलुन मांडीवर घेतले आणी त्या तरुणीला बसायला जागा करुन दिली. तिला बसायला जागा देण्यासाठी मी बाजुला झालो, त्या गृहस्थाने पण जागा दिल्या सारखे केले. ती तरुणी बसणार तेव्हढ्यात त्याने त्याचा उजवा हात त्या तरुणीच्या पृष्ठ्भागावर जोरात दाबला. ती तरुणी शॉक झाली आणी काहि न बोलता खाली बसली. मला बघुनहि मदत करता नाहि आली. कारण जर पीडीत महिला काहि बोलली नाहि तर मदत करणे अवघड होते. त्यान कन्नड - बिगर-कन्नड मामला. असो.
एकिच्या माग जर अश्यावेळी प्रत्यक्ष पहाणार्‍या दोन जरी स्त्रीया उभारल्या तरी खुप मदत होइल.
सहमत.

अश्या विषयांचे धागे आले की वाईट वाटते. सातच्या आत घरात हा सिनेमा पाहिल्यावर बर्‍यांचजणांना/जणींना उत्तर मिळेल. वयात आलेल्या तरूण, तरूणींनी ठराविक वेळेपेक्षा घराबाहेर राहू नये. हे भारतातच असे नाही तर कुठेही. रात्रीच्या नोकर्‍या करणार्‍यांच्या येण्याजाण्याच्या सोयी कशा आणि कितपत सुरक्षित असतात याबद्दल कल्पना नाही. बाकी लहान मुलांशी विकृत चाळे करणार्‍यांबाबत एवढ्यात बरेच बोलून झाले आहे.

रेवती, सातच्या आत घरात हा सिनेमा पाहिल्यावर बर्‍यांचजणांना/जणींना उत्तर मिळेल. 'सातच्या आंत घरात' चित्रपटा नंतर पेपरात एक बातमी आली होती. सात वाजेपर्यंत आपली मुले बाहेर काय करतात? हा ही ज्वलंत प्रश्न आहे. कात्रज घाटात कुठेतरी एक टपरी आहे. अनेक कॉलेज कुमार-कन्यका तिथे सकाळ पासून संध्याकाळी ५-६ पर्यंत असतात. तिथे काही पैसे घेऊन काही बंदिस्त जागा उपलब्ध करुन दिल्या जातात. संध्याकाळ पर्यंत अनेक जोड्या त्या बंदिस्त जागेचा पुरेपुर उपयोग करून संध्याकाळी तृप्त मनाने आणि देहाने ७च्या आंत घरी पोहोचतात. आई खुश. 'आमची मुलगी/मुलगा नाही हो 'तसली'/'तसला'. आमचे घरचे संस्कार आहेत. ७च्या आंत घरांत. बिचारा/बिचारी सकाळ पासून कॉलेजात होता/होती चल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर, मी पोहे करून आणते हं!' रात्रीच्या नोकर्‍या करणार्‍यांच्या येण्याजाण्याच्या सोयी कशा आणि कितपत सुरक्षित असतात याबद्दल कल्पना नाही. मध्यंतरी कॉलसेंटरला नोकरी करणार्‍या मुलींवर त्यांच्या गाडीच्या चालकाने आणि त्याच्या मित्रानी मिळून बलात्कार केला. तेंव्हा रात्री बेरात्री स्त्री कर्मचार्‍याला एकटे पाठविले जायचे नाही. बस मध्यल्या शेवटच्या स्त्री सदस्याने सुखरूप घरी पोहोचल्याशिवाय एका तरी पुरुष कर्मचार्‍याने बस सोडायची नाही असे पत्रक काढले होते. माझा मुलगा कॉलसेंटरला नोकरी करत होता. रात्री दोन वाजता तो घरी आला तेंव्हा बस मध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त तो आणि एक मुलगी होती. ह्याच्या लक्षात न राहून स्वतःचं घर आल्यावर हा उतरून गेला. ती मुलगीही काही बोलली नाही. बस निघून गेली. घरी आल्यावर ह्याच्या लक्षात आली चूक. मग घाबरला. मला उठवलं, म्हणाला असं असं झालं काय करू? म्हंटलं, 'त्या मुलीला फोन कर आणि ती सुरक्षित आहे की नाही ह्याचा अंदाज घे. तर ह्याच्या कडे तिचा फोन नंबर नव्हता. पण बस ड्रायव्हरचा होता त्याला फोन लावला आणि त्या मुलीला द्यायला सांगितला. ती नुकतीच तिच्या घरासमोर उतरत होती. सुरक्षित होती. तिला सांगितलं, 'घरात पोहोचलीस की ह्याच नंबरावर फोन कर.' त्या प्रमाणे तिने फोन केला. सांगायचा उद्देश, काही काही कंपन्या काळजी घेत आहेत.

एकूणच काय तर जे काही झाले त्यात त्या मुलीचीच चूक.रात्री अशी घटना घडल्यास ती रात्री घराबाहेर पडली म्हणून तिला दोष द्या.ती पबमध्ये गेली तर मुळात ती दारू प्यायलाच कशी गेली म्हणून तिला दोष द्या.जर दिवसाढवळ्या भर रस्त्यावर असे प्रकार घडले तर काही नाही तर तिच्या कपड्यांवर घसरा. इतर कोणतेही कारण मिळाले नाही तर कपड्यांवरून तिला दोष देणे किती सोपे आहे नाही?अशा स्वयंघोषित नैतिकतेच्या पुरस्कर्त्यांना नऊवारी साडी सोडून इतर सगळेच कपडे तोकडे वाटत असावेत.आणि सध्याच्या काळात तसे कपडे वापरणे कोणाही मुलीला शक्य/सोयीस्कर नाही तेव्हा सगळ्याच मुली ’तोकडे’ कपडे घालून वावरत असल्यामुळे मुलांचे लक्ष चाळवले जाणार कसे नाही?एकूण काय तर काहीही झाले तरी दोष मुलीचाच.आणि वर "पिडित जर स्वैराचार करत असेल तर पिडणाऱ्याला का दोष द्या" असे एका पध्दतीने अशा अश्लाघ्य प्रकारांना पाठिशी घालायचे.उत्तम.चालू द्या. खरं म्हणजे या समाजात ती मुलगी म्हणून जन्माला आली हीच तिची चूक. दुसरे काय?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

श्री. पुण्याचे वटवाघूळ, "पिडित जर स्वैराचार करत असेल तर पिडणाऱ्याला का दोष द्या" दुर्दैवाने ह्या वाक्यातील उपरोध आपल्या ध्यानात आलेला नाही कींवा आपण सोयिस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करीत आहात. असो. समस्येची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. सहभागी सर्व सदस्यांना समस्या कळली आहे. नैतिक पोलीसांनाही व्यवस्थित झोडून झाले आहे. आता, थोडाफार उपाययोजनांवरही काही उहापोह झाला आणि त्यातून काही विधायक मार्ग निधाला तर स्त्रियांचा काही अंशी फायदा होईल. सततच्या प्रत्यक्ष किंवा निनांवी तक्रारी पोलीसात करणे, वृत्तपत्रांमध्ये तपशिल (अनेक महिलांनी) कळवित राहणे, मंत्रालयावर महिलांनी मोर्चा नेणे, साहित्यिक महिलांनी ह्यावर रान उठविणे, दृक माध्यमांना कळवून पाठपुरावा करणे, स्त्री-मुक्ती संघटनांनी समस्येची गांभिर्य धूनी सतत प्रज्वलीत ठेवणे आदी उपाय मला दिसतात. एखादी घटना घडल्यावर काही स्त्री - मुक्ती संघटना थोडे दिवस दृक वाहिन्यांवर मिरवतात आणि आपण फार मोठे समाजकार्य केले असे स्वतःलाच फसवत राहतात. तसे न होता, स्त्री-मुक्ती संघटनांनी आपली नैतिक जबाबदारी समजून सतत नेटाने ह्या समस्येवर कार्य करीत राहावे. गृहमंत्रालयाला निवेदने पाठविणे, गृहमंत्र्यांच्या भेटी दरम्यान काळे झेंडे दाखविणे आदी अनेक मार्ग निघू शकतील. काही खेडेगांवातून दारुच्या अड्ड्यांवर महिलांनी हल्ला बोल करुन असे अड्डे उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या होत्या तसेच ह्या विरुद्धहि महिला शक्तीने एकत्र यावे असे मला वाटते. पुरुषांचे सहकार्य लाभेलंच.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्या वाक्यातुन उपरोध अजिबात जाणवत नाही...त्यामुळे अशा विषयावर तरी दुर्लक्ष वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही जे मार्ग सांगितलेत त्याने फारफार तर मुक्तीवाल्यांचे फोटो झळकतील.. एक मुख्य मार्ग हा की आपल्याला जर मुलगा असेल तर त्याला मुलींचा आदर करायला शिकवणे. हा पुढच्या पिढीला सुसंकृत करण्याचा एक मार्ग. सध्याच्या परीस्थितीत काळ / वेळ अन आपली - बरोबर असणार्‍यांची ताकद ओळखुन जोरदार प्रतिकार करणे. एक उदा. : कुर्ल्याच्या वालावलकर शाळेसमोर ६-७ वर्षांपुर्वी एक माणुस शाळा सुटायच्या वेळी यायचा अन मुली बाहेर यायला लागल्या की स्वतःची पँट काढुन लिंगाशी खेळायचा. (अतिशयोक्ती नाही). एक दोन वेळा असं झाल्यावर मुलींच्या घरी समजलं. काही बायका मग वेळ साधुन आल्या अन त्या नालायकाला चपलांनी मारलं. शाळा प्रशासन म्हणे शाळेबाहेर हा प्रकार असल्याने ते काही करु शकत नाहीत. इतकं झाल्यावरही हा प्रकार सुरुच राहीला. एक गोष्ट जाणवते की निम्न स्तरातल्या बायका बिनधास्त विरोध करतात...अगदी शारीरीक सुद्धा. हेच मध्यमवर्गीय प्रतिष्ठा जपायला पांघरुण घालतो. (त्यात प्रतिष्ठा कसली अन कोणाची देव जाणे.) आमच्या ओळखीची एक स्त्री झोपडपट्टीत रहात असतानाची गोष्ट - दुपारच्या वेळी एक पुरुष घराबाहेर येउन अचकट विचकट बोलायचा. एक दोनदा हे झाल्यावर तिसर्‍यांदा त्या काकुंनी झाडुन त्यांची हाड चेचली अन मग बंद झालं. लोकांना तमाशाच हवा असतो...मदत करणार कोणी नसलं तरी आपलीच सुरक्षा आपण करणं अशक्य नाही. गुवाहाटीएच्या मुलीचं याबाबतीत कौतुक की तिने विरोध केला, नंतर काय झालं हे सांगायला पुढे आली.

