इंडीयन रोस्टी
हा थोडा German Rösti च्या जवळपास जाणारा पदार्थ. त्याचं नक्की नाव माहित नाही , आम्ही याला घरी पिझ्झा म्हणतो. लहान मुलांसाठी थोडा वेगळा प्रकार आणि सिमला मिरची न खाणार्यांनीही नक्की करुन पहा. :-)
लागणारा वेळ:
१ रोस्टीसाठी १५ मिनीटे
लागणारे जिन्नस:
४ मोठे बटाटे
१ मध्यम लाल कांदा बारिक चिरून
१ मध्यम टोमॅटो बारिक चिरून
२ मध्यम सिमला मिरची बारिक चिरून
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
धणे पावडर
जीरे पावडर
लाल तिखट
चवीपुरते मीठ
चवीपुरती साखर
तेल
क्रमवार पाककृती:
१. चिरलेला कांदा, टोमॅटो , सिमला मिरची, कोथिंबीर एकत्र करुन घ्या.
२. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्या.
३. त्यामधे १ छोटा चमचा धणे पावडर, १ छोटा चमचा जीरे पावडर, १ छोटा चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
४. तवा थोडा तापवून , त्यावर थोडं तेल सोडून बटाट्याचा किस गोल आकारात पसरवून घ्या.
५. आत त्यावर कांदा, टोमॅटो , सिमला मिरची एकत्र मिश्रण पसरवून झाकून ठेवा.
६. ६-७ मिनिटा नतर झाकण काढून पिझ्झा अर्धा दुमडा.
७. तयार पिझझा हा असा दिसतो.
अधिक टिपा:
१. तव्यावर बटाट्याचा किस टाकण्याआधी थोडं तेल सोडाव, तसंच कडेने तेल सोडलं की क्रिस्पी होतात.
२. हे गरम असतानाच खाल्लं तर छान चव लागते.
३. लहान मुलांसाठी करायच असल्यास मिश्रणात चीझ घातल्यास चांगले लागतात.
४. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्यावा. अन्यथा काळा पडतो.
५. यात साखर असल्याने थोडा करपल्यासारखा दिसतो.
६. मक्याचे दाणे सुद्धा चांगले लागतात यात. आतले मिश्रण आपल्या आवडीनुसार घाला पण सिमला मिर्ची हवीच्..तिच्यामुळेच वेगळी चव येते.
वाढणी/प्रमाण:
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ८ होतात.
पूर्वप्रकाशितः घरगुती पिझ्झा
वाचने
9778
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वेगळी पाकृ. आहे. छान
आत्ताच केली. लेकाला आवडली.
चान चान आहे....
वा!
छानच आहे
करुन पहायला हवं, बटाटा हे या
वेगळा प्रकार छान आहे. फोटो
याला इंडियन का म्हणायचं? हा
In reply to याला इंडियन का म्हणायचं? हा by JAGOMOHANPYARE
हौ अबौट मूलनिवासी रोष्टी?
In reply to हौ अबौट मूलनिवासी रोष्टी? by बॅटमॅन
हाण्ण तिच्यायला. काय्य निब्बर
In reply to हौ अबौट मूलनिवासी रोष्टी? by बॅटमॅन
मूल निवासी रोष्टी हाच शब्द
In reply to मूल निवासी रोष्टी हाच शब्द by JAGOMOHANPYARE
हा काही नीट जमला नाही
In reply to हा काही नीट जमला नाही by बॅटमॅन
मूलनिवासी बाद
In reply to मूलनिवासी बाद by सुनील
मान्य मग "बहुजन रोष्टी"
In reply to मान्य मग "बहुजन रोष्टी" by बॅटमॅन
बहुजन मान्य!
In reply to बहुजन मान्य! by सुनील
हा "रोष्टीव्यवहार" बहुजनमान्य
वेगळ पण इंटरेस्टींग ! करुन
चान चान.. सोपा.. नक्की करून
मस्तचं