नर्गीसी कबाब

गणपा's picture
गणपा in पाककृती
1 Jul 2012 - 10:14 am

काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही?

या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का? :)
चला तर लागुया तयारीला.

साहित्य :
ग्रेव्हीसाठी :

१ मोठा कांदा बारीक चिरलेला.
२ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
१/४ लहान चमचा हळद.
१-२ लहान चमचे लाल तिखटं.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.

कबाबसाठी :

१/२ किलो मटण.
१-१/२ चमचा आलं लसुण पेस्ट.
१ लहान कांदा.
२ चमचे लाल तिखट./ ३-४ लाल मिरच्या.
१ चमचा जीर.
१" दालचिनी.
४-५ लवंगा.
१०-१५ काळीमिरी.
१ वेलची.
२ हिरव्या मिरच्या.
कोथिंबीर.
२ चमचे तेल.
मीठ चवी नुसार.

अंडी. (एक सोडुन बाकीची उकडून घ्यावी.)
३/४ वाटी चणा डाळ. (३-४ तास भिजवलेली.)
ब्रेड क्रंम्स्
तळण्यासाठी तेल.
कृती :

कुकरमध्ये २ चमचे तेलावर कांदा गुलाबी होईस्तो परतुन घ्यावा. त्यात लाल तिखट, खडा मसाला, हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्यावं.

मसाल्यात मटण टाकुन परतुन घ्यावं. थोड पाणी वाढवुन, कुकरचं झाकण लावुन ३-४ शिट्या घ्याव्या.

मटण शिजत असतानाच बाजुला एका भांड्यात थोडं पाणी टाकुन चण्याची डाळ शिजवुन घ्यावी.

कुकर थंड झाला की मग झाकण काढुन त्यात चवी नुसार मीठ टाकावं आणि पाणी आटे पर्यंत परत शिजवावं.

गार झाल्यावर, मटण, शिजवलेली चणा डाळ आणि कोथिंबीर (पाणी न टाकता) मिक्सरमध्ये वाटुन घ्यावं.

उकडलेली अंडी सोलुन घ्यावी. वाटलेल्या मिश्रणाची पारी करुन त्यात अंड ठेवुन पारी बंद करावी.

एका बशीत अंड फेटुन घ्याव. दुसर्‍या बशीत ब्रेड क्रंम्स् घ्यावे. आवरणातली अंडी फेटलेल्या अंड्यात आणि ब्रेड क्रंम्समध्ये घोळून घ्यावी. नंतर ती हलक्या सोनेरी रंगावर तेलात तळुन घ्यावी.

एकीकडे मटण शिजत असताना ग्रेव्हीची सुरवात करावी. कढईत २ चमचे तेलावर कांदा परतुन घ्यावा.
त्यात लाल तिखट, हळद आणि दही टाकुन चांगल एकत्र करावं. आवश्यकते नुसार पाणी आणि मीठ टाकावं.
.
.
.

नान, रोटी बरोबर वा नुसतंच स्टार्टर म्हणुन सर्व्ह करावं.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

1 Jul 2012 - 10:20 am | पियुशा

खतरा !!!!!!
" ईस्ट ऑर वेस्ट ,गणपा इज दी बेस्ट " __/\__ :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2012 - 10:42 am | अत्रुप्त आत्मा

खाद्य साहित्यिक गंपा...यांची आणखि एक ग्रेट पाककृती... मेहेनतीची दाद द्यावी अशी...

मराठमोळा's picture

1 Jul 2012 - 11:00 am | मराठमोळा

फोटु पाहुन गतप्राण झालो आहे. :)
ईतकी मेहनत करायला जमणार नाय ब्वॉ.. आणि इथे मटण पण चांगल मिळत नाही :(

फोटु आणि पाकृ बद्दल काय बोलावे? :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Jul 2012 - 1:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अमेरिकेत Australian गोट चे मटण मिळत असे आणि खुद्द त्याच देशात मटण मिळत नाही ?? देवा माझ्या, काय दिवस आले आहेत..
तूर्तास वरील वाक्य, "इथे मटण कुठे मिळते ते माहित नाही आणि शोधायचा एंथू नाही" असे वाचले आहे ;-)

बाकी मूळ पाकृ एकदम भारी. कधीतरी करून पहायची जबरदस्त इच्छा झाली आहे. बघू, इथे पुढे मागे नशिबाने मटण मिळू लागले तर करेनही..

