आदरणीय ज्येष्ठ विडंबनकार 'खोडसाळ' यांच्या स्वतंत्र कल्पनेवर आधारित रचना 'जिज्ञासू' वाचून आम्हाला विडंबनधर्माला जागणे भाग पडले! ;)
'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' खाली देत आहोत. त्याला जालगतींकडून यथावकाश सद्गती मिळेलच! ;)
हाती लोटा, सरके नेसू
पळतो परसाकडे जिज्ञासू
विडंबनाचे मर्म समज रे
नुसते मेल्या नकोस हासू
भवभूती अन् गालिब सोडुन
केले आम्ही गुरुजी 'केसू'
ज्याची त्याला कळते आहे
कविता अमुची रक्तपिपासू
शत्रू आम्ही विडंबनाचे
'परप्रकाशी' त्या प्रतिभांचे
कवितेच्या मग सरणावरती
ऊर फोडुनी ढाळू आसू
'कविता कविता' आम्ही खेळू
कोणी बाळू, कोणी काळू
जालावरती सर्वापुढती
विद्वानांची आम्ही ठासू
चतुरंग
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4308
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!!
परप्रकाशित
खो खो खो
In reply to परप्रकाशित by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
म्याच ??
In reply to खो खो खो by फुरकान अली
हाहाहाहा
वा!
मस्त रे !
क्या बात है..
जबरा!!!
आयला भारी
जालावरती
>> 'कविता