Skip to main content

वितंडगड (तिकोना) - भाग १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 08/06/2012 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडावरून नेहमी खुणवणारा तिकोना मागच्या वर्षी राहून गेला होता, पण काल योग होता, अगदी मागच्याच रवीवारी राजमाचीची सफर झाली असल्यामुळे शरीर जरी थकलेले होते तरी तिकोना म्हणाल्या म्हणाल्या परत शरीरात उत्साह संचारला व सकाळ सकाळीच स्वामी व मी बाईक वरून तिकोनाकडे वाटचाल चालू केली. इ.स.१६५७ मध्ये शिवाजीराजेंनी हा गड आपल्या साम्राज्यात घेतला, व नेताजी पालकर (इ.स.१६६०) येथील सर्वेसर्वा होते. या गडाची निर्मिती व त्याचा गतकाळासंबधात काहीच माहीती उपलब्ध नाही असे दिसते आहे. समोर तुंग तर, उजवीकडे दिसणारे लोहगड आणि विसापूर! व मध्ये पवनाचा भलामोठा जलाशय! अत्यंत रम्य असे ठिकाण असून तिकोनापेठ गावातून चालत जरी गेले तरी गडावर पोहचण्यासाठी एक तास पुरेसा आहे. गड चढण्यास खूपच सोपा आहे (पावसाळ्यात तेवढाच धोकादायक देखील). गडावर पाहण्यासारखे खूप काही आहे व गडाची निगा राखण्याचे काम शिवदुर्ग संवर्धन ही संस्था अतिशय उत्तम प्रकारे करत आहे. tikona1.jpg लांबून दिसणारा तिकोना, याच्या अगदी समोर तुंग आहे. tikona2.jpg तिकोनावर चढाई मार्ग. tikona3.jpg चढाईच्यावेळी डावीकडे येणारी खोलवर दरी, येथे पाऊलवाट थोडी धोकादायक आहे,मुरूम असल्यामुळे निसरडी आहे ही वाट. tikona4.jpg पहिल्या टप्पातील प्रवेशद्वार (भुयारी मार्ग असे देखील याचे नाव आहे.) tikona5.jpg वेताळ दरवाजाच्या वरील भाग. tikona6.jpg वेताळ दरवाजा tikona7.jpg वेताळ मंदिर अवशेष tikona9.jpg "पनवती"वर पाय देऊन उभा असलेला चपेटदान मारूती. tikona10.jpg tikona11.jpg गडावर ५ लेणी आहेत, त्यातील एक लेणं अपुर्ण असून ४ पुर्ण आहेत. आता तेथे तुळजाभवानी मंदिर आहे. समोर स्वच्छ पाण्याचं टाकं देखील आहे. tikona12.jpg सुस्थितीतील चुन्याचा घाना. tikona13.jpg बालेकिल्ला चढाईमार्ग tikona14.jpg tikona15.jpg tikona16.jpg गडावर प्रवेश क्रमशः

वाचने 4383
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by पियुशा

पुर्वीच्या काळी दगदी बांधकामे करताना, जोड देण्यासाठी , जिथे हल्ली सिमेंट वापरतात, त्या ऐवजी, चुना व गुळाचे मिश्रण वापरत. असा चुना अतिशय मुलायम मळुन घ्यावा लागत असे, आणि अर्थात हे येरागबाळ्याचे काम नव्हे. या साठी, या फोटोत दाखवल्याप्रमाणे चुन्याचा घाणा असे, सर्व साधारणपणे शेतातले खळे ज्याप्रकारे काम करते तसेच हा घाणा देखील काम करीत असे. याच्या मध्यभागी एक लाकडी / दगडी खांब असे, आणि त्याच्या पासुन एक आडवा लाकडाचा ओंडका असे, ज्याला वर फोटोत दाखवलेले दगडी चाक लावलेले असे, ते चाक त्याच्या खालच्या चाकोरीट बैलाच्या साहाय्याने फिरवले जात असे. व चाकोरीत चुना मळला जात असे. पावसाळा वगळता वर्षभर हे काम चालु असे, उत्तम प्रतीचा १० पाट्या चुना तयार होण्यासाठी साधारणपणे एक दिवस लागत असे. किल्याचे बांधकाम सुरु करायचे निश्चित झाले की, पायाभरणी बरोबरच किंवा त्याआधीच चुन्याचा घाणा बांधला जात असे. गावातील किंवा आसपासच्या परिसरातील मस्तवाल बैलांना / रेड्यांना / वळुंना शिक्षा म्हणुन, मस्ती उतरवण्यासाठी अशा चुन्याच्या घाण्यांना जुंपले जात असे. त्यांच्यासाठी, तेलाचा घाणा म्हणजे न्यायालयीन कोठडी तर चुन्याचा घाणा म्हणजे अंडा सेल असं समजु शकता.

In reply to by ५० फक्त

चुन्याचा घाणा हा मी निदान १९६५ पर्यंत तरी पाहिलेला आहे. सिमेंटचे दुर्भिक्ष्य त्यावेळी ही होते. आता खेडेगावातही मोठ्या प्रमाणावर सिंमेट मॉर्टर वापरीत असल्याने घाणा ही मुद्दाम माहिती करून देण्याची चीज झाली.

दशानना दशानना करतो तुजसी प्रार्थना भ्रमंती कर सर्वथा, असेच पुनः येउ दे ना !

राज, फोटो सुपर्ब! माहिती जरा थोडक्यात आटपलीस पण आवडली!

मस्तच फोटोज. आम्ही गेल्तो तेव्हा एक कुत्रं इमानेइतबारे गडाच्या माथ्यापर्यंत आल्तं आमच्या मागेमागे :) त्याला दिलं मग थोडं खायला. बाकी तिकोन्याला वितंडगड हे नाव कुठल्या ऐतिहासिक साधनात दिलेले आहे याबद्दल वाचायला आवडेल.

मस्त काढले आहेत फोटो. अजुन थोडी जास्त माहिती हवी होती. दिवाळीपुर्वी एकदा जाऊन यायला हरकत नाही. 'वल्ली', ऐकतोयस ना? ;)

मस्त फोटो पण वर्णन अगदी थोडक्यात आटपलेत राजे. तिकोनाच्या मध्यातल्या त्या लेणी ब्राह्मणी शैलीतल्या असून सातवाहन व शिलाहार यामधील काळात कधीतरी खोदल्या गेल्या. किल्ल्याचा काळ तेव्हाचाच असावा. तिकोना हे टेहळणीचे एक ठाणे म्हणून बांधले असावे. बालेकिल्ल्यातल्या दरवाजाच्या पोटात थंडगार पाण्याचे टाके आहे. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय.

आवडलाच आता पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

आम्ही आपले काल तिकोना पाहून आलो .( गुगल अर्थ जिंदाबाद) पूर्वेच्या बाजूच्या रिजवर पातळशी वाट दिसतेय त्या बाजूने चढाईचा मार्ग आहे काय ?