तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले
बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले
काही हरवून काही गवसण्याचे दिन आले
पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले
भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले
मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर
उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर
गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3870
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता
मस्त !!
विचारल्या बद्दल आनंद झाला
In reply to मस्त !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभारी !!!
In reply to विचारल्या बद्दल आनंद झाला by श्रीकृष्ण सामंत
+१
In reply to आभारी !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दवांनी
थोडसं अवांतर
हे गाणं
In reply to थोडसं अवांतर by श्रीकृष्ण सामंत
"चिकीत्सा हा शोधाचा उगम आहे"
In reply to हे गाणं by ३_१४ विक्षिप्त अदिती
पडछाया
In reply to हे गाणं by ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वांचच बरोबर आहे
In reply to पडछाया by प्राजु
आवडले..
आभार
In reply to आवडले.. by प्राजु
सुन्दर
आभार
In reply to सुन्दर by पावसाची परी