Skip to main content

चीजाळलेले अंडे (अर्थात झटपट वैदिक आम्लेट)

लेखक सुनील यांनी सोमवार, 11/06/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - १) अंडे - एक २) चीज स्लाइसेस - दोन ३) झाकण असलेली मायक्रोवेव्-सेफ प्लेट वा बाऊल ४) मायक्रोवेव ओवन ५) मीठ आणि मीरपूड - चवीपुरते कृती - १) प्लेट वर एक चीजची स्लाइस घ्या. २) त्यावर अंडे फोडून घाला. ३) त्यावर चीजची दुसरी स्लाइस ठेवा. ४) प्लेटवर झाकण ठेवा. ५) प्लेट मायक्रोवेवमध्ये ठेऊन ४०-४५ सेकंद शिजवा. वितळलेल्या चीजमध्ये नखशिखांत भिजलेले अंडे तयार आहे. त्यावर चवीपुरते मीठ आणि मीरपूड भुरभुरवा आणि आस्वाद घ्या! टीपा - १) अंडे मायक्रोवेवमध्ये फुटते तेव्हा उघड्या प्लेट अथवा बाऊलमध्ये हा पदार्थ करू नये. हलके झाकण ठेवावे. २) चीजच्या स्लाइसला थोडे बटर लावून "चीजा-तुपाळलेले अंडे" असा पाठभेददेखिल करता येईल. ३) एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागणारे हे आम्लेट, इतर कुठल्याही आम्लेट-प्रकारापेक्षा झटपट होते.

वाचने 22202
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by नाना चेंगट

हो ना... ते कळलंच नाही. कळलं तोवर इतकं अंतर कापलेलं होतं की आता मागं वळून व्यवस्थेत जाता येत नाही. मग, उरलो नोंदींपुरता... ;-)

आजच्या वैदिक लोकांना अंड चालत नाही हो, अंड न घालता हीच पाकृ कशी करायची ते सांगा ना त्यांच्यासाठी! -आजचा सैतान