In reply to by शिल्पा ब

प्रतिक्रिया जरी या प्रतिसादावर असली तरी ती धाग्यावरही आहेच.
एक मुख्य मार्ग हा की आपल्याला जर मुलगा असेल तर त्याला मुलींचा आदर करायला शिकवणे. हा पुढच्या पिढीला सुसंकृत करण्याचा एक मार्ग.
येस. हाच तो दीर्घ मुदतीचा आणि सर्वात योग्य मार्ग. या मार्गाने होणारा बदल नुसता स्त्रियांचा छळवाद थांबण्यापुरता मर्यादित नसेल तर त्यावर जाऊन स्त्री-पुरुष अशा एकत्रित मनुष्यप्राण्याला बरेच मोठे फायदे त्यामधून दिसतील. या उपायाने फलित दिसायला वेळ लागणार आणि हा उपाय सर्वगामी नसणार. म्हणजेच अशा शिकवण्यानंतरही बरीच मुलं या पल्स पोलिओ मोहिमेतून बाजूला राहणार किंवा अन्य बर्‍याच जणांवर लस देऊनही मोठे झाल्यावर तिचा परिणाम दिसणार नाही. यामुळे स्त्रियांचा आदर करणारी पुरुषसंख्या सिग्निफिकंटली वाढली तरी मधे एक बराच मोठा काळ असा जाणार की ज्यात काही टक्के प्रमाणात तरी असे ग्रोप करणारे, मोलेस्ट करणारे आणि अन्य चाळे करणारे पुरुष राहणार. ते गुन्हे करणार आणि त्यातल्या काहीजणांना शिक्षा होणार. बलात्कार होणं म्हणजे सर्वस्व हरवणं ही कन्सेप्ट मुलींच्यातही राहणार आणि त्यामुळे "आयुष्य उध्वस्त" झालं ही भावनाही राहणार. अशा वेळी या मधल्या काळात खबरदारी म्हणून पेठकर काकांनी म्हटलेल्या गोष्टी एकदम "नॉन अ‍ॅप्लिकेबल" ठरवता येत नाहीत. इथे थोडा गोंधळ होतोय. १) अन्यत्र उल्लेखलेले बसमधले ग्रोपर्स, रस्त्याने बाजूला चालताना फोन पकडून रेट काय विचारणारे अन लिंगाशी चाळा करणारे आणि २) रात्री उशीरा पबबाहेर एका समूहात येऊन एका मुलीला पकडून तिला मारहाण / वस्त्रहरण / स्पर्श करणारे हे दोन्ही लोक एकच आहेत.. पहिल्या प्रकारातल्या एकेकट्याने जमेल तेवढा चान्स मारणार्‍या लोकांना केवळ सामूहिक संधी मिळाली की अगदी उत्स्फूर्तपणे दुसरा प्रकार केला जातो. चर्चगेट स्टेशनला रात्री लाईट जाऊन अंधार झाला म्हणून एका म्हातार्‍या बाईला ग्रोप अन मोलेस्ट केलं गेलं होतं. त्या ठिकाणी कोणीही ठरवून आलेले नव्हते.. जस्ट चान्स मिळाला म्हणून एकमेकांना साधं ओळखतही नसलेल्या जमावाने ते करुन घेतलं. कोणत्याही लिंगाची व्यक्ती कोणत्याही जागी कितीही वाजता जाऊन काहीही प्यायली तरी तिला सुरक्षितता मिळालीच पाहिजे, यात काही प्रश्नच नाही.. ती मुलगी रात्री दारु प्यायली / पबमधे गेली म्हणून तिच्यावरचा बलात्कार समर्थनीय असं विधान कोणी करु धजावणार नाही आणि इथेही कोणी केलेलं नाही. कारण ते सरळसरळ दुरित आहे. अशा वेळी आपण कायद्याकडून अपेक्षा करणं १०० टक्के रास्त आहे. याला कायद्याची तीव्र भीतीच रोखू शकेल.. पण ओव्हरऑल "समाजा"कडून इन्स्टंट किंवा लाँग टर्म बदलांची कसलीच अपेक्षा ठेवून आपण स्वतःला स्वतंत्र म्हणू शकत नाही. ते डोळे मिटून दूध पिणं होईल..जोपर्यंत कायदा आखूड पडतोय आणि जोपर्यंत बलात्कार = आयुष्य बरबाद ही आपल्या समस्त स्त्रीपुरुषांच्या मनात घट्ट आहे तोपर्यंत आपण स्वातंत्र्य / गुलामी या गोष्टी मनात न आणता स्वतःला जपून असणं यात गुन्हेगारीचं समर्थन कुठेच येत नाहीये. इनफॅक्ट अगदी पूर्णवस्त्रांकित सभ्य मुलीलाही बस/ट्रेनमधे किळस येणारे प्रकार सहन करावे लागतात ही दु:खदायक गोष्ट आहे. आणि या भयंकर वास्तवाचा उदाहरण म्हणून वापर करुन अर्धवस्त्रांकित राहण्याचं समर्थन करणं हाही उद्देश इथे स्त्रीवर्गाचा नसावा.. त्या फक्त इतकंच म्हणू इच्छिताहेत की पूर्ण वस्त्रांतही त्रास होतो. . केवळ कमी कपडे हे कारण नाही.. मी सिगरेट ओढतो म्हणून हार्ट ट्रबल होईल अशी भीती घालताय ? ... अहो सुपारीच्या खांडाला न शिवणारी माझी मावशी पन्नाशीच्या आत हार्ट अ‍ॅटेकने गेली...अन तिकडे तो चेनस्मोकर चर्चिल मस्त दीर्घायुष्य जगला, मावशी मेली आणि चर्चिल जगला म्हणून सिगरेट ओढणार्‍या माझी रिस्क शून्य होते का? चर्चिलला तेवढं ओढण्याचं स्वातंत्र्य, अन मला हार्टट्रबल?? ही सिस्टीम (वैद्यकीय शोधांनी) सुधारेपर्यंतही मी सिगरेट ओढत राहणार अन मलाच हार्टट्रबल होणं हा अन्याय आहे .. असं आपण म्हणतो का? असो.. ....एकूणच विधानांचे उफराटे अर्थ काढले गेले की वाईट वाटतं. इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं गेलंय ते दुर्दैवाने अशा भलत्याच अर्थाने घेतलं गेलंय याचा खेद होतो..

In reply to by गवि

इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं गेलंय ते दुर्दैवाने अशा भलत्याच अर्थाने घेतलं गेलंय याचा खेद होतो..
कसे आहे ना गवि, एकदा झापडे बांधली की फक्त समोरचे दिसत राहते. आता दोष झापडांचा की घोड्याचा ते ज्याचे त्याने ठरवावे.

