✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोवा रंगीला रे...

म
मस्त कलंदर यांनी
गुरुवार, 06/14/2012 - 22:59  ·  लेख
लेख
या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं. तिथे प्रवास करताना माड-पोफळीच्या बागा आणि समुद्रकिनार्‍यांपेक्षाही जर काही नजरेत भरली असतील, ती होती तिथली घरे. वेगवेगळ्या वास्तुकलांचे नमुने तर खरेच, पण त्यांना दिलेले रंग या सगळ्यांवर सॉल्लीड मात करत होते.नेहमीच्या त्याच त्याच रंगांच्या इमारती बघून मेलेल्या नजरेला ही रंगाबेरंगी घरे पाहून जणू नवसंजीवनीच मिळाली. माझं हे अशा घरांच्या फोटो काढण्याचे वेड पाहून पैसा ताईला 'हे वेगळेपण इतके दिवस मला कसं जाणवलं नाही' असं वाटू लागलं! विशेष सूचना: धावत्या कारमधून आणि दही खाल्लं तर पाच मिनिटांत त्याचं हमखास ताक होईल अशा अतिवळणावळणांच्या रस्त्यावरून जाताना हे फोटो काढले असल्याने फोटोंच्या कोलितीबद्दल अवाक्षर काढू नये, अपमान करण्यात येईल. तर मंडळी सादर आहेत, रंगरंगील्या गोव्याचे फोटो: सुरवात करतेय एकदम गुलाबी गुलाबी रंगाच्या घराने. अगदीच नाही म्हटलं तर पनवेलमध्ये शिरताना या रंगाची एक इमारत दिसते. हा रंग आजवर एखाद्या फिक्या रंगाला पूरक म्हणूनच पाह्यलेला आठवतोय. आणि हा पण. इथे जरासा वेगळा दिसतोय हा, पण हादेखिल रक्तवर्णीच आहे. या रंगाच्या सगळ्या छटा इथे पाह्यला मिळाल्या. हा रंगसुद्धा फिका वाटत असला तरी प्रत्यक्षात तो जांभळाच्या आतला (पक्षी:पर्पल) रंग आहे. निळ्या रंगासोबतच इथल्या लोकांना पिवळ्या रंगाच्या सगळ्या छटा आवडतात असं वाटतं. हे जरा नेत्रसुखद तरी आहे. हे मंदिरासारखे दिसत असले तरी, फोंड्याजवळच्या गावातले घरच आहे. ही फोंड्यातल्या कोर्टाची इमारत आणि तटबंदी: हे असेच आणखी एक घर.. आणि हा सर्वांवर कळस आहे:(पैसाताईच्या घराच्या अगदी जवळ आहे हे. तिथेच एक घराला गडद turquoise blue रंग देणे चालूय, अजून पूर्ण व्हायचंय ते) फोटो बरेच काढले. त्यातले काही खूपच धावत होते. आणि सगळेच काढणंही झालं नाही. एक फोटो घेता घेता शेजारचं घर वाकुल्या दाखवून पळायचं तर कधी नक्की कोणत्या बाजूच्या घराचा फोटो घेऊ असं होऊन कधी एक तर कधी दोन्ही फोटो हातचे गेले. एक तर घर 'शी'च्या रंगासारखं होतं, एक दत्ताचं देऊळ अगदी अविश्वसनीय बेबी पिंक रंगात होतं. खरंतर हे इथे दिलेले रंग काहीच नव्हेत असं वाटायला लावणारे अतरंगी रंगही टिपता नाही आलेयत. आणि असं बरंच काही... अधिक फोटो इथे. फोटो घेता घेता कॅमेर्‍याची बॅटरी संपली, पण तरीही अशी वेगवेगळी घरे खुणावत होती. राहिलेले फोटो देण्याचं पैसातैने कबूल केलेय.. तेव्हा अजून खजिन्याच्या प्रतिक्षेत आहे. *श्रेयअव्हेरः बहुतेक भाईकाका. चू भू दे घे. स्थळः साष्टी तालुक्यातल्या वर्का बीचपासून मडगांव-शांतादुर्गा-मंगेशी-फोंडा या गावातले रस्त्यांच्या आजूबाजूस.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
जीवनमान
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17319 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

केरळातही हेच

सर्वसाक्षी
गुरुवार, 06/14/2012 - 23:54 नवीन
केरळ तसेच कर्नाटकातही शहरा बाहेर अशी भडक म्हणजे पिवळी, पोपटी, केशरी घरे सर्रास पाहायला मिळतात
  • Log in or register to post comments