अवांतर :- हीच पाकृ मटण ऐवजी चिकनची करता येईल असा विचार मनात आला. काय गणपा भाव, तुमचे काय मत ?

अवांतराला अनुमोदन. करुन पहाच आणि आम्हाला पण कळव कस लागतं ते. :)

मराठमोळा's picture

1 Jul 2012 - 2:25 pm | मराठमोळा

प्रतिसाद द्यायच्या घाईत तुमच्याकडुन वाचनात चूक झालेली आहे विमे :)
मटण मिळत नाही असे म्हंटलेले नाही. चांगलं मिळत नाही असे म्हंटले आहे.
अ‍ॅनीवेज् यावर उतारा म्हणून लगेच पेरी पेरी चिकन करावयास घेतले आहे :)

>>इथे पुढे मागे नशिबाने मटण मिळू लागले तर करेनही..
होय तर.. मुंबईत कसलं मिळतय मटण डोंबलाचं.. :) मध्यंतरी बोकडाच्या मटणाच्या नावावर इतर काही खपवले जात होते मुंबैत.. असे ऐकले आहे त्यामुळे तु आपलं चिकनच वापर.. ओळखायला सोपं असतं :P

स्पंदना's picture

2 Jul 2012 - 9:11 am | स्पंदना

ममो,

मला मिळत ना हो चांगल मटण, अगदी गोट , अन ते सुद्धा एक आख्खा पाय, म्हनजे न मिसळलेल. अस करु, मी मटण आणुन ठेवते तुम्ही बनवायला या, आपण बघु गणपाची रेशिपी कशी लागते ते. काय? ते उगा उसात शिरायच्या आधी डँडेनाँग होउन जाउदे पहिला.

सहज's picture

1 Jul 2012 - 11:48 am | सहज

कमाल, धमाल, बेमिसाल!!

पैसा's picture

1 Jul 2012 - 11:57 am | पैसा

मी तुला संपूर्ण शरणागतीचा तहनामा लिहून देते. या असल्या पाकृ बायका करायला कंटाळतात. खोटं वाटलं तर बायकोला विचार.

कुंदन's picture

1 Jul 2012 - 12:46 pm | कुंदन

अग पैसा तै ,
ओन साईटला आम्हाला इतर काही चांगला टी पी नसल्याने असले पालथे उपदव्याप करावे लागतात.

तुषार काळभोर's picture

1 Jul 2012 - 12:03 pm | तुषार काळभोर

मी मेलेलो आहे!!
Headshot suicide

RIP Pictures, Images and Photos

चला पैलवानांचे मरण सत्कारणी लावु.;-)

स्वाती दिनेश's picture

1 Jul 2012 - 1:39 pm | स्वाती दिनेश

मस्तच रे.. सॉलिड्ड दिसत आहेत कबाब! मेहेनतका फल अच्छाही होता है।
रविवार अगदी सत्कारणी लावलेला दिसतो आहेस,
स्वाती

नाना चेंगट's picture

1 Jul 2012 - 1:55 pm | नाना चेंगट

नर्गीसी अशा उर्दू मिश्रीत नावापेक्षा वैदिक नाव वापरले असते तर एकादशीच दुप्पट पूण्य मिळाले असते.

कुंदन's picture

1 Jul 2012 - 2:52 pm | कुंदन

आला संस्कृती रक्षक.

नावाने चेंगट पण भलतेच तत्पर ब्वॉ तुम्ही ;)

विशाखा राऊत's picture

1 Jul 2012 - 3:17 pm | विशाखा राऊत

मटण खात नाही पण हे सगळे बघुन एकदा चव घ्यायची इच्छा होते आहे.. तुस्सी ग्रेट हो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 3:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणते शब्द कौतुक करतांना वापरले पाहिजे ते कळत नाही.
बरं पोच दिली नै तर भावनाही पोहचत नाही, म्हणुन केवळ 'ग्रेट गंपा' म्हणुन थांबतो. :)

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

1 Jul 2012 - 3:40 pm | मोदक

भारी...

सुहास झेले's picture

1 Jul 2012 - 3:43 pm | सुहास झेले

बस्स्स.... !!

