Skip to main content

आरसा

लेखक शुचि
Published on गुरुवार, 05/07/2012
"तुला माझ्या प्रेमाची पर्वाच नाही!" - लटक्या रागाने , आपले गोबरे गाल फुगवत या महीन्यात पाचव्यांदा तरी नंदिनी हे उद्गारली. यावेळेस मात्र मी जय्यत तयारीतच होतो. मी उठलो. मेजावरचा तिचा सुबक आरसा घेऊन तिच्याजवळ गेलो आणि आरसा तिला देत मिष्किलपणे म्हणालो - "बाईसाहेब, हा प्रश्न तुम्ही योग्य व्यक्तीला का बरे नाही विचारत? तुझ्या सर्व तक्रारी उपकचेरींना धाडण्याऐवजी, मुख्य कचेरीलाच धाड ना. तुझे सर्व भावनाप्रधान, संवेदनशील मुद्दे हाताळण्यास मला तरी बघ बुवा हीच व्यक्ती योग्य आणि जबाबदार वाटते. तुझे काय मत आहे" ; ) वाचकहो, तुम्हाला वाटत असेल तोच आरसा माझ्या डोक्यावर आदळून त्याचे शंभर तुकडे झाले असतील नाही का? पण थांबा खरी गंमत तर पुढेच आहे. अहो बाई आणि आरसा एकत्र आल्यावर जे होतं तेच झालं. आरसा देतेघेतेवेळी क्षणभराकरता नंदिनीचे लक्ष तिच्या प्रतिबिंबाकडे गेले. तिचे चित्त विचलित झालेच आणि ती अगदी मंत्रमुग्ध होऊन स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पहात राहीली. आणि त्या पळभरात चतुर अस्मादिकांनी पोबारा केला. : ) _________वरील उतारा खालील कवितेचे स्वैर भाषांतर आहे_________________ Intimates by D H Lawrence • 160 poems by D H Lawrence Don't you care for my love? she said bitterly. I handed her the mirror, and said: Please address these questions to the proper person! Please make all requests to head-quarters! In all matters of emotional importance please approach the supreme authority direct! - So I handed her the mirror. And she would have broken it over my head, but she caught sight of her own reflection and that held her spellbound for two seconds while I fled.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2931
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

आपली काव्य वाचनाची रुची आवडली...

मला वाटले, आजकाल आरसा 'उत्तर' देत नसल्याने शुचि मामीने 'आरशात काय बदल करावा' असा धागा टाकला का काय. छान आहे हो स्वैरांतर.

आरसा हे एक अजब रसायन आहे. आरसा जितका आपला वाटतो तितकाच तो दुसर्‍याचा होत जातो..

सर्वांचे आभार. ही इंग्रजी (आंग्ल) कविता वाचून खूप हसले. स्त्रिया (कदाचित पुरुषदेखील अपवाद नसावेत) जिथे जिथे म्हणून आपली छबी न्याहाळता येईल तिथे न्याहळतात. मग धूसर काच असो, कारचा आरसा असो की ..... (जाऊ दे तिय्या जमत नाहीये) ;) पण एकंदर काय किहीही असामान्य रूप लाभलेली रुपगर्विता अथवा साधारण रूप लाभलेली सामान्य स्त्री यांच्यातला कॉमन धागा असतो "आ-र-सा"

रुपांतर आवडले, स्वाती