In reply to by गवि

गवि, सिग्रेटचा दृष्टांत इथे पूर्णपणे अस्थानी आहे. सिग्रेट तुम्ही ओढलीत, त्रास तुम्हाला होणार. इथे पॅसिव्ह स्मोकिंगचा दृष्टांत अधिक योग्य आहे. सिग्रेट शेजारचा ओढतो, (असल्यास) आनंद फक्त त्यालाच मिळतो, मला फक्त फुप्फुसातली घाण आणि कर्करोगाची वाढीव शक्यता. कपडे, लैंगिकता विकृत स्वरूपात पॅसिव्ह स्मोकिंगसारखी समोर येते. काही पुरूषांना वासनेवर ताबा ठेवता येत नाही, काही पुरूष विकृत असतात आणि उरलेल्यांतले बरेचसे दुर्लक्ष करणारे किंवा स्त्रियांच्या कपड्यांच्या फॅशनींवर आपलाही (का आपलाच?) हक्क आहे असं समजणारे आहेत म्हणून समाजाच्या अर्ध्या भागाला पारतंत्र्य भोगावं लागत आहे. कमी कपडे घालू नयेत म्हणजे नक्की किती कपडे घालावेत? बुरखे पुरतील का तंबू घालून फिरावं? यातला उपहास सोडून द्या, तो वैतागामुळे आलेला आहे. मकीच्या प्रतिसादांमधे पीडीत मुलींनी किती कपडे घातले आहेत याचा पुरेसा उल्लेख आहे. बिशाद आहे या प्रसंगांना सामोर गेलेल्या मुली जख्ख म्हातार्‍या झाल्या तरी पावसापाण्यातही बाहेर पडताना अर्ध्या तुमानी घालून घराबाहेर पडतील! आपल्या देशासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात मुळात एवढे कपडे घालण्याची स्त्रियांवर सक्ती होते ते मुख्यत्त्वे काही पुरूषांच्या विकृतीमुळे! पॅसिव्ह स्मोकर्सना अनेकदा इतरत्र जाण्याची किंवा धूम्रपान करणार्‍याला "बाजूला जा" असं सांगण्याची सोय असते. स्त्रियांना तीही सवलत नसते. "मी पूर्ण कपडे घातले आहेत, मला छळू नका" असं कोणी म्हणताना दिसत नाही. कमी कपडे हे कारणच नाहीये. असेल तरीही ते कधीही समर्थनीय नाही. अनेक ठिकाणी, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, धूम्रपानावर बंदी असते. धूम्रपान न करणार्‍या लोकांना कायद्याचं जेवढं संरक्षण आहे तेवढं मुली, स्त्रियांना नाही. का त्यांच्या या अडचणींची व्यवस्थेला दखलच घ्यायची नाही? बहुदा नसावी, स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहही नसणारा आपला देश आहे. तुम्ही प्रतिसादात उल्लेखल्याप्रमाणे, अब्रू म्हणजे सर्वस्व असा एक पुरूषप्रधान विचार भारतीय मानसिकतेत घट्ट रूजला आहे. तसा विचार एखादीच्या डोक्यात नसेल तरीही हात लावणे, मॉलस्ट करणे यात अगदी अब्रू गेली नाही तरी आपण शारिरीकदृष्ट्या निर्बल आहोत, आणि आपल्या आजूबाजूचे पुरूषही तेवढेच निर्बल आहेत इतपत आत्मसन्माला धक्का पोहोचतो. अपर्णाच्या प्रतिसादात तिची ही अशी अगतिकता पुरेपूर दिसते आहे. अवांतरः 'चांगल्या घरातल्या' शाकाहारी मुली-स्त्रियांच्या शरीरात ड-जीवनसत्त्वाची कमतरता असते का याचा तपास कोणी केला आहे का?

थत्तेचिच्यांनी ऐसीअक्षरे वर ही लिंक दिलीय.. तसंच अखिल गोगॉय या अक्टीव्हीस्ट ने लोकल टीव्ही चॅनलनेच हा अश्लाघ्य प्रकार घडवुन आणलाय हे सांगितलंय. http://www.youtube.com/watch?v=m2X__IS2Mps&feature=relmfu नेहमीप्रमाणेच शुटींग घेण्यापेक्षा पोलिसांना बोलावणे किंवा स्वतः मध्यस्थी करुन व्हीक्टीमला सुरक्षीत करणे हे महत्वाचं वाटलं नाही. मुंबई जुहुच्या चौपाटीवर असा प्रकार झाला त्याचं पुढे काय झालं हे माहीती नाही. :( http://www.youtube.com/watch?NR=1&v=3lJzWltR69w&feature=endscreen याव्यक्तिने मध्यस्थी करुन मुलीची विटंबना थांबवली.

बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर हल्ला करतात तसा प्रकार वाटला. एक सांगु , कुणालाही भाउ वा बाप वा पती म्हणायची लाज वाटावी असली माणस ही. अश्या लाथा घातल्या पाहिजेत की बस. अतिशय चिड येतेय. स्वतःवरचे प्रसंग आठवताहेत,. सांगुन सुद्धा उपयोग नाही. काय तोंड दाखवताहेत वर आणि, केव्हढस पोर ते. काय ताकद त्या बिचारीची. अरेरे, माझी स्व्॑तःची मुलगी एव्हढीच दिस्ते. पाणी आल डोळ्यात. अन संताप तर ...विचारु नका. भोसडीच्यांना रस्त्यावरआणुन मारायला पाहिजे. नुसती नावाला पँट घालणारे करुन ठेवायला हवेत. हलकट कुत्री.

In reply to by स्पंदना

पाणी आल डोळ्यात. अन संताप तर ...विचारु नका. भोसडीच्यांना रस्त्यावरआणुन मारायला पाहिजे. नुसती नावाला पँट घालणारे करुन ठेवायला हवेत. हलकट कुत्री.
अपर्णाताई, आपला संताप अगदी समजू शकतो. किंबहुना मलाही तो व्हिडिओ बघितल्यावर असाच संताप आला होता/आहे. पण या प्रतिसादातील एक शब्द मात्र खटकला.आणि तो शब्द त्या नालायकांविरूध्दचा अपशब्द आहे तसाच एका स्त्रीविरूध्दचाही अपशब्द आहे.हा शब्द वापरायलाच हवा होता का? बाकी प्रतिसादाबद्दल सहमत आहे.

In reply to by क्लिंटन

ठिक आहे. कारण सांगते मी क्लिंटन तुम्हाला त्या शिवी देण्यामागच. पण पहिला हे ही सांगते, मला त्या शिवीचा अर्थ माहित नाही आहे. एकदा एका बाईने अशी खडसावुन ही शिवी दिली अन एका माणसाला माग सरताना पाहिले अन मी ही शिवी शिकले. घरुन एव्हढ एक्स्पोजर कधी मिळालच नाही. खरतर द्यायला हव होत. हे करु नये ते करु नये पण काय करायच शिकवायलाच विसरले बिचारे. ते जाउ दे. लग्नाला साधारण दोन वर्ष झाली होती. माझ्या नवर्‍याच्या एका मित्राच्या घरी बांद्र्याला जाण्यासाठी आम्ही दोघे भाईंदर मधुन ट्रेन पकडुन निघालो होतो. अंगात साधा सलवार कमिज. विकडे मधला दिवस अन दुपार. त्यामुळे मी नवर्‍याबरोबर पुरुषांच्या कंपार्टमेंट मध्ये बसले होते. गाडी विरारहुन आलेली. मला हा प्रसंग आठवायला आजिबात नाही आवडत, पण वर मस्तकलंदर अन शिल्पाब अयांच्या धडधडीत सांगण्याचा धागा पकडुन मी हे लिहिते आहे. एक मध्यमवयाची चार माणस आम्ही दोघे हसत खेळत होतो ते पहात होती. बांद्रा आला अन आम्ही उतरण्यासाठी उठलो. नवर्‍याच्या मागोमाग मी दाराकडे. उगा कुणी धक्के मारायला नको म्हणुन सगळ्यांना जाउ देत नवरा उतरला. मागोमाग मी. पण मी त्या दारात्च मागुन पकडले गेले. एक हात तोंडावर, अन बाकिचे सारे हात .. गाडी हलली. नवरा पुढे चालतोय पण माग वळुअन काही तो पहात नव्हता. अक्षरशः प्लॅटफॉर्म संपाय्ला आला अन मला त्या चालत्या गाडीतुन बाहेर फेकल गेल. प्लॅटफॉर्मवरचे पहाणारे, ट्रेनच्या आतुन पहाणारे कुणीही मदतीला नाही आल. नवरा अजुअन्ही चालतच होता. मी प्लॅटफॉर्मवर थरथरत उभी अन ज्यांनी हा प्रकार पाहिला होता ते ही नुसतेच उभे. जिन्याजवळ जाउन नवरा मागे वळला. मला त्याच थोबाड फोदावस वाटत होत. अक्षरशः जनावर भेटली होती मला. ओरबाडुन निघाल होत अंग सार. पण ते वळ दाखवुन ही नवरा मानायला तयार नव्हता. मी तिथेच होतो, अस कस होइल अस त्याच म्हणन. त्या प्रसंगानंतर जवळ जवळ दोन महिने मी बाहेर तर नाहीच गेले, पण एक स्पर्श सोडुन बाकि काहीही सांग अशी अवस्था झाली होती. अजुनही कधी कधी जनावर दाबुन धरल्या सारखी ती अवस्था आठवली की रात्र रात्र झोप नाही लागत. हे लिहिताना मी आजही तेव्हढीच थरथरतेय. तुम्हाला काय वाटत? असले प्रकार फक्त शरीरापुरते रहातात? मनापर्यंत पोहोचत नाहीत? नवर्‍याचा सुद्धा स्पर्श किळसवाणा वाटायला लागतो अस काही घडल की. अअन असल्यांबद्दल चर्चा करताना मी श्बद जपुअन वापरायचे ? का? ती एव्हढीशी पोर हा प्रकार जन्मभर नाही विसरु शकणार. मी काय करते? दुसर्‍या कुनाला हात लावताना पाहिल की उठुन सरळ विरोध करते. अर्थात मी एकटीच असते. पण करते.

In reply to by स्पंदना

भयानक. अंगावर शहारा आला हे वाचून. अशी लोकं शिव्या द्यायच्याच लायकीची नव्हे मरेपर्यंत लाथाबुक्क्यांनी बडवायच्या यात अजिबात शंका नाही. पण तुम्ही जी शिवी दिली आहे ती आईवरून आहे. कितीही घाणेरडी माणसे असली तरी त्यांच्या आयांना अपशब्दाचा धनी बनवू नये (विशेषतः त्या आयांविषयी आपल्याला माहित नसेल तर) असे वाटले म्हणून तसा प्रतिसाद लिहिला.

