✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वन हिट वंडर - १ -> That Thing You Do

प
प्रास यांनी
Fri, 06/08/2012 - 14:37  ·  लेख
लेख
१९९६ साली टॉम हॅन्क्सची निर्मिती असलेला एक चित्रपट आलेला, 'That Thing You Do' नावाचा. यात चार तरुणांच्या एका गटाची संगीत क्षेत्रातील सुरूवातीची मुसाफिरी फार सुंदररीत्या दाखवली होती. यामधील याच नावाचं गाणं मूळ अ‍ॅडम श्लेसिंगरने लिहीलं असून चित्रपटात या गाण्याची कथा "वंडर्स" नावाच्या ग्रूपच्या माध्यमातून दर्शवलेली आहे. त्यात होतं काय की मूळ बलाड् (Ballad ) स्वरूपात लिहिलेलं प्रेमगीत गाणं ऐन मोक्याच्या क्षणी ड्रमवादकाच्या द्रुत लयीतल्या ताल वादनाने रॉक गीतात परिवर्तीत होतं आणि जबरदस्त प्रसिद्ध होतं. अमेरिकन संगीत क्षेत्रात अगदी धुमाकूळ घालू लागतं. अमेरिकन संगीत दुनियेचं प्रगती पुस्तक मानलं जाणार्‍या बिलबोर्ड्स चार्टमध्ये येतं. नुसतंच येत नाही तर पुढची पुढची पायदानं चढत चढत शिखरावर पोहोचतंय की काय असं वाटण्याइतपत लोकप्रिय होतं. या गाण्यामुळे त्यांना नव्या ऑफर्स येऊ लागतात. टीव्हीवर कार्यक्रमांमध्ये हे गाणं सादर करण्याची संधि मिळते. त्यांच्या गाण्यांचा अल्बम काढण्यासाठी मोठा संगीत निर्माता त्यांना ऑफर देतो. पण दरम्यान ग्रूपमधल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटतात नि परिणामी या "वंडर्स" ग्रूपमधल्या सभासदांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण होऊन तो फुटतो आणि 'वन हिट वंडर' ग्रूप बनतो.
'वन हिट वंडर' ही खास अमेरिकन संगीतामधली संज्ञा आहे. अमेरिकन म्हणा किंवा युरोपियन, या लोकांची एक विचित्र पद्धत आहे. यांना प्रत्येक गोष्ट मोजायची फार मोठी खोड आहे. गोष्ट नुसतीच मोजायची नाही तर त्या मोजमापाची रीतसर नोंदही करून ठेवायची. फारा वर्षांपासून केलेल्या असल्या काटेकोर नोंदी युरोपात वगैरे मिळतात. (भारतीयांना त्यांच्या १०% जरी अशी सवय असती तर मिपावरची मोठी बॅण्डविड्थ काथ्याकुटात फुकट गेली नसती ;-)) तसाच काहीसा प्रकार त्यांनी संगीतामध्येही केलेला आहे. तिथे एखाद्या गाण्याची लोकप्रियता मोजण्याची फुटपट्टी बिलबोर्ड टॉप १०० या यादीमधून बनते. या यादीमध्ये जे गाणं वरच्या क्रमांकावर ते गाणं तेवढं लोकप्रिय. आता या १०० गाण्यांच्या यादीमध्येही पुन्हा दुजाभाव करत शीर्षस्थ ४० आणि पादस्थ ६० अशी विभागणी केली जाते. सर्वसामान्यपणे या शीर्षस्थ ४० मध्ये एखादं गाणं आलं तरच ते 'हिट' मानण्याचा प्रघात आहे. या पद्धतीच्या 'हिट'च्या अनेक व्याख्या अनेकांनी आपापली बुद्धी खर्च करून मांडल्या आहेत पण इथे मात्र आपण वरचीच व्याख्या मानून पुढे जाणार आहोत. या अशा 'हिट' गाण्यांच्या नोंदी वर्षानुवर्ष बिलबोर्ड टॉप १०० हिट्स यादीमध्ये होत आहेत. या यादीमध्ये एखाद्या कलाकाराचं किंवा ग्रूपचं त्यांच्या सांगीतिक आयुष्यात केवळ एकच गाणं टॉप ४० मध्ये येऊन हिट झालं तर तो कलाकार वा ग्रूप आणि ते गाणं हे 'वन हिट वंडर' मानलं जातं. भौगोलिक दूरतेमुळे किंवा भाषिक कारणांनी सांगीतिक इतिहासात अनेक कलाकार आणि ग्रूप तथा त्यांची गाणी 'वन हिट वंडर्स' म्हणून गणली गेली आहेत पण प्रत्यक्षात ते व त्यांची गाणी खूपच लोकप्रिय झाली आहेत. म्हणजेच ही संकल्पना काही सर्वसमावेशक अशी म्हणता येणारच नाही. तरी आपण सध्या तशा काही गाण्यांचा आनंद घ्यावा असा विचार आहे. तर सुरूवात कुठून करावी? विषय जर 'That Thing You Do'चा निघालेला आहे आणि मला व्यक्तिशः हे गाणं आणि त्याच नावाचा चित्रपट दोन्ही आवडतात तर याच गाण्यापासून होऊन जाऊ द्या श्री गणेशा!
मूळ लिरिक्स - You, Doin' that thing you do, Breaking my heart into a million pieces, Like you always do And you, Don't mean to be cruel, You never even knew about the heartache, I've been going through Well I try and try to forget you girl, But it's just so hard to do, Every time you do that thing you do I, Know all the games you play, And I'm gonna find a way to let you know that, You'll be mine someday 'Cause we, Could be happy can't you see, If you'd only let me be the one to hold you, And keep you here with me 'Cause I try and try to forget you girl, But it's just so hard to do, Every time you do that thing you do I don't ask a lot girl, But I know one thing's for sure, It's the love I haven't got girl, And I just can't take it anymore 'Cause we, Could be happy can't you see, If you'd only let me be the one to hold you, And keep you here with me Cause it hurts me so just to see you go, Around with someone new, And if I know you you're doin' that thing, Every day just doin' that thing, I can't take you doing that thing you do विडिओसाठी यू ट्यूबचे आणि फोटोंसाठी आंतरजालाचे आभार.
  • वन हिट वंडर - २ -> 'Disco Duck'
  • वन हिट वंडर - ३ -> 'King Tut'
  • वन हिट वंडर - ४ -> 'Cotton Eye Joe'
  • वन हिट वंडर - ५ -> 'Mambo no. 5'