ऐला काय रंगेबीरंगी घर टिपली

गणपा
Fri, 06/15/2012 - 00:08 नवीन
ऐला काय रंगेबीरंगी घर टिपली आहेत ग. गोवा म्हटल की समुद्र किनार्‍यावरचे मावळतीचे, निळ्याशार पाण्याचे, देऊळ आणि चर्चचे (एखादा हौशी गवि असला तर खादाडीचे ) ठारावीक फोटो असतात पण हा नेहमी पेक्षा काहीसा वेगळा धागा आवडला. :)
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/15/2012 - 09:44 नवीन
गोवा म्हटल की समुद्र किनार्‍यावरचे मावळतीचे, निळ्याशार पाण्याचे, देऊळ आणि चर्चचे (एखादा हौशी गवि असला तर खादाडीचे ) ठारावीक फोटो असतात पण हा नेहमी पेक्षा काहीसा वेगळा धागा आवडला. +१ क्यामेराच्या हालचालींमुळे की अन्य कारणांमुळे फोटो धुसर आणि काही फोटो तिरपे तारपे झाल्यामुळं गिचमिड गिचमिड वाटतं पण चालायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आयला, हा काय नवा ट्रेन्ड आहे

पिवळा डांबिस
Fri, 06/15/2012 - 00:54 नवीन
आयला, हा काय नवा ट्रेन्ड आहे की काय? नाय म्हणजे इतकी वर्षे गोव्यात जातोय, आजवर २५एक फेर्‍या तरी मारल्या असतील, पण हे कधीच जाणवलं नाही! आत्ता हिने फोटो दाखवले म्हणून जाणवलं!! बाकी लहानपणापासून दरवेळी गोव्यात गेल्यावर आमची अवस्था पंढरपूरमधल्या वारकर्‍याप्रमाणे उन्मनी असते त्यामुळे कदाचित हे मिस्स केलं असेल!!! गोव्याची घरं म्हणजे माती/ विटांच्या भिंती, लाल कौलारू छपरं, सभोवताली माडांची राई आणि बाकीबाबांच्या शब्दांत सांगायचं तर घनगच्च आंबा-फणस-काजविणीच्या 'रुखावळीतून धूर मात्र कापरा...' (इथे डोळे टिपल्याची स्मायली!) गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. मगें? गोयांतले रस्ते काय शिमिटा-डांबराचे नाय काय, मँगेनीजचे आसतंत, कळ्ळें तुकां? :)
  • Log in or register to post comments

छान आहे. एक तो भयानक हिरव्या

शिल्पा ब
Fri, 06/15/2012 - 00:58 नवीन
छान आहे. एक तो भयानक हिरव्या रंगाच्या बिल्डींगीचा फोटु सोडला तर बाकीचे आवडले. अगदी रंगीत गाव आहे.
  • Log in or register to post comments

एक तो भयानक हिरव्या रंगाच्या

यकु
Fri, 06/15/2012 - 10:00 नवीन
एक तो भयानक हिरव्या रंगाच्या बिल्डींगीचा फोटु सोडला तर बाकीचे आवडले.
हर हर महादेव!! तलवार कुठेय तुमची.. ;-) देशपान्डे वैनी रंगीबिरंगी फोटू आवडले. बाकी त्या हेरिटेज वॉकची सर नाही ब्वॉ :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चान चान फोटूंचा चान चान

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/15/2012 - 01:10 नवीन
चान चान फोटूंचा चान चान धागा... :-)
  • Log in or register to post comments

मस्तं..

प्रभाकर पेठकर
Fri, 06/15/2012 - 03:33 नवीन
गोव्याचा 'रंगे'लपणा डोळ्यात भरणारा आहे....
  • Log in or register to post comments

पानभर एखादे घर छापले तर घोटीव

रेवती
Fri, 06/15/2012 - 03:40 नवीन
पानभर एखादे घर छापले तर घोटीव कागद म्हणून वापरता येईल असे रंग आहेत. पोपटी रंगाची इमारत तर झ्याक आहे. ;) पुन्हा म्हणून अशी बघायला मिळणार नाही. बाकी पैतै व तुमचे फटू कुठे आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त!

सहज
Fri, 06/15/2012 - 06:57 नवीन
धागा आवडला. नेहमीपेक्षा वेगळे डोळ्याला बघायला मिळाले की लै भारी वाटतेच.. भले ते निसर्ग असो की हे असे. मधे मी एका जागी गेलो होतो तेथील वेगळी गोष्ट नजरेत भरली म्हणजे प्रत्येक इमारत, बंगला, अगदी मंदीर, हॉटेल इ इ चे गेट / फाटक अतिशय सुंदर व वेगवेगळे नक्षीकाम असलेले होते.
  • Log in or register to post comments

हेहेहे!

