काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही?
या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का? :)
चला तर लागुया तयारीला.
साहित्य :
ग्रेव्हीसाठी :

१ मोठा कांदा बारीक चिरलेला.
२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
१/४ लहान चमचा हळद.
१-२ लहान चमचे लाल तिखटं.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.
कबाबसाठी :

१/२ किलो मटण.
१-१/२ चमचा आलं लसुण पेस्ट.
१ लहान कांदा.
२ चमचे लाल तिखट./ ३-४ लाल मिरच्या.
१ चमचा जीर.
१" दालचिनी.
४-५ लवंगा.
१०-१५ काळीमिरी.
१ वेलची.
२ हिरव्या मिरच्या.
कोथिंबीर.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.

अंडी. (एक सोडुन बाकीची उकडून घ्यावी.)
३/४ वाटी चणा डाळ. (३-४ तास भिजवलेली.)
ब्रेड क्रंम्स्
तळण्यासाठी तेल.
कृती :

कुकरमध्ये २ चमचे तेलावर कांदा गुलाबी होईस्तो परतुन घ्यावा. त्यात लाल तिखट, खडा मसाला, हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्यावं.

मसाल्यात मटण टाकुन परतुन घ्यावं. थोड पाणी वाढवुन, कुकरचं झाकण लावुन ३-४ शिट्या घ्याव्या.
मटण शिजत असतानाच बाजुला एका भांड्यात थोडं पाणी टाकुन चण्याची डाळ शिजवुन घ्यावी.

कुकर थंड झाला की मग झाकण काढुन त्यात चवी नुसार मीठ टाकावं आणि पाणी आटे पर्यंत परत शिजवावं.

गार झाल्यावर, मटण, शिजवलेली चणा डाळ आणि कोथिंबीर (पाणी न टाकता) मिक्सरमध्ये वाटुन घ्यावं.

उकडलेली अंडी सोलुन घ्यावी. वाटलेल्या मिश्रणाची पारी करुन त्यात अंड ठेवुन पारी बंद करावी.

एका बशीत अंड फेटुन घ्याव. दुसर्या बशीत ब्रेड क्रंम्स् घ्यावे. आवरणातली अंडी फेटलेल्या अंड्यात आणि ब्रेड क्रंम्समध्ये घोळून घ्यावी. नंतर ती हलक्या सोनेरी रंगावर तेलात तळुन घ्यावी.

एकीकडे मटण शिजत असताना ग्रेव्हीची सुरवात करावी. कढईत २ चमचे तेलावर कांदा परतुन घ्यावा.
त्यात लाल तिखट, हळद आणि दही टाकुन चांगल एकत्र करावं. आवश्यकते नुसार पाणी आणि मीठ टाकावं.
.
.
.
नान, रोटी बरोबर वा नुसतंच स्टार्टर म्हणुन सर्व्ह करावं.
प्रतिक्रिया
खतरा !!!!!! " ईस्ट ऑर वेस्ट
खाद्य साहित्यिक गंपा...यांची
फोटु पाहुन गतप्राण झालो आहे.
अमेरिकेत Australian गोट चे
In reply to फोटु पाहुन गतप्राण झालो आहे. by मराठमोळा
अवांतराला अनुमोदन. करुन पहाच
In reply to अमेरिकेत Australian गोट चे by विश्वनाथ मेहेंदळे
चूक
In reply to अमेरिकेत Australian गोट चे by विश्वनाथ मेहेंदळे
ममो, मला मिळत ना हो चांगल
In reply to चूक by मराठमोळा
:-)
शरणागती
:-)
In reply to शरणागती by पैसा
आर आय पी
चला पैलवानांचे मरण सत्कारणी
In reply to आर आय पी by तुषार काळभोर
लै भारी..
नर्गीसी अशा उर्दू मिश्रीत
आला...
In reply to नर्गीसी अशा उर्दू मिश्रीत by नाना चेंगट
नावाने चेंगट पण भलतेच तत्पर
In reply to नर्गीसी अशा उर्दू मिश्रीत by नाना चेंगट
काय बोलु
पोच.
भारी...
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\__/\_
गणपा
शब्द संपले! _/\_
जबरदस्त...
छान
छान
एक शंका...
चालेल की. खिमा शिजवताना
In reply to एक शंका... by मुक्त विहारि
मग खिमाच वापरावा म्हणतो,,
In reply to चालेल की. खिमा शिजवताना by गणपा
ग्रेट रेसिपी,ग्रेट गणपा..
वल्ला!!
शाप
कडक. उच्च पाकृ. अभिज्ञ.
जबरदस्त
सुंदर
शप्पथ!!
धन्यवाद.
नॉनवेज खात नाही
+१
In reply to नॉनवेज खात नाही by चतुरंग
जरा पत्ता द्या पाहु
नमन तुझ गणराया
१ ला फोटो छान आहे.आईस्क्रिम
ये हाथ
नही गणपा! इन***तुम्हारे हाथ
In reply to ये हाथ by दिपक
नशिब, हे फोटो त्या मारलेल्या
धन्य..
अप्रतीम
गणपा साहेब, आता तुम्ही एक मस्त हॉटेल काढाच ...
एवढी मस्त पाककृती वाचता वाचता
आईग्ग्ग! गणपा, काय रे हे?
मस्त
अर्रे मी शाकाहारी असुनही जीव
मायबाप वाचक आणि प्रतिसादकांचा
मी
कबाब
खतरनाक फोटो.पण काय