सानिकास्वप्निल's picture

1 Jul 2012 - 5:57 pm | सानिकास्वप्निल

आपण ग्रेट आहात :)

बाकी पाकृबद्दल आम्ही पामर काय बोलणार ... दिसतेय झकास लागणार ही झकासचं :)

कबाब बघूनचं तोंडाला पाणी सुटले :)

चिंतामणी's picture

1 Jul 2012 - 6:45 pm | चिंतामणी

तुझ्यासाठी आणि सानीकासाठी दरवेळी नवीन काय लिहायचे.

त्यामुळे मी दोघांसाठी एकच प्रतीसाद तयार करून ठेवला आहे.

नेहमीप्रमाणेच

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

स्वाती२'s picture

1 Jul 2012 - 8:57 pm | स्वाती२

शब्द संपले! _/\_

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 9:05 pm | मुक्त विहारि

मस्तच..

JAGOMOHANPYARE's picture

1 Jul 2012 - 9:14 pm | JAGOMOHANPYARE

छान

JAGOMOHANPYARE's picture

1 Jul 2012 - 9:14 pm | JAGOMOHANPYARE

छान

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 9:14 pm | मुक्त विहारि

मटणा ऐवजी, डायरेक्ट "खिमा" वापरला तर?

चालेल की.
खिमा शिजवताना थोड्या फार गुठळ्या होतात.त्यामुळे शेवटी खिमा पण वाटून घ्यावा लागेल.
शिवाय पारी करताना बाइंडिंग म्हणुन एक कच्च अंडं ही टाकाव लागेल.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 10:49 pm | मुक्त विहारि

ती हाडे , काढून टाकायचा वेळ आणि श्रम तरी वाचतील..

खतरा रेसिपी...प्रचंड आवडली.

पिवळा डांबिस's picture

1 Jul 2012 - 9:29 pm | पिवळा डांबिस

जियो मेरे लाल!!!
ह्याला म्हणतात पाक कृती!!!!
:)
बाकी तुझे पाककृतीचे धागे आता पेंटहाऊस मासिकासारखे होताहेत.....
'वाचायला' म्हणून सबब सांगून उघडायचं आणि मनमोहक फोटो पहात रहायचं!!!!!
:)

श्रावण मोडक's picture

1 Jul 2012 - 9:34 pm | श्रावण मोडक

त्या बोकडाने/बकरीने आणि कोंबडीने तुला दिलेला एक डेंजरस शाप ऐकू आला मला. तो तुला बाधू नये असं वाटत असेल तर भारतात येताक्षणीच गपगुमान संपर्क साध. त्या पशु-पक्ष्याने दिलेला उतारा सांगतो. तो अवलंबला नाहीस तर त्या शापाचा 'वर्ग' (रेज टू द पॉवर ऑफ टू) मीच करेन. बस मग बोंबलत...
भारतात येईपर्यंतच तो शाप मी रोखून धरला आहे.

अभिज्ञ's picture

1 Jul 2012 - 9:51 pm | अभिज्ञ

कडक.

उच्च पाकृ.

अभिज्ञ.

अमृत's picture

1 Jul 2012 - 10:28 pm | अमृत

आवडेश.. मटण आवडत नसल्याने चिकनवरच निभावण्यात येईल.

अमृत

वीणा३'s picture

1 Jul 2012 - 11:56 pm | वीणा३

करून कधी खाईन ते माहित नाही पण अजून बरेचदा येऊन फोटो बघून जाणार हे नक्की :)

स्मिता.'s picture

2 Jul 2012 - 2:59 am | स्मिता.

कसली निगुतीने केलेली पाकृ आहे! पाकृ खतरा आहे... फार्फार पेशंस लागणार हे दिसतंच आहे. (वेळ आणि कष्टांसोबतच भांडीसुद्धा भरपूर लागणार आणि ती धुवावी लागणार हा विचार मनात आलाच ;))

५० फक्त's picture

2 Jul 2012 - 7:18 am | ५० फक्त

धन्यवाद.

चतुरंग's picture

2 Jul 2012 - 7:42 am | चतुरंग

परंतु तुझ्या लाजवाब सादरीकरणापुढे मी साष्टांग घातलाय! <=०()8=<
काय ते निगुतीनं करणं, काय ते सुरेख फोटो - म्हणजे अक्षरशः एखाद्या जाहिरातीसाठी काढलेले व्यावसायिक फोटो असतात ना तितके उच्च आलेत! आहाहा!! निव्वळ नेत्रसुख.

