Skip to main content

शिवकल्याण राजा ....

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 08/08/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
"रायगडाला लाज आली ... " कारण आम्ही विसरलो !!! ग्रहण सूर्यास लागे पापभारे धरती डोले अंधःकार घनघोर पसरे पारतंत्र्याचा | रयत दीन बिचारी त्राही त्राही होई जुलमी फौजा शाही लुटती दिशा दाही | मंदिरात देव नाही वावरात माणुस नाही आक्रोशे काळी आई वैभवास वारस नाही | गोमाता भयभीत गृहलक्ष्मी चिंताक्रांत घरधनी जाई रणी रक्षिण्या तीज न कुणी | अधर्म असा भयंकर माजला हाहा:कार म्लेंच्छास निर्दाळण्यास अवतरी तारणहार | म्लेंच्छास त्या मारीन स्वराज्यास स्थापीन शपथ घेसी तु रायरेश्वरा स्मरुन | ती नजर तुझी करारी फिरे सह्याद्रीवरी आतुर लावण्या भगवा गडकोट किल्ल्यांवरी | रणशिंग करी नाद भगवा डोले गगनात करी पराक्रमाची शर्थ रणांगणी झुंझण्यात | बादशाही थरारे सिद्धी, गोरे नमले जिंजीचेही राज्य जिंकीले ध्वज स्वराज्याचा डोले | छत्र धरे मस्तकी वरदान भवानीचे हाती स्वातंत्र्याचा गोंधळी आईचा पोत नाचवी | लेकी, सुना सुखावती मातीतुन पिकती मोती सुखाची वर्षा करी गगन मस्तकावरी | धन्य होई जिजामाता सुखावे सारी प्रजा सह्यगिरी हर्षित तु शिवकल्याण राजा तु शिवकल्याण राजा !!!
लेखनविषय:

वाचने 6332
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

--आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

खूपच छान कविता ! ही तुम्ही जालावरच प्रकाशित केली हे नकीच. कृपया "जालकवी सम्मेलनासाठी" द्यावी ही विनंती. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

" जालकवी सम्मेलनासाठी " ही कविता जरुर देईन .

जबरदस्त!!! अंग शहारले.... प्रसंग अक्षरशः.. डोळ्यांसमोर उभे राहिले..... अजून येऊ द्यात......:)

कवितारुपी भाष्य आवडले! स्वाती

काव्य खुपच छान आहे. रोमांचित करणारे.

खूपच आवडली कविता ... अगदे योग्य शब्द निवडले आहेत :)

छत्र धरे मस्तकी वरदान भवानीचे हाती स्वातंत्र्याचा गोंधळी आईचा पोत नाचवी के व ळ सु रे ख...! अन्य शब्द नाहीत! मनीषाताई, मनपूर्वक धन्यवाद! मिपाला वैभवशाली बनवणारं, दर्जेदार बनवणारं अतिशय सुरेख काव्य! तात्या.

सुंदर काव्य.

सुंदर काव्य. काही कडवी वाचताना अक्षरशः ते दृश्य उभे राहिले डोळ्यांसमोर. खूपच सुंदर. रणशिंग करी नाद भगवा डोले गगनात करी पराक्रमाची शर्थ रणांगणी झुंझण्यात | बिपिन.

सुंदर्!!!भारच छान्.इतके चांगले काव्य लिहीण्यासाठी धन्यवाद.

मनःपुर्वक आभार .

फारच सुंदर.... म्लेंच्छास त्या मारीन स्वराज्यास स्थापीन शपथ घेसी तु रायरेश्वरा स्मरुन | हे फार आवडल.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

शिवराय परत या....