जसे जसे बाबांचे गाव जवळ येत होते तशी येणा-या प्रत्येक स्टेशनवर गाडीतली भक्तांची गर्दी वाढतच होती. छातीला लटकणारे बिल्ले, गळ्यातले गमछे, खांद्यावरील बाबांच्या नाव लिहिलेल्या थैल्या, हातातील पोथ्या ह्यावरून बाबांचे भक्त चटकन ओळखू येत होते. डब्यात आता त्यांचीच संख्या जास्त झाली होती.
" किती डॉक्टरांना दाखवलं, कोणत्याही उपचारांचा, कुठल्याही औषधांचा परिणाम झाला नाही, नुसता पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र फायदा काहीच झाला नाही, किती प्रार्थना केली, किती देवांना नवस बोललो असेल, त्याची गणतीच नाही. काहीही फायदा झाला नाही, सगळीकडून निराशाच हाताला लागली, काय करावं कळेनासं झालंय, त्रास बघवत नाही हो! पण आपलं माणूस आहे, सोडता थोडीच येतं, काही करायचं बाकी ठेवलं नाही, बाबांबद्दल ऐकलं अन तसाच धावत आलो!" विनायक शेजारी बसलेल्या भक्तांना सांगत होता.
" अगदी योग्य केलंत!" शेजारचा भक्त म्हणाला " सगळं काही ठीक होईल! बाबांचा महिमाच आहे तसा! एकदा का बाबांची कृपा झाली की सगळं काही सुरळीत होईल बघा! बाबांचा आशीर्वाद घ्या! त्यांचा गंडा, अंगारा जे काही मिळेल ते घेउन जा! तो काय चमत्कार घडविल ते बघाच तुम्ही!" बाजूचा भक्त म्हणाला.
" कित्येक लोकांच्या असाध्य व्याधी बाबांच्या कृपेमुळे चुटकी सरशी दूर झालेल्या आहेत. सगळे उपाय करून थकलेत की लोक येतात बाबांच्या चरणी!" दुसरा म्हणाला.
" पण एकदा का तिथे पोहोचला की माणूस नेहमीसाठी तिथलाच होऊन जातो. आयुष्यच बदलून जाईल तुमचं! बघालच तुम्ही!" तिस-या भक्ताचे म्हणणे पडले.
" मी तर गेल्या वीस वर्षापासून जातोय नेमानं! कळेल हळू हळू तुम्हाला! काय काय अनुभव आलेत लोकांना!" चौथ्याने म्हटले.
जसे जसे लोक भेटत होते तसे तसे एक एक अनुभव कानावर येत होतेच. क्षणोक्षणी त्याचा विश्वास वाढतच चालला होता.
गावात उतरल्या वर त्याला एक वेगळीच उर्जा जाणवली, गावात प्रत्येक गोष्टीवर बाबांचा ठसा होता, सर्व गावच दूर दूरून आलेल्या भक्तांनी फुलून आले होते, देशातल्याच विविध प्रांतातून नव्हे तर परदेशातून आलेल्या भक्तांना बघून तर तो अधिकच भारावला, कुणाला कुणाची भाषा कळत नसली तरीही सर्वांच्या चेह-यांवरचा भक्तीभाव सारखाच होता.
आश्रमाची भव्यता बघून तर तो नतमस्तकच झाला. सेवाधारी अन साधकांची नम्र वागणूक, भक्तांचा शिस्तबद्ध संचार, धर्मशाळेतील स्वच्छता, अन माफक दरातले सुग्रास अन्न बघून त्याच्या मनात कुठलाही किंतु उरला नाही.
'उगाच ह्याला त्याला साकडं घालण्यांत वेळ घालवला, इथल्या सारखी भक्ती कुठल्याही देवस्थानात नजरेस आली नाही. बाबांचा आशिर्वाद आपल्याला संकटातून बाहेर काढेल नक्कीच!' विनायक विचार करीत होता.