मुद्द्याचं - पण तुला तसा सोडणार नाहीये मी. जेव्हा कधी भेटशील तेव्हा तुझ्या हातची एकतरी शाकाहारी पाकृ चापणारच आहे! :)

(चातक)रंगा

प्यारे१'s picture

2 Jul 2012 - 10:17 am | प्यारे१

असेच म्हणतो.

अवांतर : 'बायको परतता भारतात, गणपा शेफ आला फार्मात.'
अशी कविता करा रे कुणीतरी....

स्पंदना's picture

2 Jul 2012 - 9:20 am | स्पंदना

जरा पत्ता द्या पाहु तुमचा,
किडनॅप कराव म्हणतेय तुम्हाला. कसल खतरनाक जेवण बनव्तातुम्ही .
हं! असो फोटो बघुन परत भुक लागलेय, घरात द्वादशीच्या सांज्याच्या पोळ्या आहेत, गिळेन त्याच गपगुमान.

jaypal's picture

2 Jul 2012 - 10:22 am | jaypal

चीअर्स

१ ला फोटो छान आहे.
आईस्क्रिम सारखे दिसतय थोडेसे.

दिपक's picture

2 Jul 2012 - 12:50 pm | दिपक

ये हाथ मुझे दे दे गणपा.

स्पंदना's picture

2 Jul 2012 - 2:53 pm | स्पंदना

नही गणपा!
इन***तुम्हारे हाथ को हाथ भी नही लगाने देना.

शैलेन्द्र's picture

2 Jul 2012 - 3:33 pm | शैलेन्द्र

नशिब, हे फोटो त्या मारलेल्या बोकडाने पाहीले नाही, अन्यथा आपला इतका सदुपयोग होतोय हे बघुन त्याला दाटुन आले असते आणी गहिवरुन त्याने, स्वताची मान, कसायाच्या चाकुवर घासुन घासुन जीव दिला असता..

चिगो's picture

2 Jul 2012 - 4:56 pm | चिगो

व्वा मालक, व्वा.. स्साला, नुस्त्या फोटोंकडे पाहूनच खतम झालो आहे. तुमच्या हाती शिजून बोकड सरळ स्वर्गात पोहचला असेल..
क्या बात, क्या बात, क्या बात...

श्रीरंग's picture

2 Jul 2012 - 5:11 pm | श्रीरंग

अप्रतीम :)

गणपा साहेब, आता तुम्ही एक मस्त हॉटेल काढाच तेही ठाण्याला . म्हंजे माझी रोजची खादाडीची सोय होईल.

व हॉटेलला नावही द्या,"जादुई हात गणपा भाऊचा."

खरच मस्त लय भारी खरच तुमची रेसीपी इतरांच्या रेसीपीना विस्मरणात टाकायला लावते इतकी भारी असते.

शेवटी हीरा तो हीराच. तुम्ही मिपावरचे अस्सल हीरे आहात.

एवढी मस्त पाककृती वाचता वाचता (खरं म्हणजे त्यातले फोटो बघता बघता) डब्यातली दुधीची भाजी खातोय! !
याहून दुसरी जबर शिक्षा कोणती असेल! :(

रेवती's picture

2 Jul 2012 - 10:59 pm | रेवती

आईग्ग्ग! गणपा, काय रे हे? किती सुंदर फोटू.

सुनील's picture

2 Jul 2012 - 11:16 pm | सुनील

पाकृ आणि फोटो मस्तच! पण निगुतीने करण्याएवढा पेशन्स नाही बॉ आपल्यात!

मृत्युन्जय's picture

3 Jul 2012 - 10:14 am | मृत्युन्जय

अर्रे मी शाकाहारी असुनही जीव कळवळला रे. खतरनाक दिसताय फोटो.

मायबाप वाचक आणि प्रतिसादकांचा ॠणी आहे.

सुमीत भातखंडे's picture

3 Jul 2012 - 4:20 pm | सुमीत भातखंडे

मी पण शाकाहारीच, पण फोटो बघून खलास.

हरकाम्या's picture

3 Jul 2012 - 10:25 pm | हरकाम्या

गणपाजी ही अमर राणे वा सन्जीव कपूर वगैरे चिल्लर पार्टी वाटायला लागलीत.

नेहरिन's picture

6 Jul 2012 - 4:23 pm | नेहरिन

खतरनाक फोटो.पण काय करणार..?मी पक्कि शाकाहारि आहे न !!!!!