In reply to by स्पंदना

अपर्णाताई, अत्यंत भयानक असा अनुभव आहे. तुम्ही कश्याबद्दल लिहिणार आहात हे माहिती असूनही वाचून हात थरथरायला लागलेत तर त्यावेळी आणि नंतरही तुमची काय स्थिती झाली असेल हे समजू शकते. असे हिडिस अनुभव टाळण्याकरता कायम स्त्रिलाच बंधनं घातली जातात. अश्या अनुभवानंतर कोणीही सहज म्हणेल की महिलांच्या राखीव डब्यात का बसली नाहीस? खरं तर अश्याच कारणांनी सगळ्या स्त्रिया महिलांच्याच डब्यातून प्रवास करतात. समाजाच्या ५०% (फारफार तर ४०%) भागाकरता संपूर्ण गाडीतला एक डबा आरक्षित? म्हणजे ज्या स्त्रियांनी त्यात जागा मिळवली त्या सुटल्या आणि बाकीच्यांवर ही जनावरं तुटून पडली तर चूक त्या स्त्रियांची कारण त्यांना त्या राखीव डब्यात जागा पटकावता आली नाही. तसेच जी सार्वजनीक ठिकाणं महिलांकरता राखीव नाहीत ती त्यांच्याकरता कायमच धोकादायक का ठरावीत? याचाच अर्थ भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य आहे ते फक्त संविधानात! वास्तविक समाजात स्त्रिला कायमच जपून, घाबरून, प्रसंगी त्याग करून जगावं लागतंय.

In reply to by स्पंदना

काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही आहे. हे सगळे भर दिवस मुंबैइत होउ शकते तर रात्री गुवाहटीत न होण्याची अपेक्षा कशी करावी?

In reply to by स्पंदना

अत्यंत हिडीस, भयानक प्रकार.. असल्या आयघाल्यांना, हरामखोरांना त्यांचे लिंग कापून तिखट सारलं पाहीजे.. आता मुळ धाग्याबद्दलः (अत्यंत उशीरा प्रतिसाद देऊन, साप गेल्यावर भुई धोपटतोय ह्यासाठी सॉरी.. पण नेट पुरतंच गंडलं होतं आठवडाभर, त्यामुळे वाचनमात्रच रहावं लागलं.. :-() गुवाहाटीच्या घटनेवर अतिशय तीव्र प्रतिसाद उमटलेत.. मिपावर आणि इतरत्रही. मी इशान्य भारतात काही काळ असल्याने, मला ही गोष्ट का जास्त खटकलीय ते सांगतो. इशान्य भारतात समाजातील स्त्रीचे स्थान (आतापर्यंत तरी) हे बर्‍यापैकी चांगले आहे. स्त्रीने स्वतंत्रपणे, तिच्या मर्जीने जगणे ह्यात काहीही वावगे मानले जात नाही. राज्या-राज्यांमध्ये परीस्थितीत तफावत असली तरी दिल्ली-मुंबई मध्ये ज्याप्रकारच्या हिडीसपणाला स्त्रीयांना तोंड द्यावं लागतं, तसे इथे नाही. आणि म्हणूनच, हा प्रकार म्हणजे इथली सामाजिक परीस्थितीही आता गटारगंगा होणार का, ही भिती वाटली.. मी मेघालयात जिथे राहतो, तो भाग प्रॉपर जंगल आहे.. म्हणजे टेकड्यांवर, जंगलामध्ये गावं वसलेली आहेत. जेमतेम १००-२०० जनसंख्या असलेल्या गावांमधेही मुली बिनधास्त संध्याकाळी, रात्री "हॉटपॅन्ट्स" घालून हिंडतांना पाहिल्या आहेत. रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यांवर, जंगलांतून अचानक पोरं-पोरी बिनधास्त हिंडतांना दिसतात.. त्यांना कसलीही भिती वाटत नाही, वाटावी अशी परीस्थिती नाही. आसाममध्ये बिहू, सरस्वतीपुजा ह्या सणांच्या वेळी मुली,स्त्रीया नटून थटून फिरतात आणि एन्जॉय करतात.. बिहूच्या नाचात तर मुली आणि मोठ्या स्त्रिया देखील अत्यंत उत्स्फुर्तपणे नाचतात. आणि हे म्हणजे बाया-बायांचं हळदी-कुंकू, फुगड्या टायपातलं नाचणं नाही, तर त्यात पुरुषही सहभागी असतात.. ("डिआयडी लिटील चॅम्प्स" पहात असाल, तर मम्मीलोकांपैकी सगळ्यात बिनधास्त नाचणारी मम्मी, ओमची आई ही आसामातील दिफूची..) आतापर्यंततरी गर्दीचा फायदा घेऊन अंगचटीस जाणे, विकृत चाळे करणे हा प्रकार आसामात ऐकण्यात/ पाहण्यात नव्हता.. मागे गुवाहाटीच्या एका मॉलमध्ये शॉर्ट स्कर्ट घातलेल्या पोरींकडे डोळे फाडून फाडून बघणारा ३-४ मुलांचा घोळका बघून बायको (माहेर मुंबई) बोलली होती की, "झालं, सडणार आता हळूहळू इथेपण सगळं.." ती असं का बोलली ते वरील आणि इतर अनुभव वाचून कळले.. म्हणूनच गुवाहाटीच्या रस्त्यावर झालेला तो निंदनीय प्रकार हा कदाचित भारतातील स्त्रीला सन्मान देणार्‍या शेवटच्या काही संस्कृतींपैकी एकीच्या मरणाची सुरुवात आहे, असं मला वाटतंय.. बाकी वांझोट्या (?) चर्चामध्ये रस नसला तरी, उद्या माझ्या मुलाच्या तोंडून जर मुलींबद्दल वावगा शब्द गेला तर त्याचं मुस्काट फोडीन, एवढंच बोलतो..

In reply to by स्पंदना

अगदी हेच आणि असंच म्हणायला आलो होतो. असल्या प्रवृत्तींना अशाच शिक्षांनी जरब बसते. भारतात लोकशाहीचा फारच उदो उदो झालाय. दोन टप्पू टाकून ज्या गोष्टी संपवायच्या तिथे वर्षानुवर्षे कोर्टात भिजत घोंगडी ठेवली जातात. जितकी मोठी बातमी घटनेची होते, तेवढीच जर शिक्षेची झाली तर झाल्याप्रकारावर अंशतः समाधान मिळू शकेल. नाहीतर हे होतच राहील.

शिल्पा ब म्हणतायत त्याप्रमाणे लहानपणापासुन च मुलांना शिकवायला हवं की मुलीँना नीट वागवा. आणि मुलींनाही फार बंधनात ठेवण्याऐवजी शरिराने आणि मनाने अलर्ट व स्ट्रॉँग, टफ बनवायला हवं. व्यायाम, स्पोर्टस्, कराटे असलं काय तरी यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना जो काही त्रास होतोय तो घरी येऊन सांगा. eg शाळा/कॉलेज पाशी येउन थांबणारे सायको, एक पाळणाघरातल्या काकू तर लहान मुलीला २ ३ तास शु ला पण जाउ देत नव्हत्या आता हेपण एक प्रकारच फिजीकल टॉर्चर च की... आणि घरात असं वातावरण नको की मुलीँनी येऊन काही सांगीतलं तर त्यांच्याच कपड्यांवर/वागण्यावर/वेळांवर/घराबाहेर पडण्यावर बंधन येईल. हे म्हणजे victim bashing झालं. त्याऐवजी जो कोणी त्रास देणारा असेल त्याला शिक्षा व्हावी म्हणुन आपल्या घरातले खरंच प्रयत्न करतील असं वाटायला पाहीजे. आणि गुवाहटी सारखा मॉब दिसला तर शक्य असेल तर intervene किँवा एटलिस्ट पोलीस ला फोन करा आणि नंतर कृपया victim bashing करु नका.

अशा वर्तनाचा विरोध आणि बीमोड केल्याचं एक उदाहरण म्हणजे, २००४ साली नागपूर मध्ये झालेला अक्कू यादव या गुंडाचा वध. भर कोर्टात या नराधमाला शंभर-दीडशे बायकांनी हाती येईल त्या वस्तूने ठेचून मारलं. सहन करण्याची मर्यादा संपल्यावर, प्रतिकार करण्याला पर्याय नाही हे लक्षात आल्यावर उशीराने का होईना या घटनेत बायकांनी धाडस केलं. स्त्री असल्याने अनुभवातून मला असं वाटतं, की अशा कोणत्याही - शाब्दिक, शारीरिक, मानसिक हिंसेला बाई बिचकते, आणि प्रतिकार करण्याचा विचारही मनात येईपर्यंत गुन्हेगाराचं काम झालेलं असतं. याचं कारण तिला कायम संरक्षित वातावरणात ठेवलं जातं. याउलट जगातल्या धोक्याची जाणीव वेळोवेळी करून देऊन, मानसिक आणि भावनिक कणखरपणा जर स्त्रीमध्ये रुजवला, तर प्रसंग येईल तेव्हा तो कृतीतून उतरण्याची काहीतरी शक्यता उरेल. कारण अक्कू यादवच्या उदाहरणात जमावाचा मिळाला तसा आधार कायमच मिळणं शक्य नाही. बर्‍याचदा प्रतिकार होतो आहे, हे समजल्यावर दडपशाही करणारा थोडा तरी मागे सरतो. हे घरात, घराबाहेर आणि खरंतर कुठेही वागताना लागू पडतं. अर्थात (on your own) नडायचं केव्हा आणि पळायचं केव्हा हेही समजणं गरजेचं आहे.

जवळ जवळ १००% प्रतिक्रिया ह्या विषयाला सोडून आणि धागा भरकटवणार्‍या असलेल्या बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. असो... वटवाघूळ साहेब पुढच्या लेखनात युरोप आणि ऑस्ट्रेलियाचे फटू पण येऊ द्या.

