श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास;
श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास?
स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.
एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.
तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!
कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी!
मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील!
मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात:
एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.
इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!
मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
39609
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
+1
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
पैशाबद्दल आमचा फंडा
प्रकटन आवडले .......! सहजपणे
ऑ?
मायला, हे अध्यात्म आणि आयुष्य यांचा काय पंगा घालतं पब्लिक?
In reply to ऑ? by सहज
माझा मित्र एकदा मला म्हणाला
मृत्युंजय, दुवे वाचायचा मला फार कंटाळा आहे
In reply to माझा मित्र एकदा मला म्हणाला by मृत्युन्जय
ते माझे नाही दुसर्या कोणाचे
In reply to मृत्युंजय, दुवे वाचायचा मला फार कंटाळा आहे by संजय क्षीरसागर
पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण..
चौरा, `पैसा म्हणजे सत्ता' हा विचार फक्त पैश्याबद्दल आपल्याला
In reply to पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण.. by चौकटराजा
अस्तित्व परावलंबीच तरीही...
In reply to चौरा, `पैसा म्हणजे सत्ता' हा विचार फक्त पैश्याबद्दल आपल्याला by संजय क्षीरसागर
+१ सहमत आहे.
In reply to पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण.. by चौकटराजा
बरोबर पण त्या बरोबर,
हे आवडले
In reply to बरोबर पण त्या बरोबर, by सुधीर
मला तरी
फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि
दुसर्या अन तिसर्या पॅराशी
In reply to फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि by मराठमोळा
-१
ह्या अशा विचारांमुळेच युरोझोन
कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत
In reply to ह्या अशा विचारांमुळेच युरोझोन by परिकथेतील राजकुमार
परा व नाना
In reply to कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत by नाना चेंगट
दुय्यम पैसा....
अरे हो, वॉरन बफेचा प्रतिवाद करायचा राहिला!
In reply to दुय्यम पैसा.... by प्रभाकर पेठकर
तत्त्वज्ज्ञान आणि वस्तूस्थिती.
In reply to अरे हो, वॉरन बफेचा प्रतिवाद करायचा राहिला! by संजय क्षीरसागर
वल्ला!
In reply to दुय्यम पैसा.... by प्रभाकर पेठकर
@ परा, ममो आणि नितीन, तुमच्या सर्वांच्या विचारांची दिशा एकच
तात्विक भाष्य सुंदरच आहे.
+
In reply to तात्विक भाष्य सुंदरच आहे. by गवि
माझ्याकडे किती पैसे आहेत ते मोजत नाही म्हणून
In reply to + by नितिन थत्ते
गवि, येस! आत निवांत तरच बाहेर निवांत..
In reply to तात्विक भाष्य सुंदरच आहे. by गवि
उत्तम विषय. फारच मस्त विषय.
विषय सेक्सी नाहीये पण असं जगायला लागल्यावर आयुष्य सेक्सी होतं
In reply to उत्तम विषय. फारच मस्त विषय. by शुचि
चोच
आहो, मी कुठेही 'चोच आहे तिथे दाणा आहे'
In reply to चोच by तिमा
:)
निरर्थक, जडशीळ तत्त्वज्ज्ञान.
In reply to :) by पैसा
पुस्तक - द सोल ऑफ मनी
माझ्या आयुष्याशी निगडीत बोलतो
बरंच नुकसान झालय हो तुमचं.
In reply to माझ्या आयुष्याशी निगडीत बोलतो by गणेशा
७५,००,००० सॉर्री.
In reply to बरंच नुकसान झालय हो तुमचं. by प्रभाकर पेठकर
तुमचा प्रतिसाद वाचुन तुमचे
In reply to ७५,००,००० सॉर्री. by गणेशा
घर कुठे घेतलं?
In reply to ७५,००,००० सॉर्री. by गणेशा
सुरस आणि उद्बोदक
फण्डा +१ रुपयाचा...
च्यायला आमचाच फंडा चोरला की !
In reply to फण्डा +१ रुपयाचा... by अर्धवटराव
थोडं वेगळं आहे माझं म्हणणं !!
In reply to च्यायला आमचाच फंडा चोरला की ! by चौकटराजा
ज्यांना पटलय त्यांच्यासाठी
>>ज्यांना हे पटेल त्यांच्या
In reply to ज्यांना पटलय त्यांच्यासाठी by संजय क्षीरसागर
कल्टवाल्यांचा हाच तर
In reply to >>ज्यांना हे पटेल त्यांच्या by मराठमोळा
देअर इज नथिंग एक्स्ट्रॉर्डनरी ...
In reply to ज्यांना पटलय त्यांच्यासाठी by संजय क्षीरसागर
पैसा काय किंवा श्वास काय
कल्ट कुठाये? मी फक्त वस्तुस्थिती मांडतोय
पैसा तो खुदा नही मगर खुदासे
नानाश्री,
In reply to पैसा तो खुदा नही मगर खुदासे by नाना चेंगट
नानबा
In reply to पैसा तो खुदा नही मगर खुदासे by नाना चेंगट
कुणी स्वत:च्या पैशावर जगतो
In reply to पैसा तो खुदा नही मगर खुदासे by नाना चेंगट
संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन..
नाही हो, आपण आजमधे जगत नाही, उद्याचा विचार करतो किंवा
In reply to संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन.. by निश
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण..
आहो दादा, परत तेचते चाललय!
In reply to संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण.. by निश
संजय क्षीरसागर साहेब , परत तेच नाही चाललय.
In reply to आहो दादा, परत तेचते चाललय! by संजय क्षीरसागर
पैश्यांच्या मागे लागत नाही
@ निश आणि गोंधळी
कैच्या कै! माझ्या पाहण्यात
In reply to @ निश आणि गोंधळी by संजय क्षीरसागर
तुम्ही वरचे प्रतिसाद न वाचता सल्ला दिलाय
In reply to कैच्या कै! माझ्या पाहण्यात by शिल्पा ब
माझ्या मते ८०% मराठी माणसे
In reply to तुम्ही वरचे प्रतिसाद न वाचता सल्ला दिलाय by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत बरोबर असल तरी .......
In reply to @ निश आणि गोंधळी by संजय क्षीरसागर
संजय! तुम्ही बरोबर आहात...
चांगला विषय, मुळ लेख सुद्धा