शंभर ते दीडशे रुपयांची तिकिटे काढून नाटक पहायला आलेल्या प्रेक्षकाची किमान अपेक्षा असते की हे नाटक विनाव्यत्यय पहायला मिळावं...
पण तसं फ़ारसं नशिबात नसतं हल्ली...
नाटकातल्या व्यत्ययाचे विविध प्रकार :
१.खाईखाई सुटलेले प्रेक्षक :
पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना लक्षात येत नाही...
कोणत्याही वेळी खाणं हा हक्क वाटतो प्रेक्षकांना.. वेफ़र्सच्या पिशव्या, त्यांचा आवाज, वेफ़र्स चावताना होणारा कुरूमकुरूम आवाज अगदी लांबवर ऐकू जातो. याने रंगमंचावरचे कलाकार वैतागून जातात , पण बरेच जण चालायचंच असं समजून दुर्लक्ष करतात.
२.मोबाईल
वाजणारे मोबाईल आणि तिथेच बोलत राहणारे महान प्रेक्षक यांना चुकीची जाणीवच नसते.
कारणं अनेक... बेफ़िकीरी हे मुख्य, काहींना आपण किती महत्त्वाचे आहोत हे जनतेपुढे दाखवायला आवडते, काहींचा भारी मोबाईल / भारी रिंगटोन संपूर्ण जनतेला दाखवावा असे त्यांना वाटते, काहींचे अद्न्यान असते... उदा. एखाद्या काकूंना किंवा आजोबांना ( नातवाने किंवा पुतण्याने प्रेमाने मोबाईल घेऊन दिलेला असतो ) पण हेच लक्षात नसते की आपण मोबाईल आणलेला आहे. मग ते लक्षात आणून द्यायचं शेजार्याने. मग काकू पिशवी / पर्स काढणार शोधणार मग मोबाईल मिळाला की शेजार्याने तो बंद करून द्यायचा... असे ऐकले की चेतन दातार त्याच्या प्रयोगांच्या आधी मोबाईल कसे बंद करावेत याचेही प्रात्य्क्षिक करून दाखवत असे . पण तरी मोबाईल वाजणे शून्यावर येत नाही. काही महाभाग तर तिथे फोन घेतात सुद्धा. मग कोणत्या नाटकाला आलोय त्याचे वर्णन करूनच ठेवतात फोन.
३. बालगोपाळ : काही मंडळी लहान लहान बाळ घेऊन प्रयोगाला येतात.... कोंदट आणि अंशत: एसी चालू असलेल्या प्रेक्षागृहात ते बाळ रडायला लागते. मग थोडा वेळ आई आणि बाबांपैकी एक जण दुसरा घेऊन जाईल म्हणून वाट पाहतात... आवाज वाढल्यावर इतर प्रेक्षकांच्या दबावाचा अंदाज घेऊन दोघांपैकी एकजण पोराला घेऊन उठतो . तोपर्यंत सर्वांची १० मिनिटे खलास होतात....
काही कंत्राटी प्रयोगांत लहान मुले दंगा करताना, धावण्याच्या शर्यती लावतानासुद्धा पाहिले आहे.
अवांतर : तेंडुलकरांच्या वैर्याची रात्र या एकांकिकेत स्वत:च्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला चित्रविचित्र प्रेक्षकांनी त्रस्त झालेला लेखक अफ़लातून दाखवलेला आहे....त्या एकांकिकेचा परेश मोकाशीने बसवलेला प्रयोग तेंमहोत्सवाच्या डीव्हीडीमध्ये पाहिला..मस्त मजा आली होती...
४. कॉमेंट मारणारे प्रेक्षक : " आता तोच तिला मारणार, ही बाई आता गळा काढणार " अशी मोठ्याने कॉमेंट्री करणारे अनेक प्रेक्षक पाहिले आहेत... आजूबाजूच्या ३० - ४० प्रेक्षकांपर्यंत हे आधुनिक बॉबी तल्यारखान ही माहिती पोचवतात.
उपाय :
प्रबोधन आणि शासन :
नाट्यप्रयोग सुरु होण्यापूर्वी केवळ "मोबाईल बंद ठेवावेत " असली सूचना देणे पुरेसे नसतेच.... त्यासाठी प्रेक्षकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.... मोबाईल बंद का ठेवावेत? कसे ठेवावेत? कोणासाठी ठेवावेत? वगैरे ...
किंवा नाटक सुरू होण्यापूर्वीपासूनच संस्थेचे मंचव्यवस्था सहाय्यक आणि नाट्यगृहाचे कर्मचारी प्रेक्षकांच्यात उभे राहून दबावगट तयार करतात असेही क्वचित पाहिले आहे.
५ वर्षांखालील मुलांना प्रवेश बंद वगैरे उपायही काही संस्था करतात.
