Skip to main content

सर्सर आल्या सरीत...

शुक्रवार, 06/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि! डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर ! चेहर्‍यावरती चिंता होती चिंब तनांची मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची! शोधक नजरा, अंगचोरट्या, थरथर देही ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही! वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून ओला श्रावण हळूच डोकावला मनातून! मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा? चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा ! त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे ! म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी! -चैतन्य दीक्षित
लेखनविषय:

वाचने 2390
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

पावसाची सर पडून गेल्यासारखे वाटले, नव्हे ती तर पडतीच आहे बाहेर.

त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे !
हे खासचं.

मस्त! अप्रतिम! सुरेख!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मेवे, कस्चं कस्चं... :)

अल्लड कविता सुंदर खाशी सुबक ठेंगणी चैतन्याचे काव्य फुले या रिमझिमत्या श्रावणी! (श्रावणप्रेमी) रंगा

In reply to by चतुरंग

(श्रावणप्रेमी) रंगा दया, मोडक कहा और कैसे है उस्का पता करो| -एसीपी (काल्पनिक चक्र फिरवत) प्यारेद्युमन. मनमेघाची मस्त कविता...

सुरेख कविता!

प्रसन्न वाटलं वाचून.