In reply to by नाना चेंगट

अमेरीकेचे फटू पहायला आवडतील.
युरोपात आणि ऑस्ट्रेलियात राहून अमेरिकेचे फोटो कशे बरे टाकणारे ते ? का त्यांचा असा छळ करतो आहेस तू ? 'साप पंचायतीचा' माणूस आहेस का तू ? गेल्या काही दिवसात आपल्याच मिपावर हे असे काही प्रतिसाद आले आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत मिपाकराची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

असे कसे ? भारताबाहेर राहून भारताच्या बातम्या, फटू टाकता येतात तर ऑस्ट्रेलिया युरोपातून अमेरीकेचे फटू का नाही टाकता येणार?

In reply to by नाना चेंगट

माझ्या कडे भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोप सगळीकडचे फोटु आहेत. ;) मी देऊ का? अवांतरः काही अतिशय थर्ड क्लास प्रतिसाद पाहुन पुन्हा असे वांझोटे धागे उघडायचे नाहीत अशी शपथ घेतल्या गेली आहे. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

जवळ जवळ १००% प्रतिक्रिया ह्या विषयाला सोडून आणि धागा भरकटवणार्‍या असलेल्या बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. वांझोट्या वांझोट्या चर्चा म्हणतात त्या याच का रे परा?

मला एकदा कुणी ओळखीचे मुलींनी कसं नीट राहावं म्हणून उपदेश करत होते. त्यांना मी म्हटलं, "प्रॉब्लेम तुम्हा पुरूषांमुळे असताना नेहमी मुलींनीच नीट का राहायचं ?" मुलींना त्या कितीही व्यवस्थित वागत असतील तरी डोस देणारे सगळेजण मुलाला एका शब्दाने कसे वागावे आणि कसे वागू नये यातलं काहीच सांगत नाहीत. त्यांचं घाणेरडं बोलणं बॉईज टॉक म्हणून कानाआड केलं जातं. मोठ्या मुलींचं तर जाऊ दे, लहानशा मुलींना पाहूनही बीएचएमबी (बडी होके माल बनेगी) म्हणतात. म्हणजे एवढ्याशा त्या जीवाकडे पाहूनही असलेच विचार असतील तर काय? मला हा शब्द माहित असेल असं न वाटलेल्या भावाच्या एका मित्राला हा शब्द बोलल्याबद्दल हाकलून दिलं होतं!!! कधी शारिरिक तर कधी अर्वाच्य शब्द बोलून मानसिक मोलेस्टेशन!!! आता लक्षात आलं असेल ना, पुरूषांकडे मुद्दे नसल्यावर त्यांनी कमरेखाली घसरून केलेले विकृत विनोद उच्चविभूषित स्त्रियांना का आवडत नाहीत ते??

Chief Minister, Assam: Prosecute the Molestors #JusticeForWomen - Sign the Petition! Kavita just signed this petition on Change.org. 404 signatures are still needed! Sign the Petition · via Change.org https://www.change.org/en-IN/petitions/chief-minister-assam-prosecute-t…

असा अनुभव घेतलाय.. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी, बसमधुन उतरताना मागुन १ हात येवुन पुर्न छातीवर फिरला होता :(.... आणि काहि कळायच्या आत 'तो' माणुस गर्दित नाहिसा झाला.... ( मि साधा पन्जाबि ड्रेस घातलेला)... तेव्हापासुन बसमधुन जाताना दप्तर पाठिवर न लावता, उलटे पुढे पोटावर लावुनच जायचे... (जावे लागले)... 'तो किळ्सवाणा' स्पश्र आठवला तर आजहि काटा येतो... तसच... सेकन्ड ईयरला असताना विक्रुत माणुस 'नागडा' रस्त्यात उभा राहायचा... कॉलेज मध्ये तक्रार केल्यावर कॉलेजनेच अ‍ॅक्शन घेतली... असा अनुभव भारतात / जगात कुठेहि येवु शकतो... पण गेली ३ वष्रे यु.के. मध्ये राहतेय, गर्दितुन जाते/येते.... ऑफिस टाईमला ईथे ट्रेनमध्ये मुम्बई सारखिच गर्दि असते आणि वेगळा 'लेडीज' कम्पार्टमेन्ट नसुनहि... असा अनुभव आला नाहि ..... - स्वरालि

काही नाही. सेंच्युरी मारायला आलो ;)

चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.यात मुद्दा त्या मुलीबरोबर झालेला अत्यंत वाईट आणि अश्लाघ्य प्रकार हा आहे.मुद्दा ती मुलगी अल्पवयीन असतानाही दारू कशी प्यायली, रात्रीच्या वेळी बाहेर कशी पडली, तिने १५-२० जणांशी वाद कसा घातला,तिने तोकडे कपडे घातले होते का हे मुद्दे मुळातच नाहीत.आणि यापैकी काहीही तिने केले असले तरीही तिच्याबरोबर झालेला प्रकार करायचा अधिकार त्या हरामखोरांना अजिबात मिळालेला नाही. मी १६ वर्षांचा असताना केलेला एक प्रकार इथे जाहिरपणे confess करतो आणि त्याबद्दल मला तेव्हा आणि आजही भयंकर शरम वाटते हे पण सांगतो.मी त्या वयाचा असताना मुलींविषयी एक सुप्त आकर्षण होतेच.शाळेत असताना मुलींबरोबर बोलणे,त्यांच्यात मिसळणे या सगळ्या गोष्टी करायचा प्रश्नच नव्हता.आणि वायानुरूप असलेले मुलींविषयीचे आकर्षण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याशी बोलायचेही नाही अशी व्यवस्था.तेव्हा मुलीचा स्पर्श कसा असतो हे बघण्यासाठी एकदा गर्दीच्या ठिकाणी एका मुलीला मी मुद्दामून धक्का मारला होता.माझ्याहून दोनेक वर्षांनी लहान असेल ती.मी तिला धक्का मारल्यानंतर ती "आ" असे वेदनेने कळवळून ओरडली.अर्थातच तिला सामोरे जायची हिंमत माझ्यात नव्हती.मी गर्दीत मिसळून तिथून पळून गेलो.पण तेव्हापासून मी केलेल्या प्रकाराचे मला अतिशय वाईट वाटत आलेले आहे.त्या मुलीने मला सगळ्यांसमोर दहा कानाखाली का मारल्या नाहीत आणि मला तिथे उभे राहायची हिंमत का नव्हती असे प्रश्न मला पडले आणि हा प्रकार मी मुद्दामून कधीच करणार नाही हे मी ठरविले.आजही तो प्रकार आठवून मला अत्यंत गिल्टी वाटते.त्यानंतर अर्थातच मी तो प्रकार परत कधीच केला नाही. अशा आकर्षणातून झालेले प्रकार आता कमी असतील असे वाटते कारण मी लहान असताना मुलामुलींवर जी बंधने होती ती आता तितक्या प्रमाणावर राहिलेली नाहीत. सौ.वटवाघूळ यांनी मला सांगितले आहे की मुलींना चुकून झालेला स्पर्श आणि मुद्दामून केलेला स्पर्श यातील फरक कळतो आणि ते कसब त्यांच्यात उपजतच असते. निदान समजत्या वयातील मुलींना असे आकर्षतातून झालेले स्पर्श नक्कीच कळत असतील.अशा मुलांना त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या उद्देशाने थोडा शारिरिक पण बराच शाब्दिक मार द्यावा असे मला वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पुण्याचे वटवाघूळ साहेब, मुद्दा ती मुलगी अल्पवयीन असतानाही दारू कशी प्यायली.... गेली ३१ वर्षे मी भारता बाहेर आहे. त्यामुळे १५-१६ वर्षाच्या मुलीही बारमध्ये जातात हे वाचून खरंतर मला धक्काच बसला. सुट्टीवर भारतवार्‍या झाल्या तरी कमी दिवसांच्या वेळापत्रकामुळे हा सामाजिक बदल तेवढा कधी जाणवलाच नाही. त्या मानसिक अवस्थेतून माझे पहिले विधान होते. असो. रात्रीच्या वेळी बाहेर कशी पडली, तिने १५-२० जणांशी वाद कसा घातला.... सुरक्षेच्या दृष्टी कोनातून, महिलांनीच काय पण एकट्या दुकट्या पुरुषांनीही १५-२० जणांच्या (बहुतेक प्यायलेल्या) तरूणांच्या घोळक्याशी पंगा घेउ नये, ह्या मताचा मी आहे. गवतात चालतानाही आपण कुठे साप, विंचू तर नाही नं ह्याची सतत काळजी घेत असतो. रस्ता, रेल्वेचे रुळ ओलांडतानाही कुठुन वाहन/गाडी येत जात नाहीए नं ह्याची काळजी घेत असतो. रस्त्यावरून लहान वाहन (स्कुटर, मोटरसायकल इ.इ.) चालवतानाही ट्रक, बस, व्होल्व्हो अशा वाहनांपासून स्वतःला वाचवत वाहन चालवत असतो. विषाणू संक्रमण होऊ नये म्हणून प्यायच्या पाण्यापासून रस्त्यावरील उघडेवाघडे पदार्थ खाण्याचे टाळण्यापर्यंतची काळजी आपण घेतच असतो. तसेच, 'समाजातील गुंडप्रवृत्ती पासूनही आपले संरक्षण आपण केले पाहिजे' हा मुद्दा वरील विधानात आहे. तिने तोकडे कपडे घातले होते का हे मुद्दे मुळातच नाहीत. हा मुद्दा तुमच्याच अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल. ह्या धाडसी आणि अतिशयोक्त विधानामुळे आला. अलिकडेच रेव्ह पार्ट्यांचे पेव फुटले आहे. त्यावर कायद्यानेही बंदी आहे. एसिपी विश्वास नांगरे पाटीलांनी प्रथमच (माझ्या ऐकण्यात) पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण उघडकीस आणून प्रसार माध्यमांद्वारे आमच्या पर्यंत पोहोचवलं. तरुणाईचं खालावत चाललेलं कॅरेक्टर समोर येऊन आणि आपण काही करू शकत नाही ह्या विचारांनी खुप खंत वाटली. यापैकी काहीही तिने केले असले तरीही तिच्याबरोबर झालेला प्रकार करायचा अधिकार त्या हरामखोरांना अजिबात मिळालेला नाही. १०१ टक्के सहमत. त्यावर माझे विचार मी, माझ्या प्रतिसादातल्या खालील परिच्छेदात, मांडले आहेत. कुठल्याच गुन्ह्याला नैतिक अधिष्ठान नसतं. कुठलाच गुन्हा समर्थनिय नाही. पण त्याच बरोबर बाहेरच्या जगात वावरताना सुरक्षेची काही बंधने सर्व स्त्री-पुरुषांना पाळाविच लागतात. आणि जर ती पाळली नाहीत तर अशा एखाद्या घटनेचे आपण बळी ठरू शकतो, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. हे मी 'बुरसटलेल्या विचारांचा नैतिक पोलीस' ह्या आरोपाची शक्यता स्विकारून सांगू इच्छितो. गुंडांच्या वागण्याचे कुठेही मी समर्थन केलेले नाही उलट माझी भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडली आहे, सुरक्षेसाठी फक्त महिलांनीच नाही तर स्त्री-पुरुष दोघांनीही काळजी घेतली पाहिजे हा विचार अधोरेखित केला आहे.तरीही, गुंडांच्या कृतीचे मी समर्थन करतो आहे अशा आशयाची विधानं मिपावरील काही महिला सदस्यांनी केली आहेत. एवढेच नाही तर त्या गुंडांच्या पंक्तिला मला नेऊन बसविले आहे. हेही 'नैतिक पोलीसिंग' झालं असं मला वाटतं. मनोगत आणि मिपावर गेली कांही वर्षे मी वावरतो आहे. पण आजच्या इतकी उद्विग्नता पूर्वी कधी अनुभवली नाही. असो. काही जणांनी माझे मुद्दे समजाऊन घेतले, मला नैतिक पाठींबा दर्शविला, माझ्यावतीने इतरांशी वाद घातला त्या सर्वांचा मी ऋणी आहे. धन्यवाद. अवांतरः ह्या सर्व चर्चे दरम्यान मी ती यू ट्यूबवरील किळसवाणी चित्रफित मुद्दामच पाहिली नाही. कारण ती पाहिल्याने त्यात आपली भावनिक गुंतवणूक होते, त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विचारच करता येत नाही (निदान मला तरी) असे वाटते. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

