Skip to main content

गंध फुलांचा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 30/06/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
"गंध फुलांचा" ऐकल्यावर मनात नेमकं काय दाटायचं कुणास ठाऊक मला तेव्हा नेमकं काय वाटायचं आतून येणारी हाक त्या हाकेतली आर्त स्पंदनं याचा ठावच घेतला नव्हता मनातल्या वादळाचा तेव्हा अर्थच उमगला नव्हता येणारी हाक कुणाची होती की होते ते फक्त मनाचे खेळ? ती होती का "आशा"च्या आवाजाने निर्मिलेली एक अगम्य, वेडी आशा.....? की अव्यक्त भावनांची हळुवार अमूर्त भाषा? मग जळमटं बाजूला सारून जुन्या कपाटातून काढलीच बाहेर माझ्या आयुष्याची वही तिची पानं थोडी कोरी थोडी भरलेली तुझ्यासमोर ठेवली तेव्हा सारं काही उमगलं बांध फोडून मनात दाटलेलं त्या वहीवर अलगद उमटलं भरलेल्या पानांना तुझ्या अक्षराची सोबत झाली कोरी पानं वाट बघत होतीच तुझंच अक्षर उमटण्याची मला न समजलेलं गणित तुझ्याच अक्षरात सोडवण्याची जास्त काही लिहीत नाही एवढंच तुला सांगायचं होतं, यापुढे..... उघडलेल्या वहीवर अक्षर तुझंच असेल, एवढंच वचन द्यायचं होतं. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - ब्लॉगवर प्रकाशित - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - ही कविता जालरंग प्रकाशनाच्या जालवाणी अंकात माझ्याच आवाजात इथे ऐकता येईल.
लेखनविषय:

वाचने 1863
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत.. "तू मुर्ख आहेस" ऐकल्यावर मनात नेमकं काय दाटायचं कुणास ठाऊक मला तेव्हा नेमकं कविता करावंस वाटायचं आतून वळवळणार्‍या किड्यांची हाक त्या हाकेमुळे स्वस्थ न बसवणं याचा ठावच घेतला नव्हता सुलेमानी किड्यांचा तेव्हा अर्थच उमगला नव्हता खरच ती कविता होती की होते ते फक्त किड्यांचे खेळ? ती होती का "ओकारीच्या"च्या आवाजाने निर्मिलेली एक अगम्य, काव्यजिलेबी.....? की अव्यक्त भावनांची झालेली नुसतीच भेसळ? मनातली मळमळ आंजावर सांडून एकदाची कविता काढलीच बाहेर आंजावरची फुकटची वही तिची पानं थोडी फाडलेली थोडी खरडलेली तुमच्यासमोर ठेवली तेव्हा सारं काही शांत झालं बांध फोडून पोटात दाटलेलं त्या वहीवर पचकन उमटलं सडलेल्या कवींना तुमच्या दुर्लक्षिततेची सोबत झाली विडंबनं करणारी वाट बघत होतीच माझ्या साहित्यिक जिलेब्या पडण्याची मलाच न समजलेल्या कविता तुम्ही फटक्यांनी चोपण्याची जास्त काही सांगत नाही एवढंच तुम्हाला सांगायचं होतं, यापुढे..... उघडलेल्या मुख्यपानावर रोज एक-दोन ओकार्‍या माझ्याही असतील, एवढंच वचन द्यायचं होतं. धन्यवाद. ह. घ्या अशी अपेक्षा. :)

In reply to by मराठमोळा

विडंबन आणखी चांगले होऊ शकले असते :) शब्द आवडले नाहीत. प्रांजळ मताबद्दल क्षमस्व.