पैसा
Fri, 06/15/2012 - 08:21 नवीन
मी इतकी वर्षं इथे रहातेय, पण रोजची सवय झाल्यामुळे हे लक्षातच आलं नव्हतं. आता आणखी काही फोटो २ दिवसांत टाकते इथेच!
  • Log in or register to post comments

ह्याच बाजूने पैसाताईच्या घरी

पिंगू
Fri, 06/15/2012 - 08:35 नवीन
ह्याच बाजूने पैसाताईच्या घरी गेलो होतो, पण आपली नजर ह्याबाबतीत तरी शोधक नाही... ;) - पिंगू
  • Log in or register to post comments

पण काहीही म्हणा असली

मृत्युन्जय
Fri, 06/15/2012 - 09:01 नवीन
पण काहीही म्हणा असली रंगीबेरंगी घरे अश्या ठिकाणी बघायला मजा येते. पुण्या / मुंबैत काहितरीच वाटेल हे असे काही. पण गोव्याला छान वाटते. :)
  • Log in or register to post comments

चेन्नई

अमृत
Fri, 06/15/2012 - 13:32 नवीन
विमानतळावर उतरतानापण अशीच भडक रंगानी रंगवीलेली कित्तेक घरे दिसतात. अमृत
  • Log in or register to post comments

मके

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/15/2012 - 14:10 नवीन
अग.... जौ दे. दुर्दैव त्या निख्याचे. फटू मात्र छान आलेत गो.
  • Log in or register to post comments

बरोबर! तुलाच काळजी रे त्या

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/15/2012 - 15:19 नवीन
बरोबर! तुलाच काळजी रे त्या निख्याची! पण ते ही जौच्दे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

येडे

श्रावण मोडक
Sun, 06/17/2012 - 00:37 नवीन
दोघंही येडे आहात. ती हे फटू टिपत होती तेव्हा निखिल त्याच्या अंतःप्रेरणांना जागत होता हे नक्की. तो नाही म्हणेलच. तसा तो विनयशील आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कैच्याकै.

गोंधळी
Fri, 06/15/2012 - 15:27 नवीन
कैच्याकै.
  • Log in or register to post comments

हा हा हा...

स्मिता.
Fri, 06/15/2012 - 15:38 नवीन
गोव्यात बरीच घरं अशी भडक रंगांची असतात हे खरंच. आम्हीही एका भडक पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या इमारतीला खूप हसल्याचं आठवलं. पण या फोटोंमधली बरीच घरं छान दिसत आहेत. शेवटचं मात्र अति-हिरवं झालंय ;) (गोव्याचे आणि तुमचे पैसाताईंसोबतचे इतरही फोटो टाक)
  • Log in or register to post comments

मस्तच आहेत सगळे

किसन शिंदे
Fri, 06/15/2012 - 15:40 नवीन
मस्तच आहेत सगळे फोटोज!! गोव्यातून नेहमीपेक्शा काहीतरी वेगळंच 'टिपून' आणलंयस.:)
  • Log in or register to post comments

किस्ना, तू काय काय रे टिपलेस

प्यारे१
Fri, 06/15/2012 - 16:41 नवीन
किस्ना, तू काय काय रे टिपलेस गोव्यात? हे भगवान! कलियुग कलियुग म्हणतात ते हेच्च काय? गेलाबाजार तो बदक आपलं ते हे... जौदे किंवा दुसर्‍या इतर सज्जनानं 'अशी ' प्रतिक्रिया दिली असती 'तरी' समजलो असतो रे पण तू ही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

छान

प्रदीप
Fri, 06/15/2012 - 17:08 नवीन
निरीक्षण केलं आहे. आम्ही गोंयकार असेच रंग उधळणारे आहोत!! पूर्वापार गोव्याच्या इमारतींच्या बांधणीवर पोर्तुगीज/ स्पॅनिश आर्किटेक्चरचा पगडा आहे. चिंचोळ्या पण उंच, व वरच्या बाजूस आर्च असलेल्या खिडक्या व दारें, गर्द पिवळा, फिकट लाल अथवा निळा रंगांच्या भिंती ही त्याचीच वैशिष्ट्ये आहेत. तेव्हा नवीन इमारतीही तसेच भडक पिवळे, लाल वा निळे रंग घेऊन येताहेत ह्याचे आश्चर्य नाही. तिथे गेल्यावर हे आवर्जून पाहून त्याचे फोटो असलेला धागा मात्र अगदी अनोखा व कौतुकास्पद आहे. इथे गोव्याच्या इमारतींचे, तेथील सामान्यजनांचे, तेथील मुख्यत्वे पारंपारीक हाटेलांचे अनेक बहारदार फोटो आहेत, त्यांवरील टिपण्णीही आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सहज
Fri, 06/15/2012 - 17:46 नवीन
>तिथे गेल्यावर हे आवर्जून पाहून त्याचे फोटो असलेला धागा मात्र अगदी अनोखा व कौतुकास्पद आहे. सहमत आहे. दुव्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

