लोहगडावरून नेहमी खुणवणारा तिकोना मागच्या वर्षी राहून गेला होता, पण काल योग होता, अगदी मागच्याच रवीवारी राजमाचीची सफर झाली असल्यामुळे शरीर जरी थकलेले होते तरी तिकोना म्हणाल्या म्हणाल्या परत शरीरात उत्साह संचारला व सकाळ सकाळीच स्वामी व मी बाईक वरून तिकोनाकडे वाटचाल चालू केली. इ.स.१६५७ मध्ये शिवाजीराजेंनी हा गड आपल्या साम्राज्यात घेतला, व नेताजी पालकर (इ.स.१६६०) येथील सर्वेसर्वा होते. या गडाची निर्मिती व त्याचा गतकाळासंबधात काहीच माहीती उपलब्ध नाही असे दिसते आहे.
समोर तुंग तर, उजवीकडे दिसणारे लोहगड आणि विसापूर! व मध्ये पवनाचा भलामोठा जलाशय! अत्यंत रम्य असे ठिकाण असून तिकोनापेठ गावातून चालत जरी गेले तरी गडावर पोहचण्यासाठी एक तास पुरेसा आहे. गड चढण्यास खूपच सोपा आहे (पावसाळ्यात तेवढाच धोकादायक देखील). गडावर पाहण्यासारखे खूप काही आहे व गडाची निगा राखण्याचे काम शिवदुर्ग संवर्धन ही संस्था अतिशय उत्तम प्रकारे करत आहे.
लांबून दिसणारा तिकोना, याच्या अगदी समोर तुंग आहे.
तिकोनावर चढाई मार्ग.
चढाईच्यावेळी डावीकडे येणारी खोलवर दरी, येथे पाऊलवाट थोडी धोकादायक आहे,मुरूम असल्यामुळे निसरडी आहे ही वाट.
पहिल्या टप्पातील प्रवेशद्वार (भुयारी मार्ग असे देखील याचे नाव आहे.)
वेताळ दरवाजाच्या वरील भाग.
वेताळ दरवाजा
वेताळ मंदिर अवशेष
"पनवती"वर पाय देऊन उभा असलेला चपेटदान मारूती.
गडावर ५ लेणी आहेत, त्यातील एक लेणं अपुर्ण असून ४ पुर्ण आहेत. आता तेथे तुळजाभवानी मंदिर आहे. समोर स्वच्छ पाण्याचं टाकं देखील आहे.
सुस्थितीतील चुन्याचा घाना.
बालेकिल्ला चढाईमार्ग
गडावर प्रवेश
क्रमशः

वाचने
4383
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो सुरेख चुन्याचा घाणा काय
पुर्वीच्या काळी दगदी बांधकामे
In reply to फोटो सुरेख चुन्याचा घाणा काय by पियुशा
@ ५० फक्त धन्यवाद
In reply to पुर्वीच्या काळी दगदी बांधकामे by ५० फक्त
हा घाणा हा प्रकार फार जुना नव्हे मात्र !
In reply to पुर्वीच्या काळी दगदी बांधकामे by ५० फक्त
द्शानना दशानना
लईईई भारी!
आभार!
मस्तच फोटोज. आम्ही गेल्तो
मस्त काढले आहेत फोटो. अजुन
मस्त फोटो पण वर्णन अगदी
हा भाग
पुढचा भाग कधी ???
आम्ही आपले ...