
साहित्य-
१ वाटी हरबरा डाळ, १ वाटी मूग डाळ, २ टेबलस्पून तेल,
२ पेराएवढे आले, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा, २ चमचे दही किवा अर्धी वाटी ताक,
१/२ चमचा हळद,१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे,१/२ चमचा हिंग (मिसळणाच्या डब्यातील लहान चमचा),
एका मध्यम लिंबाचा रस, २ चहाचे चमचे साखर,मीठ चवीनुसार,५ते६ काजूबिया तुकडे करुन
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर,१/२ वाटी बारीक शेव +
थोडे खवलेले खोबरे, कोथिंबिर, बारीक शेव , डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी.
कृती-
दोन्ही डाळी वेगवेगळ्या ५ ते ६ तास भिजत घाला.
नंतर त्या उपसून रोळीवर काढून वेगवेगळ्या वाटा, वाटताना त्यात आले व मिरच्याही घाला.
डाळी वाटून झाल्यावर त्या एकत्र करा.
त्यात हळद,मीठ, दही/ताक घाला व ढवळा.
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.
एका ताटलीला तेलाचा हात लावून घ्या.
डाळीच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व ढवळा.
हे मिश्रण ताटलीत ओता व ही ताटली त्या पातेल्यात ठेवून वरुन झाकण ठेवा.
ढोकळ्याप्रमाणे उकडा, साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर लागतील.
कोमट झाल्यावर ते कुस्करा.
एका कढईत तेल तापत ठेवा, त्यात मोहरी घाला ती तडतडली की हिंग व जिरे घाला, काजूचे तुकडे घाला.
नंतर मिश्रणाचा कुस्करा त्यात घाला व ढवळा.झाकण ठेवून २-३ वाफा काढा.
लिंबाच्या रसात साखर व मीठ घाला व हे वरील मिश्रणात घाला.
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर व १/२ वाटी शेव घाला आणि ढवळा.
सर्व करताना वरुन शेव, ओले खोबरे,कोथिंबिर घाला. डाळिंबाच्या दाण्यांनी सजवा.
प्रतिक्रिया
सोप्प आहे एकदम आवडेश
पा.क्रु.चविष्ट दिसतेय पण हे
मस्तच...नक्की करुन बघनार
वा! जमेल असं वाटतं...
गुजराथी
In reply to वा! जमेल असं वाटतं... by बहुगुणी
इतकी मेहनत घेऊन केलेला ढोकळा
+१
In reply to इतकी मेहनत घेऊन केलेला ढोकळा by गणपा
शिळे ढोकळे.
In reply to इतकी मेहनत घेऊन केलेला ढोकळा by गणपा
आमच्या 'कंपनी कॅन्टीन' ने
In reply to शिळे ढोकळे. by प्रभाकर पेठकर
जाम भारी आहे हा प्रकार, पण
वार्ज्याच्या काकडे सिटीच्या
In reply to जाम भारी आहे हा प्रकार, पण by ५० फक्त
+१
In reply to वार्ज्याच्या काकडे सिटीच्या by मृत्युन्जय
दिसतेय भारी
सुंदर...नेहमीप्रमाणेच
मस्तच !
छान आहे
स्वातीतै, अमिरी खमणची पाककृती
भन्नाट
ढोकळा कुस्करायचा असतो ही
वा!
(No subject)
पाकृ तर मस्तच
मस्त
चविष्ट...
धागा पाहिला आहे.
धागा पाहिला आहे.
फोटो व पाकृ मस्त !!
खल्लास!!!
धन्यवाद.