गुंडांच्या वागण्याचे कुठेही मी समर्थन केलेले नाही उलट माझी भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडली आहे, सुरक्षेसाठी फक्त महिलांनीच नाही तर स्त्री-पुरुष दोघांनीही काळजी घेतली पाहिजे हा विचार अधोरेखित केला आहे.
ज्यांना कळून घ्यायचा होता त्यांनी कळून घेतला. ते म्हणतात ना, "झोपलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही" :-)
तरीही, गुंडांच्या कृतीचे मी समर्थन करतो आहे अशा आशयाची विधानं मिपावरील काही महिला सदस्यांनी केली आहेत. एवढेच नाही तर त्या गुंडांच्या पंक्तिला मला नेऊन बसविले आहे. हेही 'नैतिक पोलीसिंग' झालं असं मला वाटतं.
कुणाकडे किती लक्ष द्यायचे हे आपले आपण ठरवले पाहिजे. जाऊ दे ना. त्यांच्या विधानांना इतकी किंमत देऊ नका. तुकारामांनी म्हटले आहे, लोकांचे बोलणे हे ओकारी सारखे असते, थांबवावेसे वाटले तरी आपल्याला थांबवता येत नाही. तितकीच किंमत त्या विधानाची आहे (खरे तर तितकीही नाही)
मनोगत आणि मिपावर गेली कांही वर्षे मी वावरतो आहे. पण आजच्या इतकी उद्विग्नता पूर्वी कधी अनुभवली नाही. असो.
काका, कृपया उद्विग्न वगैरे होऊ नका. फाट्यावर मारा. ते सोडा, तुम्ही पावसाळ्यात मुंबईत येणार म्हणाला होतात. ते कधी ते सांगा, कट्टा करू. काय म्हणता ?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काय बोलणार... माझी सगळ्यात पहीली कमेँट यासाठीच होती www.misalpav.com/node/22254#comment-412844 संपादित मला grop करणारा पण टिळकांच्या शाळेतलाच मुलगा होता. तुमची चुक तुमच्या लक्षात आली पण त्या मुलीच्या मनात ते आयुष्यभर राहणार. सौ वटवाघुळ ने बरोबर सांगितलय साधारण १०+ वयाच्या मुलींना स्पर्श कळतो. आणि गुवाहटी सारख्या घटनांनी परत त्याची आठवण येते.

In reply to by मन१

.!.

In reply to by एमी

व्हेरी गुड... त्या वाक्यांचा उद्देश मिपावरचा गुवाहटी सिनारिओ होता. कोण व्हायोलेंस सुरु करतो, बघ्यांमधला कोण त्यांना जॉईन करतो, कोण बघेच राहतो आणि कोण मदतीला येतो... दुसरा उद्देश स्त्रिया काही ठरावीक प्रतिसादांवर का तुटुन पडल्या होत्या आणि काही generalized statements का झोँबतात, हे पुरुषांना कळावे हा होता. ज्याप्रमाणे या प्रतिसादातील वाक्यांवर काहीजण तुटुन पडले आहेत किंवा वैयक्तिक टिका करत आहेत त्यावरुन ते लक्षात येईल असे वाटते. त्यातुनही काही संयमित/consistent प्रतिसाद देणारे आहेत याचा आनंदच आहे :-) माझा उद्देश माझ्यापुरता पूर्ण झाला आहे सं मं ला अयोग्य वाटत असेल तर त्यांनी माझे प्रतिसाद काढुन टाकावेत...

In reply to by एमी

दुसरा उद्देश स्त्रिया काही ठरावीक प्रतिसादांवर का तुटुन पडल्या होत्या आणि काही generalized statements का झोँबतात, हे पुरुषांना कळावे हा होता.
या विषयाचा चघळून चोथा झाला असतानाही पुन्हा प्रशिक्षणशिबिर सुरू केले यावरूनच पुरुषजातीबद्दलचे ज्ञान काय ते कळाले. असो.

In reply to by बॅटमॅन

मित्रा, हातून लिहिले गेले आणि मग चूक झाली असे वाटले तरी ते मान्य करण्याचा मोठेपणा नसला की मग ही अशी सारवासारव करावी लागते रे. आता आपण उदार मनाने "असे आहे होय, आम्हाला कळले नव्हते. बरोबर आहे तुमचे" असे म्हटले तर याला "यशस्वी माघार" म्हणायचे, नाही तर "पडलो तरी नाक वर" म्हणायचे. काय बोल्तो ??

प्रत्यक्ष घटनेपेक्षा त्यावरची चर्चा वाचून उबग आला. कृपा करुन ही चर्चा आता बंद करावी .

'यथा प्रजा तथा शासन' दांभिक पुरुषप्रधान संस्कृतीकडून अजून काय अपेक्षा ठेवणार. राजकीय आरक्षण दिले की झाले इतकं सोप्प नाहीच हे.. सामाजिक सुधारणा जोपर्यंत तळागाळात पोहोचत नाहीत (शिक्षण - घरी, शाळेत) तोपर्यंत हे असंच चालत राहाणार.. परवा ते गाणं ऐकलं.. 'मै करु तो साला कॅरेक्टर ढिला है..' लहान मुलं मुली थिरकत होती गाण्यावर.. अशी गाणी अंगवळणी पडणार असतील तर काय शिक्षण देणार मुलांना आपण !!

In reply to by उपास

झक्कास बुल्स आय. ज्या जबाबदार मिडीयाने ही गोष्ट पुढे आणली त्या जबाबदार मिडीया म्हणजे प्रसार माध्यमे, सिनेमे यांनी च स्त्रीचे चित्रण जास्त करून उपभोग्य वस्तू असे केल्याचे सध्या दिसत आहे.

http://in.jagran.yahoo.com/news/national/general/sonali-cried-help-trea… नई दिल्ली। कभी एनसीसी [नेशनल कैडेट कोर] की वर्दी पहनकर इतराने वाली झारखंड की सोनाली मुखर्जी अब जिंदगी की जद्दोजहद से बुरी तरह हताश हो चुकी है। असामाजिक तत्वों के दिए जख्म उसके चेहरे पर तो दिखते ही हैं, साथ ही उसके मन पर भी गहरा असर हुआ है। यही वजह है कि उसने राजधानी दिल्ली में आकर हुक्मरानों के दरवाजों पर दस्तक देकर गुहार लगाई है कि उसे या तो इलाज में मदद की जाए अथवा मौत दे दी जाए। नौ साल से इन जख्मों के दर्द से कराह रही सोनाली कहती है कि उसने कई लोगों से मदद की गुहार लगाई पर हर जगह से सिर्फ आश्वासन मिला। 22 अप्रैल, 2003 को घर में घुसकर कुछ युवकों ने उसके ऊपर तेजाब डाल दिया था। कुछ दिन पहले इन्हीं लोगों ने उसके साथ दुष्कर्म भी किया था। तेजाब से उसकी दोनों आंखों की रोशनी चली गई और दाहिने कान से सुनाई भी देना बंद हो गया। पुश्तैनी जमीन से लेकर मां के जेवरात तक बेच डाले, फिर भी इलाज में पैसे कम पड़ गए। अब तक 22 छोटी-बड़ी सर्जरी हो चुकी है, पर जख्म भरने का नाम नहीं ले रहा। उसने दिल्ली में महिला व बाल कल्याण मंत्री कृष्णा तीरथ से मुलाकात की है। उन्होंने भी मुफ्त इलाज का भरोसा दिया है। झारखंड के मुख्यमंत्री रहे शिबू सोरेन, अर्जुन मुंडा व मधु कोड़ा से भी वह मिल चुकी है, लेकिन किसी ने उसकी मदद नहीं की। सभी आरोपियों को कोर्ट ने जमानत दे दी है और वे आजाद घूम रहे हैं। सोनाली घटना के वक्त धनबाद महिला कॉलेज से समाजशास्त्र से ऑनर्स की पढ़ाई कर रही थी। सोनाली ने बताया कि इंसाफ के लिए जल्द ही दिल्ली में हस्ताक्षर अभियान शुरू किया जाएगा और वह राष्ट्रपति को ज्ञापन भी देगी।

या चर्चेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या सहभागी असलेल्या सर्व धागाकर्ते/प्रतिसादक्/वाचक लोकांना माझं निवेदनः १. तुम्ही स्वतः या चर्चेतुन काय साध्य करत आहात? २. तुम्ही ही चर्चा गंभीरपणे केली असे समजून तुम्ही मानसिक संताप आणि दु:ख याशिवाय काय मिळवलं? शिकलं? ज्यांनी केलं ते हे वाचत नाही आहेत, जे वाचतात/प्रतिसाद देतात ते 'त्या' प्रकारात मोडत नाहीत हा माझा दावा आहे. ३. खर्‍या पिडीत मुलीला किंवा तत्सम पिडीतांना यातुन किती लाभ झाला किंवा होणार आहे? ४. इथे लिहिणे म्हणजे फक्त वड्याचं तेल वांग्यावर काढणे नव्हे का? ५. हे जग किती सुंदर आहे हे तुम्ही विसरलात का? द्यायची असतील तर सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.. अर्धवट मुद्दे मांडणार्‍यांना सुळी दिले जाईल.

In reply to by मराठमोळा

हे सर्वच प्रश्न बहुतांश सर्वच द्विशतकी आणि त्रिशतकी धाग्यांना लागू पडतात. तिथेही चर्चा करावी की न करावी?

In reply to by मन१

>>तिथेही चर्चा करावी की न करावी? तुम्ही तुमचे गाळ उपसण्याचे काम चालू ठेवा हो मनराव१.. :) बाकी चिंता कशाला? प्रश्नांची उत्तरे असतील तर बोला. :)

In reply to by मराठमोळा

इथे लिहिणे म्हणजे फक्त वड्याचं तेल वांग्यावर काढणे नव्हे का?
अगदी तसं नाही पण इथे लिहिण्याने खर्‍या जगतात काही फरक पडणार तर नाहीच. लोकांची इथली पोटतिडीक पाहून तुम्ही हे म्हणताय हे तर स्पष्टच आहे. पण मग कुठल्याही धाग्याबद्दल असेच म्हणता येईल, नाही का? शेवटी शब्द बापुडे केवळ वारा. मग इथे लिहिण्यामागचा उद्देश कोणता? जे मनात वाटते ते स्पष्टपणे मांडणे. खर्‍या जगात हे जमतेच असे नाही. इथे तसे होते, चार लोक दखल घेतात, म्हणून समाधान मिळते. याची खर्‍या जगात किंमत शून्य आहे. पण हे तुटपुंजे का होईना, समाधान मिळते, हेही नसे थोडके. अगदीच ब्लंटलि बोलायचं झालं तर विचारमैथुनासाठीची एक हक्काची जागा म्हणजे मिसळपावसारख्या अनेक साईट्स. आपण तसेही फार छोटे लोक आहोत, आपल्या छोट्याशा भावनिक गरजा जर इथे काहीबाही लिहिण्याने भागत असतील तर त्यात गैर काहीच नाही. मग जगाच्या लेखी त्याचे मूल्य काहीही का नसेना. तुमचा मुद्दा लक्षात आला. निव्वळ कीबोर्डप्रहार करून अशा गोष्टींत काहीही सुधारणा होणार नाहीये. पण म्हणून ही पूर्ण प्रक्रियाच गैरलागू नाहीये. इतकेच माझे म्हणणे आहे.

In reply to by मराठमोळा

अगदीच वेळ जात नाही झाला का रे बाबा. की सुपारी मिळाली आहे धाग्याचे प्रतिसाद वाढवायची ?

In reply to by मराठमोळा

आयला, मिसळपाव वर बोलायलाच नको रे मग. ममो, तुला खरेच असे वाटते की चर्चेने काहीही होत नाही ? तू काढ आता एखादा काकू, बघतो मी. हेच सगळे प्रश्न तिथे विचारतो ;-) असो, शिकायचे म्हणालास तर जालावर काही लोक किती xxx* असू शकतात हे पुन्हा एकदा शिकलो. जोक्स अपार्ट, इकडच्या काही सदस्यांनी सांगितलेले प्रसंग वाचून अत्यंत अस्वस्थ झालो. आज सकाळी ट्रेन मधून प्रवास करताना काही गोष्टी डोक्यातून जात नव्हत्या. (डोकायची तार इतकी सटकली होती की त्या नादात ऑफिस समोर रिक्षा वाल्याशी valid पण शुल्लक मुद्द्यावरून जोरदार भांडण करून घेतले ते वेगळे) डोळ्यासमोर असे काही जर घडताना दिसले तर काहीतरी करेन अशी शक्यता या धाग्याने नक्कीच निर्माण केली. ते करण्याजोगे स्वतः ला घडवले पाहिजे, ही जाणीव झाली. तुला एक किस्सा सांगतो. माझा एक जवळचा मित्र. त्याने एकदा कलरीप्पायतचा क्लास लावला. वयाच्या २६-२७ व्या वर्षी हे काय रे सुरु केलेस असे विचारल्यावर त्याने एक अनुभव सांगितला. दादर स्टेशन बाहेर हा चालला असताना, समोरून एक मुलगी येत होती. याच्याच पुढून जाणाऱ्या एका मुलाने तिला जोरदार धक्का मारला. इतका की तिचा तोल गेला आणि ती कळवळली. माझा मित्र म्हणाला की त्या क्षणी मी त्या मुलाला धडा शिकवू शकलो नाही याची टोचणी लागली आणि काही तरी शिकायचे ठरवले. पुढील वेळेस अशा व्यक्तीला किमान कानफटवून काढता यावे इतके तरी स्वतः तयार असावे असे ठरवले होते म्हणाला. तो तसे का म्हणाला ते मला आज कळले. अशा वेळेला एकच धोका जाणवतो तो म्हणजे आपण लाख भांडणात पडू, पण ऐन वेळेला ती मुलगीच आपल्या बाजूने उभी नाही राहिली तर? मागे मिपा वरील एका धाग्यात बस मधील राखीव सीट वरून आपण भांडण करणे आणि जिच्यासाठी भांडतो आहोत तिनेच नामानिराळे राहणे असे किस्से लोकांनी सांगितले होते. बसच्या सीट चे ठीक आहे, विनयभंगावरून आपण मारामारी करायला गेलो आणि असे तोंडावर पडलो तर काय करणार ? झाली मारामारी आणि आले पोलीस आणि तोवर ती मुलगीच गायब झाली असेल तर. हे काही न करण्याचे कारण नाही, पण एक शक्यता डोक्यात आलीच. * गाळलेल्या जागा प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे भराव्यात.

