साहित्य:
४ ब्रेड स्लाइस
३/४ लसूण पाकळ्या बारीक चिरून
२ मध्यम आकाराचे टोमॅटो (मिक्सर मधे प्युरी करून)
१ लाल सुकी मिरची चुरडून
२ चीज़ स्लाइस
मीठ चवीनुसार
चिमूटभर साखर
मिक्स हर्ब्स (असल्यास)
२/३ तुळशीची पाने (असल्यास)
कृती :-
१) पॅन मधे तेल घेऊन गरम करायला ठेवा.
२) त्यात चिरलेला लसूण घाला व परता.
३) त्यात टोमॅटो प्युरी घाला व थोडे घट्ट होई पर्यंत व रंग किंचित गडद होईपर्यंत परता.
४) त्यात मीठ,साखर,चुरडलेली लाल मिरची,हर्ब्स,तुळशीची पाने तोडून टाका. आता आपला टोमॅटो स्प्रेड तयार आहे.
५) हा स्प्रेड ब्रेड स्लाइस वर पअरा.त्यावर चीज़ स्लाइस ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवा.(चीज़ स्लाइस वर मिरपूड हवी असेल तर टाकु शकता.)
त्याचे त्रिकोणी तुकडे कापून खायला घ्या.

वाचने
7210
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान दिसतेय पा कृ
+१ असेच म्हणतो.
In reply to छान दिसतेय पा कृ by कुंदन
अरे वा.. करायला एकदम सोपा आहे
मस्त सोपी आहे कृती
मस्त वाटतेय...
छान ! अमोल केळकर
सुंदर आणि
बेष्ट !
धन्यवाद!!
मस्त आहे
टॉम्याची सँडविच असे शीर्षक
एकच प्रश्न - ही टॉम ची का
बहुतेक
In reply to एकच प्रश्न - ही टॉम ची का by ५० फक्त
टोमॅटो + चिली / टोमॅटो + चीज
In reply to बहुतेक by पैसा
चान...चान...
छान .. चीज च्या ऐवजी उकडिच्या अन्ड्याचे काप टाक्ले तरि छान लागता
तसेही छान लागेल...त्या वर मीठ
In reply to छान .. चीज च्या ऐवजी उकडिच्या अन्ड्याचे काप टाक्ले तरि छान लागता by कौतिक राव
अहा.........मस्त रेसिपी
वाह! छानचं