श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास;
श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास?
स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.
एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.
तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!
कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी!
मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील!
मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात:
एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.
इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!
मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
39758
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
निळी अन्टीक्युटी =३००.०० वेज
शिल्पा>तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला
मला समजलंय ते असं (फक्त वरचा
In reply to शिल्पा>तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला by संजय क्षीरसागर
वेळात वेळ काढुन नाही पहिल्यांदा! आणि प्रत्येक वेळी पहिल्यांदा!
In reply to मला समजलंय ते असं (फक्त वरचा by शिल्पा ब
चर्वितचरण...
वीथ ड्यू रिस्पेक्ट सर,
In reply to चर्वितचरण... by प्रभाकर पेठकर
काय सांगता....
In reply to वीथ ड्यू रिस्पेक्ट सर, by संजय क्षीरसागर
आपण नोंद घेतलीत हे काय कमीये
In reply to काय सांगता.... by प्रभाकर पेठकर
नवी नोंद.
In reply to आपण नोंद घेतलीत हे काय कमीये by संजय क्षीरसागर
>`हा धागा वाचनमात्र करावा'
In reply to नवी नोंद. by प्रभाकर पेठकर
कलीयुग.
In reply to >`हा धागा वाचनमात्र करावा' by संजय क्षीरसागर
तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं
In reply to कलीयुग. by प्रभाकर पेठकर
>>माझ्या दृष्टीनं प्रत्येक
In reply to तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं by संजय क्षीरसागर
ज्यांना हे कलियुग आहे असं वाटत नाही ते सर्व!
In reply to >>माझ्या दृष्टीनं प्रत्येक by बॅटमॅन
ह्म्म..असो.
In reply to ज्यांना हे कलियुग आहे असं वाटत नाही ते सर्व! by संजय क्षीरसागर
??
In reply to तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं by संजय क्षीरसागर
तुम्ही एक नक्की ठरवा
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
तुम्ही वरती एका प्रतिसादात
स्वातंत्र्य आणि स्वच्छंद
In reply to तुम्ही वरती एका प्रतिसादात by वीणा३
सर्व उलटसुलट चर्चा पाहून आणि
येस गवि
In reply to सर्व उलटसुलट चर्चा पाहून आणि by गवि
गविज् बॅक, आय से..... छान
गरज आणि हव्यास..
>`भरल्यापोटीचे शब्दच्छल' या शब्दाला आक्षेप नोंदवतो
In reply to गरज आणि हव्यास.. by प्रभाकर पेठकर
हरकत नाही.
In reply to >`भरल्यापोटीचे शब्दच्छल' या शब्दाला आक्षेप नोंदवतो by संजय क्षीरसागर
संकेतस्थळावर प्रत्येक जण भरल्या पोटीच येतो
In reply to हरकत नाही. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to गरज आणि हव्यास.. by प्रभाकर पेठकर
समाप्त.
हा वाद दुर्दैवी...
In reply to समाप्त. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to हा वाद दुर्दैवी... by योगप्रभू
योगप्रभू, धन्यवाद..
आणि हा घ्या १०० वा प्रतिसाद :-)
एक मजेशीर प्रसंगा डोळ्यासमोर
मी साठ वर्षांचा होणार नाही असं नाही
In reply to एक मजेशीर प्रसंगा डोळ्यासमोर by वीणा३
साठ ही आज कुणासाठी कल्पना
In reply to मी साठ वर्षांचा होणार नाही असं नाही by संजय क्षीरसागर
>साठी बुद्धी नाठी ही अख्ख्या जगासाठी रिअॅलिटी आहे , कारण
In reply to साठ ही आज कुणासाठी कल्पना by बॅटमॅन
संजय साहेब