छान

जाई.
Fri, 06/15/2012 - 22:22 नवीन
गोव्याची रंगीबेरंगी सफर आवडली
  • Log in or register to post comments

मस्त आहे फोटु

संदीप चित्रे
Fri, 06/15/2012 - 23:28 नवीन
गोव्यात कुठे मुक्काम होता?
  • Log in or register to post comments

२००९ च्या ट्रिप मध्ये हि

५० फक्त
Sat, 06/16/2012 - 06:41 नवीन
२००९ च्या ट्रिप मध्ये हि बहुतेक सगळी घरं पाहिलेली आहेत पण फोटो काढणं झालं नव्हतं, फोटोंसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धागा वाचला. पण

चिंतामणी
Sun, 06/17/2012 - 08:39 नवीन
>>>फोटोंच्या कोलितीबद्दल अवाक्षर काढू नये, अपमान करण्यात येईल. ह्या धमकीमुळे लिहीण्याला ब्रेक लागला आहे.
  • Log in or register to post comments

पितळ उघडे पडतय...

प्रभाकर पेठकर
Sun, 06/17/2012 - 09:49 नवीन
ह्या धमकीमुळे लिहीण्याला ब्रेक लागला आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मान गये मकी. अापकी पारखी नजर

प्रीत-मोहर
Sun, 06/17/2012 - 10:39 नवीन
मान गये मकी. अापकी पारखी नजर आउर गोवन (पक्शी:अामच) के कलर दोनों को कोणरे तो रंगांची टर उडवतोय? फुडले फावट असलच पांचव्या रंगान नटिल्या होटेलान रावयतां रावरत तुमी बादवे अल् रीना शांतीनगरान गो?
  • Log in or register to post comments

न्हय गो!

पैसा
Sun, 06/17/2012 - 11:14 नवीन
माड्डोळा ते. महालसेच्या आणि मंगेशीच्या मध्यात आसां. ते पाचवे घर मात आमच्या घरालागी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मस्त..

स्वाती दिनेश
Sun, 06/17/2012 - 15:45 नवीन
मके, मस्तच.. गोव्यातल्या रंगीत घरांचे दर्शन आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.....

मनीमाउ
Mon, 06/18/2012 - 11:35 नवीन
अगदी अगदी.....गोव्यामधे समुद्रनंतर काय आवडले तर ती घरे..रंगीबेरंगी..अगदी आपण कल्पना पण करू शकणार नाही घराला असे रंग ...पण तरी गोव्याला शोभा आणणारी..मला असा वाटते या घरांवर पोर्तुगीस जीवन शैलीची छाप आहे..
  • Log in or register to post comments

वा हटके धागा.

जागु
Mon, 06/18/2012 - 11:59 नवीन
वा हटके धागा.
  • Log in or register to post comments

रेवती, स्मिता: पैसातैकडे

मस्त कलंदर
Wed, 06/20/2012 - 21:42 नवीन
रेवती, स्मिता: पैसातैकडे गेल्यावर पळत्या वाहनातून बिल्डिंगींचे फोटो काढण्याच्या नादात माणसांचे फोटोच काढले नाहीत. प्रदीप यांनी दिलेला दुवा पण भारी आहे. रंगीबेरंगी घरांची खिल्ली उडवण्याचा हेतू खरेच नव्हता, पण त्यांचे आवडलेले वेगळेपण मांडणे इतकाच होता. आणि हो, वाचकांचे अणि प्रतिसादकर्त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

मस्त

कपिलमुनी
Tue, 05/19/2015 - 17:03 नवीन
यंदाच्या गोवा ट्रिपमध्ये एकाहूब एक सुंदर कलरफुल्ल घरे पहवयास मिळाली. जबरदस्त रंगसंगती असते. आणि डार्क असूनही खूप खुलून दिसते .
  • Log in or register to post comments

एक तर घर 'शी'च्या रंगासारखं होतं

ईश्वरसर्वसाक्षी
Tue, 05/19/2015 - 17:32 नवीन
य्याक्क, काय हे :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा