Skip to main content

इंडीयन रोस्टी

लेखक Keanu यांनी शनिवार, 23/06/2012 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा थोडा German Rösti च्या जवळपास जाणारा पदार्थ. त्याचं नक्की नाव माहित नाही , आम्ही याला घरी पिझ्झा म्हणतो. लहान मुलांसाठी थोडा वेगळा प्रकार आणि सिमला मिरची न खाणार्‍यांनीही नक्की करुन पहा. :-) लागणारा वेळ: १ रोस्टीसाठी १५ मिनीटे लागणारे जिन्नस: ४ मोठे बटाटे १ मध्यम लाल कांदा बारिक चिरून १ मध्यम टोमॅटो बारिक चिरून २ मध्यम सिमला मिरची बारिक चिरून मूठभर कोथिंबीर बारिक चिरून धणे पावडर जीरे पावडर लाल तिखट चवीपुरते मीठ चवीपुरती साखर तेल क्रमवार पाककृती: १. चिरलेला कांदा, टोमॅटो , सिमला मिरची, कोथिंबीर एकत्र करुन घ्या. २. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्या. ३. त्यामधे १ छोटा चमचा धणे पावडर, १ छोटा चमचा जीरे पावडर, १ छोटा चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्या. ४. तवा थोडा तापवून , त्यावर थोडं तेल सोडून बटाट्याचा किस गोल आकारात पसरवून घ्या. ५. आत त्यावर कांदा, टोमॅटो , सिमला मिरची एकत्र मिश्रण पसरवून झाकून ठेवा. ६. ६-७ मिनिटा नतर झाकण काढून पिझ्झा अर्धा दुमडा. ७. तयार पिझझा हा असा दिसतो. अधिक टिपा: १. तव्यावर बटाट्याचा किस टाकण्याआधी थोडं तेल सोडाव, तसंच कडेने तेल सोडलं की क्रिस्पी होतात. २. हे गरम असतानाच खाल्लं तर छान चव लागते. ३. लहान मुलांसाठी करायच असल्यास मिश्रणात चीझ घातल्यास चांगले लागतात. ४. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्यावा. अन्यथा काळा पडतो. ५. यात साखर असल्याने थोडा करपल्यासारखा दिसतो. ६. मक्याचे दाणे सुद्धा चांगले लागतात यात. आतले मिश्रण आपल्या आवडीनुसार घाला पण सिमला मिर्ची हवीच्..तिच्यामुळेच वेगळी चव येते. वाढणी/प्रमाण: वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ८ होतात. पूर्वप्रकाशितः घरगुती पिझ्झा

वाचने 9798
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

वेगळी पाकृ. आहे. छान दिसतेय. खुप स्टार्च असतं त्यात म्हणुन मला बटाटा आवडत नाही. असो. लहान मुलांना भाज्या खाउ घालायला छान आयडीया आहे. करुन बघेन.

आत्ताच केली. लेकाला आवडली. चीज घातलं होतं... एकदम खुश झाला. हॅश ब्राऊन सारख लागतंय अस म्हणाला. :) बटाट्याच्या थालीपीठाचाच प्रकार, थोडा वेगळा! आवडला. धन्यवाद. :)

याला इंडियन का म्हणायचं? हा जर्मन / फ्रेंच पदार्थ आहे ना? आणि इंडियन म्हणायचेच असेल तर इंडियन कशाला? वैदिक रोष्टी म्हटले तर चालणार नाहि का?

In reply to by JAGOMOHANPYARE

हौ अबौट मूलनिवासी रोष्टी? वैदिक वैग्रे गोष्टी तर बाहेरच्याच, नैका?

In reply to by बॅटमॅन

मूल निवासी रोष्टी हाच शब्द योग्य आहे.. बटाट्याचा निवास मुळात असतो, म्हणून. इथे स्मायल्य कशा द्यायच्या? मला एकच येते. :)

In reply to by JAGOMOHANPYARE

हा काही नीट जमला नाही ;) डोळे मिचकावण्याची स्मायली = ; + ). दात काढण्याची स्मायली = :+(कॅप्स लॉकमधील डी) इ.इ.

In reply to by बॅटमॅन

बटाटा भारतात पोर्तुगिझांनी १५व्या शतकात आणला. तत्पूर्वी भारतात बटाटा नव्हता. तेव्हा "मूलनिवासी" बाद! ;)

In reply to by बॅटमॅन

मान्य मग "बहुजन रोष्टी" बद्दल काय म्हणणे आहे बटाटा हे बहुजनांचे खाद्य (उदा. वडा-पाव), तेव्हा बहुजन रोष्टी मान्य होण्यासारखे ;)

वेगळ पण इंटरेस्टींग ! करुन पाहते. बाकी ज्या कोणाला बटाटा नको असेल त्यांनी रताळ वापरल तरी चालेल अस वाटतय.