मूळ विषयाशी संबंधित प्रतिसाद बाजूलाच राहिले आणि दुसर्‍याच जंगी सामन्यांना सुरुवात झाली. असो, नेहमीचंच. माझेही काही विस्कळीत विचार. इथे अनेक महिला सदस्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत आणि त्या वाचून अस्वस्थ, स्तब्ध व्हायला झालं. पण ही आजकाल सुरू झालेली विकृती नाही. इथे जवळपास २४/२५ वर्षांपूर्वीच्या के पी एस गिल आनि रुपम बजाज केसची आठवण झाली. एका आय ए एस महिला अधिकार्‍याला दुसर्‍या उच्चपदस्थाकडून पार्श्वभागाला चिमटा काढण्यासारख्य घटनेला सामोरे जावे लागले होते. श्रीमती बजाज यानी त्या अपमानाविरुद्ध प्रदीर्घ लढा दिला. आपल्याकडे अशा गोष्टींविरुद्ध लढण्यासाठी इतका वेळ आणि धाडस नसतं. आपल्या ज्या संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अभावामुळे गुवाहाटी आणि इतरत्र स्त्रियांना त्रास देणारे समाजकंटक तयार झाले, त्याच संस्कृतीचा दुसरा चेहरा म्हणजे पबमधे जाणारी १५/१६ वर्षांची मुलं मुली. जो काही र्‍हास वगैरे आहे तो सगळ्याच बाजूंनी आहे. मुळात आधी दारू प्यावीशी वाटते यात काय स्वातंत्र्य आहे हे मला कळत नाही. या बाबतीत मी अडाणी आहे आणि ज्ञान मिळालं किंवा नाही मिळालं तर काही फरक पडत नाही. सगळीकडे "गप्प बसा" मंत्रामुळे त्रास देणारे मुलगे आणि घाबरणार्‍या मुली तयार होतात. ते थांबेल तेव्हा आपोआप बराच फरक पडेल. सर्वांना स्वातंत्र्य हवंच, पण सर्वांनीच स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पण उचलल्या पाहिजेत. काळजी घ्या असं कोणी अनुभवी लोकांनी सांगितलं तर त्यात कमीपणा का वाटावा? काळजी घेणे हे जबाबदार असल्याचं लक्षण आहे. काळजी घेण्यात स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकून घेणे, काळ वेळ पाहून यशस्वी माघार सुद्धा घेण्याची तयारी हे सगळं आलंच. एकदा आईवडिलांच्या संरक्षणाशिवाय घराबाहेर पडल्यानंतर आपणच आपलं संरक्षण करणे ही प्राथमिकता असली पाहिजे. जान बची लाखों पाए. मुलीच काय, मुलांनाही हे लागू आहे. अनेकदा गवि म्हणतात तसा जमावाच्या मानसशास्त्राचाही मोठा भाग असतो. दुर्दैवाने अशा परिस्थितीत सापडलंच तर यशस्वी पलायन हा एकमेव सुटकेचा मार्ग असतो. आपल्या देशात ६०/७०% लोक दारिद्र्यात जगतात, आंणि संध्याकाळी मुलांना खायला काय घालू या प्रश्नाचा विचार करण्यात अर्ध्याहून अधिक बायकांचं आयुष्य जातं तिथे भुकेपुढे इतर प्रश्न बेमतलब ठरतात. जिवंत रहाणे हाच मोठा संघर्ष असेल तर इतर सगळ्या गोष्टी चैन ठरतात. प्रचंड लोकसंख्या आणि सगळ्याच प्रकारची उपासमार बर्‍याच गुन्ह्यांना आमंत्रण देते. ही परिस्थिती कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? बाकी काही शक्य नसेल पण निदान आपल्या मुलांना आणि मुलींना चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला शिकवलं तरी पुरे. एक एक करून चांगले नागरिक वाढतील तसे असले प्रकारही कमी होतील. मी कमालीची अशावादी आहे.

In reply to by पैसा

पैसातै, रस्ता चुकला.. कुणापुढे डोकं फोडताय? अहो, तुम्ही आम्ही जिथे लिहितोय, वाचतोय, तिथे हे लोकं पोहोचणं अजुन १० वर्ष लांब आहे. आणि जे इथे अनावश्यक विचार मांडताहेत ते खर्‍या परिस्थितीपासून करोडो किमी लांब आहेत. ते फक्त चर्चा करु शकतात. खर्‍या परिस्थितीत इथे चर्चा करणारे तिथे किती कृती करतील याबद्दल मी साशंक आहे. स्त्रीला धक्का देणारे मी स्वतः बुकलुन काढलेत (स्वतःच्या ओळखी व्यतीरिक्त स्त्रियांच्या आणि स्वतःच्या जीवावर). इथे फक्त चर्चा करणारे सो कॉल्ड पुरुष, चर्चा करण्याव्यतिरिक्त खरे किती शेपुटघाले असतील याबद्दल मी साशंक आहे.

In reply to by मराठमोळा

कळफलक बडवुन पिडीत स्त्रियांचा कैवार घेणं फास सोपं... "खळ्ळ खटक" करण्याची वेळ येते तेंव्हा असे लोक औषधालाही सापडत नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

+१००, समर्थन द्यावा वाटला असा एकच प्रतिसाद. पाण्यात पडुन प्रवाहाबरोबर वाहणा-या एखाद्या पानानं, बाजुचं दुसरं पान बुडतंय की तरंगतयं, याबद्दल करुन करुन किती तो विचार करावा, त्यापेक्षा पाण्याच्या वेगामुळं जे चांगलं जग पहायला मिळ्तंय तेवढं पहावं हे बरं.

In reply to by पैसा

पैसा, आपल्या ज्या संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अभावामुळे गुवाहाटी आणि इतरत्र स्त्रियांना त्रास देणारे समाजकंटक तयार झाले, त्याच संस्कृतीचा दुसरा चेहरा म्हणजे पबमधे जाणारी १५/१६ वर्षांची मुलं मुली. जो काही र्‍हास वगैरे आहे तो सगळ्याच बाजूंनी आहे. मुळात आधी दारू प्यावीशी वाटते यात काय स्वातंत्र्य आहे हे मला कळत नाही. शिक्षणापेक्षा ज्ञानाचा अभाव, संस्कारांचा अभाव, संवादाचा अभाव, पैशाचा-सत्तेचा माज, पोलीसांची निष्क्रिय मनोवृत्ती, राजकारण्यांचा पोलीस खात्यातील हस्तक्षेप अशा अनेक चुकीच्या गोष्टींचे फलीत म्हणजे हे गुंड आहेत. बाकी, रोजच्या जीवनांत येता-जाता स्त्रियांना त्रास देणारे कामांधतेच्या पहिल्या पायरीवर आहेत. आपली चोरी पकडली जाणार नाही असे प्रत्येक चोराला वाटते. चोरी पकडली गेली नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं की अशांचा धीर चेपतो. आणि ते पुढच्या पायरीवर पाय ठेवायला प्रवृत्त होतात. सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी एकत्र येऊन अशा नराधमांना झोडपून काढणं हा प्रभावी मार्ग ठरावा. दुर्दैवाने त्याला धाडस लागतं. मग सोपा मार्ग अवलंबिला जातो....संस्थळावर इतर पुरूष सदस्यांना दूषणे देणे आणि अपशब्द वापरणे. सगळीकडे "गप्प बसा" मंत्रामुळे त्रास देणारे मुलगे आणि घाबरणार्‍या मुली तयार होतात. 'गप्प बसा' मंत्राने घाबरणार्‍या मुली तयार होत असतील पण त्रास देणारे मुलगे त्यांच्या हट्टांना, मागण्यांना, मतांना अवास्तव महत्त्व दिल्याने होतात. त्यांना 'नकार' पचवायला न शिकविणे म्हणजेच भविष्यातील एक हट्टी व्यक्तिमत्त्व तयार करण्यासारखे आहे. विभक्त कुटुंब पद्धती, अर्थाजनासाठी पती-पत्नी दोघांनीही दिवसभर घराबाहेर असणं परिणामी संवादाचा अभाव. कित्येक आयांना आपण मुलांपासून दूर राहून अन्याय करतो आहोत अशी भावना असते आणि त्या अन्यायाचे परिमार्जन मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू त्याच्या साठी आणणे आणि त्याच्या 'गुड बुक्स' मध्ये राहायचा प्रयत्न करणे ह्यात होते. हट्टी व्यक्तीमत्त्वाची बिजं इथे रोवली जातात. आपल्या मुलांना आणि मुलींना चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला शिकवलं तरी पुरे. एक एक करून चांगले नागरिक वाढतील तसे असले प्रकारही कमी होतील. हे फार महत्त्वाचे. पण किती पालकांना (आजच्या) स्वतःला चांगलं आणि वाईटातला फरक ओळखता येतो? सुजाण पालकांचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे. आणि त्यांच्या चुका त्यांच्या पदरी घातल्या तर त्या सुधारण्या ऐवजी त्यांना राग येतो. माझा मुलगा वर्षभराचा असताना, मी अर्थातच तरूण होतो, माझा हात मुलावर खुप चालायचा. वडीलांनी ते पाहिले आणि मला शेजारी बसवून शांत स्वरात सांगितले, 'त्याच्याशी बोल, आणि तरीही त्याने चुका केल्या तर स्वतःची सहनशक्ती वाढव आणि संवाद चालू ठेव पण हात चालवू नकोस.' ह्या त्यांच्या सल्ल्यावर मी विचार केला, मला सल्ला पटला आणि मी तो अमलात आणला. माझे कौतुक म्हणून लिहीत नाहिए. पण 'आधी स्वत:ला सुधारा मग इतरांचे 'मॉरल पोलिसिंग' करा' अशा वाक्यांना उत्तर म्हणून लिहीतो आहे. मी कमालीची अशावादी आहे. हा 'आशावाद'च आत्मबळ वाढवितो. मुलांनाही आशावादी बनवा.

In reply to by पैसा

+ १००% अन असं शिकवायला प्रत्येक आई - बापाने पुढाकार घेतला पाहीजे. आपल्या लेकराची आपण नाही तर कोण काळजी करणार?

In reply to by पैसा

ज्योती, विचारी स्त्रीचे खरे रुप तुझ्या प्रतिसादातून दिसून येतंय. बरळण्यासाठी पिण्याची गरज असतेच, असे नाही, हे येथील काही प्रतिसादांवरुन समजले. आखाडी दोन दिवस आधीच साजरी झाली या धाग्यावर :)

In reply to by योगप्रभू

विचारी स्त्रीचे खरे रुप तुझ्या प्रतिसादातून दिसून येतंय. म्हणूनच अशा प्रतिसादांवर विचार करून, आशय समजुन घेऊन आपले विचार मांडायला मला आवडते.