भेगाळ जमिन
उन्हाचा ताव
पावसाला साकडं
आतातरी धाव..
काळं कभिन्न
मातीचं ढेकुळ
भुकेलं जनावर
तहानेनं व्याकुळ
सुकलेली आसवं
बधिर जाणिवा
आगीचा डोंब
पोटात वणवा
सरीवर सर
मातीत गारवा
बेधुंद चातक
गाई मारवा
हिरवी जमीन
हिरवं रान
बळीराजा घेई
सुंदर तान
कणसं भरली
हसलं सुख
काळ्या आईचं
प्रसन्न रूप
बरसल्या धारा
सोडूनी लय
जीवन झाले
'जीवन्'मय
पाणलोट अजस्त्र
वाहिलं जगणं
उन्हाळा-पावसाळा
नेमेची भोगणं..............
- प्राजु
(९ नोव्हें ०७)
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9730
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे..
शेतकरी
सरीवर सरी
सुंदर कविता...
अज्ञान...
नको केरवा नको
In reply to अज्ञान... by प्राजु
चांगले वाटेल..
In reply to अज्ञान... by प्राजु
हाहाहा..
चातक म्हणजे पपीहा
In reply to हाहाहा.. by प्राजु
गाणे
In reply to चातक म्हणजे पपीहा by धनंजय
मस्त
अप्रतिम
धन्यवाद..