एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!
बेदरकारपणे स्वतःला
आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं,
मिटल्या डोळ्यांनी आता,
ते असणं अनुभवावं!
नव्याने साठवावं!
ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं-
जगताना पुरून उरावं!
कायमच, सुख मिळालं की दु:ख
मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून......
-वेणू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
851
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
"असणं" या शब्दाच्या ठिकाणी
+1
In reply to "असणं" या शब्दाच्या ठिकाणी by नाना चेंगट