Skip to main content

देव देवळातला

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 13/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
देव देवळातला अधु झालाय हो देव देवळातला माणुस मेलाय हो माणसातला रक्ताळ्लेल्या उत्सवात मस्जिदे आणी मंदिरे रंगतात स्वप्नातल्या भाकड कथा आज आम्हाला धर्म सांगतात धर्मग्रंथातिल सुवचने आमच्या हत्यारात लपली धर्माच्या नावाखाली आज हिंसाही खपली माणुस कोण ? व्यक्ति काय ? फरक कुणी सांगेल काय ? माणुसकी च्या मंदिरातला देव आमचा जागेल काय ? (साभार) वरिल काव्य आपणास पटते काय ?कारण माणुसच माणसाला विसरत चालला आहे,या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी --

वाचने 5138
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

>>कारण माणुसच माणसाला विसरत चालला आहे,या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी -- का हो? प्राण्यांनी काय घोडं मारलय?? ( प्राणि )अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

प्राण्यांमध्येही प्राणिकी राहिलेली नाही. परवाच मी दोन कुत्र्यांना, दोन मांजरांना नंतर कुत्रा-मांजराला भांडताना पाहिलं. चिमण्या तर मेल्या, चार चार पाच पाचजणी मिळून एकीला डाफरत असतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

परवाच मी दोन कुत्र्यांना, दोन मांजरांना नंतर कुत्रा-मांजराला भांडताना पाहिलं. चिमण्या तर मेल्या, चार चार पाच पाचजणी मिळून एकीला डाफरत असतात. म्हणूनच आम्ही फक्त कबुतरं बघतो... सारखी नुसती "क्येम डार्लिंग!!" म्हणत असतात!!!! त्यांचं बघून आम्हीपण आमच्या डार्लिंगला तसंच म्हणतो.... फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स!!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

म्हणूनच आम्ही फक्त कबुतरं बघतो... सारखी नुसती "क्येम डार्लिंग!!" म्हणत असतात!!!! =)) अवांतरः तो पुढचा गळ्यातला खास आवाज टंकला नाहीत.

पाव बेकरीतला शिळा झालाय ओ पाव बेकरीतला मजा गेलीय हो त्या पावातली कुस्करलेल्या प्लॅस्टिक पिशवीत बनपाव कोंबतात इराण्याच्या हाटेलातल्या बनमस्काची स्वप्नं दाखवतात शिळीच काकडी अन कांदे पावात लपवले सँडचिचच्या नावाखाली ढब्बु मिरची ही खपली व्हेज काय ? क्लब काय ? फरक कुणी सांगेल काय ? इराण्याच्या हाटेलातला बनमस्का आमचा मिळेल काय ?

In reply to by ५० फक्त

तुम्ही शेवटचे वाक्य विसरलात काय हो? वरील शिळा पाव आपणास आवडतो काय ?कारण माणूसच शिळ्या पावाला विसरत चालला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

फेकु धागेकर चिलीम भेटली तर चार झकास झुरके मारायचे सोडून ही पाणी ओतण्याची अवदसा का आठवली आज तुला? काय प्रशासक वगैरे झालास की काय!!!! (अहो अब्रम्हण्यम!!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

काय प्रशासक वगैरे झालास की काय!!!!
तुमची शाळा सोडून आम्ही हुच्चभ्रुंच्या शाळेत जाऊ असे तुम्हाला वाटलेच कसे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

फेकू या शब्दावरची रा.रा. सलीम फेकू यांची मक्तेदारी मोडल्याच्या णिषेधार्थ 'परा'चा पुतळा आज चारमिनारात जाळल्या जाईल. सर्वांनी सोबत १-२ डुकरे घेऊन येणे. अखिल चारमिनार च्या जानिबसे आपले इस्तेकबाल आहे. (आपकेइच) इस्माईलभाई जहांगीर चाऊस मल्लेश चिन्ना फेरोज अकबर

>>> वरिल काव्य आपणास पटते काय ? काव्य थोडं पटतंय पण तुमच्या ओळी दोन ओळीचा वैश्विक प्रश्नांना काय उत्तर द्याव समजत नाही. >>>माणुसच माणसाला विसरत चालला आहे खरं आहे. >>>या जगात फक्त एकच धर्म योग्य आहे ,व तो म्हणजे माणुसकी -- माहितीबद्दल धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by नाना चेंगट

