Skip to main content

बुगडी माझी सांडली गं या लावणीचे विडंबन

बुगडी माझी सांडली गं या लावणीचे विडंबन

Published on 01/07/2012 - 18:30 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या मित्राने बुगडी माझी सांडली ग या लावणीचे विडंबन केले आहे अर्थात गीतकारांची माफी मागून. महाविद्यालयीन तरुणीला काही विषयात ए.टी.के.टी. लागल्यावर भावनांचा कल्लोळ या लावणी मधून सादर करण्याचा प्रयत्न. करीअर लावणी ए टी के टी मला लागली ग यंदा निकालाला खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला माझ्या वर्गातला तरुण पाहतो कट्ट्यावर बसून मला तो न्याहाळतो कधी रोज डे ला गुलाब पाठवितो काही नाहीच जमले ग बाई, पेपर लिहायला, पेपर लिहायला (१) ए टी के टी मला लागली ग यंदा निकालाला खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला आज अचानक एसएमएस आला निकाला मधी झालाय गफला फार धाडसाने निकाल पहिला वाहिला अश्रूचा पाट मी बाई राहिल्या विषयाला, राहिल्या विषयाला ए टी के टी मला लागली ग यंदा निकालाला खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला कठोर हायत कि माझे बाबा उपदेश त्यांचा, ठेव जरा ताबा मिळता पदवी तौबा तौबा लावतील तरुण रांगा बाई , माझ्या स्वयंवराला ए टी के टी मला लागली ग यंदा निकालाला खबर नका सांगू ग माझ्या पिताश्रीला
लेखनविषय:

याद्या 1578
प्रतिक्रिया 1

पण खरे तर उलट आहे.. मुलींकडे बघता बघता, मुलेच जास्त नापास होतात..