Skip to main content

अंडा कबाब / टिक्की (एक झँटामेटीक अन क्विक रेसेपी )

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 29/06/2012 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
अंडा कबाब / टिक्की (एक झँटामेटीक अन क्विक रेसेपी ) साहित्य : - १. उकडलेले अंडे ४ , २. उकडलेले बटाटे मध्यम ३ , ३. लाल तिखट १ चमचा. ४. गरम मसाला १ चमचा ५. धने पावडर १/२ चमचा. ६ . चिकन मसाला १ चमचा. ७. मटण मसाला १ चमचा. ८. मॅगी सब्जी मसाला १ चमचा. ९ . मीठ चवीनुसार. १०. कोथिंबीर बारीक चिरून. ११. ब्रेड क्रम्स ( गरज वाटली तर ) कृती : बटाटे अन अंडे एकत्र स्म्याश करून घ्या . आता त्यात सर्व मसाले ,मीठ अन कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान कुस्करून घ्या आता हातावर छोट्या टिक्क्या करून घ्या . अन आता थोड्या तेलात तव्यावर / पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या > झाले .अंडा कबाब तय्यार ! अंड अन बटाटा ? कॉम्बीनेशन ऐकायला जरी विचित्र वाटल तरी खायला एकदम चविष्ट लागतात बरे हे कबाब ;) ( विशेष आभार : माझी वहीनी सौ .अश्विनी :) )

वाचने 17185
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

आता हातावर छोट्या टिक्क्या करून घ्या .>> हे चुकुन आता छोट्या हातावर टिक्क्या करून घ्या असे वाचले ;) पाकी पाकृ मस्त च !! ( ईमामपुरा वरून साभार आली वाटत पाकृ ;) )

धागा वाचला. अंड खात नसल्याने केवळ पियुच्या शतकी धाग्याच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रतिसाद देत आहे. व्यंजन चविष्ट असावे पण माझा पास.... :-)

In reply to by नाना चेंगट

खरय. वैदिक पद्धत सांगितलेली नसल्याने माझ्याकडुन देखील पास.

छान ग, चवीला कसे झाले होते कबाब? तु खाऊन पाहिलेस का? ;)

In reply to by शुचि

@ स्नेहा अन शुची तै मी अंड खात नाही , बाकीच्यांनी सांगितले कबाब भारी झाल्येत म्हणुन;) तुम्ही दोघी करा अन मला सांगा कसे झाल्ये ते :p

आधी हा प्रकार खाल्ला नाहीये पण अंडी, बटाटे आणि तर मसाला आहे तर छानच लागत असणार. एखादे वेळी स्नॅक्स करता करून बघेन.

कबाब एकदम लजीज दिसत आहेत पियुडे :) बटाटा आणी अंडे मस्तच लागतं :) आजच करणार हे :)

चांगला प्रयोग आहे... फलितही चांगले असणार... उत्तम...उत्तम...उत्तम...! अशीच पाक-कुशल प्रगती होत राहो. हा आशिर्वाद....आपलं सॉरी...भगवंता चरणी प्रार्थना ... ;-) अ-वांतर-या पाक-कृतीत कुणाचा हात आहे...? ;-)

अंडं आणि बटाटा स्मॅश केले असल्याने एकूण प्रकार पटला (एरवी कबाब आणि तोही अंड्याचा हे डोक्यावरूनच चालले होते). खाल्ल्यावर पुढचं ठरवू. आता इथं हाटेलात कुठं हे मिळतं का हे पाहणं आलं. नाही तर प्रवास करावा लागेल.

In reply to by श्रावण मोडक

स्मॅश नाही हो म्हणत...मॅश म्हणा. स्मॅश आणि मॅश शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. @पियुशा - रेसिपी छान.

अरे वा.. वेगळीच पाकृ.. एकदा एका ढाब्यावर उकडलेले अंडे चकत्या करुन ते बटाटा भजी प्रमाणे तळुन मिळालेली डिश खाल्ली होती. ती आवडली होती. :) रच्याकने १. ही पाकृ अंडे न घालता कशी करता येईल? २. या पाकृचे काही वैदीक वर्जन आहे का? ३. ही पाकृ सेक्सी पद्धतीने कशी करता येईल? ४. सदर पाकृ पुरुष सदस्याने केली तर चव तशीच येईल का? ५. स्त्री सदस्यांनी ही पाकृ मराठी आंतरजालावर केल्याचे काही स्टॅटीस्टीक्स आहेत का? ६. आयटी बायको असल्यास ही पाकृ कशी करावी याबद्द्ल तज्ञांचे मत काय? ७. या पाकृने बनवलेल्या पदर्थ खाण्याची कुणाला सवय लागल्यास त्यास ईंटरवेंशनची गरज भासेल का? ८. सती जाण्याआधी ही पाकृ केल्यास त्या विधीचे महत्व काय? जाणकारांनी प्रकाश टाकून माझ्यासारख्या पामरांना योग्य दिशा दाखवावी. :)

In reply to by मराठमोळा

जाणकारांनी प्रकाश टाकून माझ्यासारख्या पामरांना योग्य दिशा दाखवावी--> दिशा (पांडे) पहावी. ही दिशा अयोग्य वाटत असल्यास दरवाजातून बाहेर पडून वाम मार्गाने पस्तीस पाऊले चालल्यावर फाटा कुठे आहे ते दिसेल ;) (हलके घ्या) -स्वयं"प्रकाशित" आनंदी गोपाळ

In reply to by आनंदी गोपाळ

आजची खादाडी + आजची बायडी हे कॉम्बो डील फारा दिवसांनी दिसले :) गेले ते दिन गेले :(

अंडी आणि बटाटा हे न आवडलेल्या काम्बिनेशनपैकी एक आहे,त्यामुळे पास. तुमच्या शाळेत इयत्ता दुशली ब मध्ये असला डबा चालतो का हो ?

In reply to by वेताळ

बघायचीच असेल, तर वर फटू आहेत. करून खा. नुस्ते बघून काय होईल?