तिकडे व्लॉगवर लिहितील आणि इथे एक ओळ लिहून त्याची लिंक देतील--- शकुत्सु आणि वर आमच्या ब्लॉगचे वाचन 'सशुल्क' आहे असंही म्हणतील----बोंडोपंत ;)

>>>रक्ताळ्लेल्या उत्सवात मस्जिदे आणी मंदिरे रंगतात म्हणूनच आम्ही सांगतो प्रभु येशुच्या मार्गाने जा !! तोच मार्ग दाखविल... सेंट नाना पीटर

In reply to by नाना चेंगट

पाश्चात्यांच्या मेकाल्यन शिक्षणपद्धतीचे बळी. पाश्चात्यांचं सगळं काही ग्रेट समजणारे. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' असं कुणीसं देशी माणूस (कोण बरं....अं...अं????... जाऊ दे. ते महत्त्वाचं नाही) सांगून गेलंय ते नाय आठवलं तुम्हाला.

In reply to by रमताराम

पाश्चात्यांचं सगळं काही ग्रेट समजणारे हाण तिच्या *यला!! ररांच्या या वाक्यावर माननीय श्री. नाना चेंगट यांची प्रतिक्रिया वाचायला अतिउत्सुक!!! ;) (नाना, तिच्यायला आमचे जुने धागे वर काढतो काय? आता करू का तुझं उत्खनन!!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

अहो पिडाकाका त्या रराचं काही खरं आहे का? तो इ़कडे एक बोलतो तिकडे दुसरेच बोलतो. महाचालू आहे तो म्हातारा... :) बाकी आमच्या उत्खननाबद्दल तुम्हाला आक्षेप आहे का? संध्याकाळपर्यंत तुमचा अजून एक धागा बोर्डावर आणतो. हाकानाका !!

In reply to by जाई.

स्वप्नातल्या भाकड कथा आज आम्हाला धर्म सांगतात
शकु'जी .. हे वाक्य जरा सन्दर्भासहित स्पष्टीकरण देऊन सान्गाल काय? मुळात कोणताही धर्म हा स्वप्नातल्या भाकडकथांवर आधारलेला नाही. तसेच प्रत्येक धर्म हा "माणुसकी"च शिकवितो..महम्मद पैगम्बरजी, येशुजी ख्रिस्त...यांनी देखील त्यांच्या समाजाला "माणुसकी" हाच धर्म शिकविला. लोक त्यांच्या सान्गण्यानुसार वागत नसतील.. तर तो त्या लोकांचा दोष आहे, धर्माचा नाही.. आणि धर्मा'चे कारण पुढे करून जर लोक माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असतील.. तर अश्या लोकांना वेळीच ठेचले पाहिजे... देव, अल्ला, जीझस... हे सगळे एकच आहेत... म्हणजे जगाचा अफाट पसारा चालवणारी ही एक दिव्य आणि अद्भुत शक्ती आहे.. त्यामुळे आपापल्या संस्कृतीनुसार या दिव्य शक्तीला देव, अल्ला, वगैरे जे काही मानले जाते.... त्यावर पूर्ण विश्वास ठेवून माणुसकीचा धर्म प्रत्येकाने आचरावा.. असे कुराअन-शरीफ, बायबल, भगवद्गीता या सगळ्यांत सांगितलेले आहे... त्यामुळे कोणत्याही धर्मीयाने इतर धर्मीयांवर कुरघोडी करून स्वतःचा धर्म त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये.. तसे केल्यास ते आचरण माणुसकीच्या विरुद्ध होईल.. _____ त्यामुळे उगीचच कविता सेन्टीमेन्टल करण्यासाठी धर्माला बदनाम करू नये...... ही विनन्ती.. :)

In reply to by आदिजोशी

ह्म्म आदि'जी..धर्म वगैरे सेन्सीटिव विषयांबाबत शक्यतो उलटसुलट बोलू नये!!!..... मग तो कुठला का धर्म असेना....

In reply to by मृगनयनी

खरंच आहे. म्हणुनच माणुसकीवर वगैरे जमलं नाही तरी कमीत कमी स्वतःच्याच का होईना धर्मावर विश्वास ठेवावा. पण मग लोकं बाबा, बुवा, माताजी, ठमादेवी, उमादेवी वगैरे यांच्या नादी का लागत असावेत असा एक बारीक प्रश्न माझ्या मनात उमटला इतकंच.