काँबीनात्सिऑन म्हणजे काँबीनेशन.जर्मन मंडळी सोप्या शब्दाला कठीण करतात नाही?
पण हा पदार्थ आहे इटालियन,पास्त्यांच्या वेगवेगळे प्रकार एकत्र मिसळून केलेले हे काँबीनेशनअसल्याने दिनेश ह्या प्रकाराला 'बहुच्या देशातील मिसळ' म्हणतो.अर्थात आपल्या मर्हाटमोळ्या मिसळीसारखा झणझणीत हा पदार्थ नव्हेच,पण तरीही एका वेगळ्या चवीचा रुचकर पदार्थ चीजप्रेमींसाठी !
वि.सू.-कॅलरीबिलरींचा विचार न करता खायचा हा पदार्थ आहे.
साहित्य-
पाऊण वाटी चपटा पास्ता,पाऊण वाटी नळकांड्यांच्या आकाराचा पास्ता
४०,५० स्पॅगेटी काड्या,१ छोटा खोका २०० ग्रामचा अनव्हिप्ड क्रीम(श्लागझानं),पाव कप दूध
२५०ग्रामचा पिझ्झा टोमॅटोचा डबा किंवा ४,५ टोमॅटो उकडून,साल काढून,कुस्करुन.पण प्युरी करु नका.
१ते १.५ मोठी वाटी भरून किसलेले चीज(शक्यतो गौडाचीज),मीठ,तेल
कृती-
बाजारात बर्याच प्रकारच्या स्पॅगेटी व पास्ता मिळतात त्यातील चपटा,नळकांड्याच्या आकाराचा,सर्पिल(twisted) इ.पैकी कोणतेही २ प्रकार निवडा.पातळ काड्यांची स्पॅगेटी घ्या. पास्ताप्रकार वेगवेगळे शिजवून घ्या, स्पॅगेटीही वेगळी शिजवून घ्या.
जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा,त्यात १ चमचा मीठ व १ चमचा तेल घाला व एक प्रकारचा पास्ता घाला आणि शिजवा.शिजल्यावर चाळणीवर घालून पाणी पूर्ण निथळू द्या.दुसरा पास्ता शिजला की पहिला प्रकार चाळणीतून ताटलीत काढा,म्हणजे तेवढ्या वेळात पाणी पूर्णपणे निथळेल.याच प्रकारे स्पॅगेटीही शिजवा.
दोन बेकिंग डिश मध्ये(लहान,साधारण ६'' ची)थोडे दूध घाला,त्यावर अनव्हिप्ड क्रीम घाला,थोडे टोमॅटो घाला.मीठ टोमॅटोमध्ये मिसळून घ्या म्हणजे सगळीकडे चांगले लागेल. त्यावर हे शिजवलेले पास्ताप्रकार पसरा.
पुन्हा टोमॅटो व क्रीम घाला.किसलेले चीज घालून पूर्ण डिश झाका.ओळखीचा भारतीय स्वाद हवा असेल तर आलेलसूण मिरचीचे वाटण टोमॅटोत मिसळा.१८० ते २०० अंश सेंटिग्रेडवर २५ ते ३० मिनिटे बेक करा.
गोल्डन ब्राऊन काँबीनात्सिऑन खाण्यासाठी तयार!
त्याच बेकिंग डिशमधून गरमगरम खा.हवे असल्यास वरून मीठ व मिरपूड घाला.
बेकिंग डिश मधून ताटलीत/वाडग्यात वाढणे जिकिरीचे होते म्हणून लहान बेकिंग डिश वापरा.त्याच बेकिंग डिशमधून खाणे सोयीचे होते.
Taxonomy upgrade extras
वाचने
22013
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम्मी
अगदी..
In reply to यम्मी by सहज
आम्हाला खाऊ घाला म्हणजे झालं ...
In reply to अगदी.. by स्वाती दिनेश
या तर ..
In reply to आम्हाला खाऊ घाला म्हणजे झालं ... by छोटा डॉन
आनंद वाटला ...
In reply to या तर .. by स्वाती दिनेश
'चील्ड वन'
वाव
पास्ता प्रकार
In reply to वाव by वरदा
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
फोडणीचा भात!
In reply to छान by चित्रा
छान
स्वाती,
लसान्या... Lasagna
उम्म्म्म्म्म्म्म्म्म
तुम्ही
नक्की कुठे?
In reply to तुम्ही by वरदा
मैत्र
वा!
ओ..
In reply to वा! by विसोबा खेचर
उम्म्म्ह !
In reply to ओ.. by केशवसुमार
कालच मी तो
In reply to ओ.. by केशवसुमार
तात्या
कल्पना नाही!
In reply to तात्या by वरदा
टेस्ट
सुंदर.....
In reply to टेस्ट by स्वाती दिनेश
ह्म्म
आजच करणार होतो...
६" :)
In reply to आजच करणार होतो... by प्रभाकर पेठकर
गौडाचीज?
बरोबर ..
In reply to गौडाचीज? by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही ना ...
In reply to बरोबर .. by स्वाती दिनेश
मिळतं..
In reply to नाही ना ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तंच
स्वातीताई,
मस्त.