आता त्याच्या मनातील निराशेचे मळभ दूर झाले होते.
आशीर्वादासाठी लागलेल्या लांब रांगेत त्याचा क्रमांक बराच पुढे होता. थोडे समोरच उभ्या असलेल्या काही स्त्रियांनी बाबांच्या पायावर ठेवायला आणलेल्या गोड बाळांकडे तो बघत असताच बातमी आली की दर्शनाचा कार्यक्रम अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आला होता. बाबांना हृदय विकाराचा झटका आला होता, आश्रामातीलच सुसज्ज इस्पितळात बाबांना भरती करण्यात आले होते.
वातावरण क्षणात गंभीर झाले. गेल्या ब-याच काळापासून बाबांची प्रकृती खूपच खालावलेली होती. म्हणूनच आजकाल बाबांचे दर्शनही दुरूनच होत असे. उपचार सातत्याने सुरूच होते. पण कुठल्याही उपचारांना बाबांच्या व्याधी दाद देत नव्हत्या. त्यातच वर्षभरातच बाबांना आलेला हा हृदयविकाराचा दुसरा झटका होता हे त्याला बाकी भक्तांकडून कळले. सगळे उपाय करून झाले होते, पण परिस्थितीपुढे सर्वच हतबल होते, कुणालाही काही सुचेनासे झाले होते.
" चिकीत्सेच्या सर्व आधुनिक सोयी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेतच, देशोदेशीचे बाबांचे शिष्य असलेले असलेले निष्णात डॉक्टर स्वत: जातीने बाबांवर उपचार करताहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश यावे आणि बाबा पूर्वीप्रमाणेच आपल्यात यावेत ह्यासाठी आपण सर्वशक्तीमान ईश्वराची प्रार्थना करूया!" बाबांच्या पट्टशिष्याने सर्व भक्तांना आवाहन केले.
विस्तीर्ण सभामंडपातील असंख्य भक्तजनांसोबत विनायकनेही बाबांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना केली आणि तो गावी परतला.
(समाप्त)
वाचने
8296
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर्णन छान पण उद्देश काय?
+१
In reply to वर्णन छान पण उद्देश काय? by श्रीरंग_जोशी
पुढे वेताळाने विक्रमास विचारले
शीघ्र विडंबन आवडले...
In reply to पुढे वेताळाने विक्रमास विचारले by मराठे
धन्यवाद...
In reply to पुढे वेताळाने विक्रमास विचारले by मराठे
कथा आणि कथेतील कलाटणी आवडली
वाचल्या वाचल्या कथा झटकन
सहमत!
In reply to वाचल्या वाचल्या कथा झटकन by कानडाऊ योगेशु
जयनीत मस्त
बुवाबाजीच्या एकुण प्रकारावर
बुवाबाजीच्या एकुण प्रकारावर
भाष्य
वस्तुनिष्ठ..
मस्त कथा आहे. ज्यांना कळाली
वा........वाह ...
मस्त जमली आहे कथा. अतिशय
मस्त लिहिलंस रे, धन्यवाद.
शेवटी बाबा सुद्धा डॉक्टरच्या
अपात्री दान...
In reply to शेवटी बाबा सुद्धा डॉक्टरच्या by शिल्पा ब
पाटी पडणे.
आनंद आहे...
In reply to पाटी पडणे. by आनंदी गोपाळ
'पाटी पडणे' ?
In reply to आनंद आहे... by श्रीरंग_जोशी
प्रतीसादा साठी सर्वांना मनापसुन धन्यवाद.
मार्मिक ! कथा विस्तार अगदी
छान
बाबा आपण स्वतः माणूसच होते
नकली नोटेचा व्यवहार
ती तर त्यांची स्वत्यांची आहे...
In reply to नकली नोटेचा व्यवहार by जयनीत
श्रीरंग, तुमचं म्हणणे बरोबर
In reply to ती तर त्यांची स्वत्यांची आहे... by श्रीरंग_जोशी