Skip to main content

बोगदा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच एकाबाजूने येणारा अन् दुसर्‍याबाजुने जाणारा . मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो विरुद्ध दिशेला . येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही न करकरता बिनविरोध चालू आहे . पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता . बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन् डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड" या दोघांना ओलांडून येणारा अनुभवाची शाल पांघरलेला "जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| २६/०६/२०१२
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1944
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आयुष्याबद्दलचा एक वेगळा विचार फार सहजपणे मांडलाय या कवितेतून...

थोडा थोडा कळ्या मेरेकु, म्हणजे तुम्ही येणार्‍या उद्याकडे न पहाता आजमधे पहाता/जगता आणि आजचा अनुभव काहीतरी शिकवुन जातोय असं काही आहे का ते :)