व्यत्यय आणणार्या प्रेक्षकांना ( कितीही इच्छा असूनही) शिक्षा करणे शक्य नाही.... पण काही अभिनेते थोडासा व्यत्यय आला तरी लगेच नाटक थांबवून त्या प्रेक्षकांना शरम वाटते का ते तपासून पाहतात.( यात इतर प्रेक्षकांवर अन्याय होतो हे मान्य आहे पण तरीही सध्या हा उपाय मला जाणीव निर्माण करण्यासाठी रास्त वाटतो).
विक्रम गोखले प्रयोग चालू असताना मोबाईल वाजला की नेहमीच थांबतात. त्यांनी प्रयोग सुरू होण्यापूर्वी नम्र परंतु ठाम शब्दांत धमकी देऊनही काही फ़रक पडत नाही. मोबाईल चालूच राहतात, त्यांचं वाजणं चालूच राहतं.... प्रेक्षक म्हणून मला हे शरमेचं वाटतं पण त्यावेळी फ़ारसं काही करण्यासारखं नसतं...
मी पाहिलेल्या फ़ायनल ड्राफ़्टच्या व्यावसायिकच्या प्रयोगात चार लोक मागे वेफर्स खात होते, प्लॅस्टिक पिशवीचा आवाज , आणि खातानाच्या कुरुमकुरुम आवाजाने व्यत्यय आला आणि गिरिश थांबला...म्हणाला ,"तिकडे मागे कोणीतरी वेफर्स खातंय, मगाशी इतक्या वेळा मराठीत सांगूनही त्यांना समजलेलं नाही वाटतं... एक पूर्ण प्रवेश मी वाट पाहिली ,अजून चालूच आहे ...मग त्यांचं खाऊन होईपर्यंत आपण थांबूया"...आवाज लगेच थांबला मग त्याने नाटक सुरू केलं...
अवांतर :
गिरीशचा तो प्रयोग पाहिल्यानंतर मी आमच्या ग्रुपच्या दिग्दर्शकाला म्हटले, " पुढल्या प्रयोगापासून मीही असेच करणार" तो घाबरला, म्हणाला, " एवढा माज बरा नाही दिसत राव आपल्याला ... इतर प्रेक्षकांचा असा रसभंग करण्याचा काय हक्क आहे आपल्याला? "... मी काही त्याला पटवून देऊ शकलो नाही. मी भले व्यावसायिक नसेन, मी गिरीश किंवा विक्रम नसेन, मी रोज दोन प्रयोग करत नसेन , मी महिन्या दीड महिन्यांतून एखादाच प्रयोग करत असेन पण म्हणून माझी इन्व्होल्व्हमेंट किंवा डेडिकेशन कमी आहे का ?....
प्रेक्षकांना आम्ही समजावून सांगत नाही म्हणून ते परत परत चुका करत राहतात.. त्यांना जाणीवच नाही तर सुधारणार काय?
वाचने
14175
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजिबात नाही!
खरंच. समोर
मास्तर
महत्वाचा विषय
आश्चर्य आहे
In reply to महत्वाचा विषय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
साहेब एक विसरलात..
सताड
In reply to साहेब एक विसरलात.. by एक
येस...सर्वांच्या पायावर पाय देत रांगेत शिरणं...
In reply to सताड by भडकमकर मास्तर
चित्रपट
तुम्ही मुम्बै ला भाइदास मधे कधी नाटक केलय?
गुटख्याच्या पुड्यांचा चुरचुराटआणि थुंकणे
In reply to तुम्ही मुम्बै ला भाइदास मधे कधी नाटक केलय? by विजुभाऊ
पिक्चर
In reply to गुटख्याच्या पुड्यांचा चुरचुराटआणि थुंकणे by भडकमकर मास्तर
उशीरा पोचण्याचा प्रसंग
वा!
In reply to उशीरा पोचण्याचा प्रसंग by धनंजय
२.मोबाईल
इथे
झालं
In reply to इथे by गुंडोपंत
अरे हो!
In reply to झालं by सहज
कोण म्हणतं... ?
In reply to झालं by सहज
इथेच
In reply to कोण म्हणतं... ? by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> इथेच तर
In reply to इथेच by गुंडोपंत
बर्याच अंशी मास्तरांशी सहमत...
मोबाईल
In reply to बर्याच अंशी मास्तरांशी सहमत... by मनिष
असहमत.
In reply to मोबाईल by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच म्हणतो..
In reply to असहमत. by लंबूटांग
मोबाईल बंद
In reply to बर्याच अंशी मास्तरांशी सहमत... by मनिष
सायलेंट मोड
In reply to मोबाईल बंद by भडकमकर मास्तर
सहमत...
In reply to सायलेंट मोड by प्रकाश घाटपांडे
ह्म्म..
जाणीव
मोबइल वाजेल त्याने सगल्या ऑफिस साठी चहा मागवायचा
फक्त ऑफिस?
In reply to मोबइल वाजेल त्याने सगल्या ऑफिस साठी चहा मागवायचा by विदुषक
मास्तर,
सायलेंट मोड