Book traversal links for वन हिट वंडर - १ -> That Thing You Do

  • वन हिट वंडर - २ -> 'Disco Duck' ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
3205 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

प्रास , गाणं ऐकतो पण एक गोष्ट नक्की की इंग्लिश लिरिक्स देताय

संजय क्षीरसागर
Fri, 06/08/2012 - 15:23 नवीन
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! नाय तर एक शब्द कळेल तर शप्पत!
  • Log in or register to post comments

हायला.. दॅट थिंग यू डू हे

गवि
Fri, 06/08/2012 - 15:24 नवीन
हायला.. दॅट थिंग यू डू हे एकदम क्लोज टू हार्ट आवडत्या गाण्यांपैकी असूनही त्याचा गायक ग्रुप "वंडर्स" हा काल्पनिक (सिनेमातला) आहे हे माहीत नव्हतं. या मालिकेतून खरोखर अशी उत्तम माहिती मिळतेय.. पण मग खरं कोणी म्हटलं आहे रे ते? काय गाणं आहे.. सुप्पर... पुन्हा आठवण करुन दिल्याबद्दल आणि नवीन माहिती दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद... आता आज उरलेला दिवस "दॅट थिंग यू डू" गुणगुणत राहण्यात जाणार...
  • Log in or register to post comments

थॅन्क्स यार, गवि! दॅट थिंग

प्रास
Fri, 06/08/2012 - 17:47 नवीन
थॅन्क्स यार, गवि! दॅट थिंग यू डू हे माझंही अगदी क्लोज टू हार्ट गाणं आहे रे.... :-)
पण मग खरं कोणी म्हटलं आहे रे ते?
ते गाणं 'कॅण्डी बुचर्स' ग्रूपच्या 'माई़क वायोला'ने म्हंटलेलं आहे रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दो. आ. प्र. का. टा. आ.

प्रास
Fri, 06/08/2012 - 18:17 नवीन
दो. आ. प्र. का. टा. आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वन हिट वंडर्स म्हणता येतील

गवि
Fri, 06/08/2012 - 15:27 नवीन
वन हिट वंडर्स म्हणता येतील अशी भारतीय उदाहरणं बरीच आहेत. आवाज, संगीत याची क्वालिटी काही का असेना पण हिट होण्याचा निकष लावला तर एखाददुसरं गाणं गाजवून लोप पावलेले अनेक बँड्स आहेत. -बाबा सहगल - ठंडा ठंडा पानी -आपाचे इंडियन -विकास भल्ला - धुआं - सुनीता राव - परी हूं मैं. इत्यादि..
  • Log in or register to post comments

खरंय गवि,

प्रास
Fri, 06/08/2012 - 18:29 नवीन
लोकप्रियता हा निकष लावला तर भारतातही अशा वन हिट वंडर्सची कमी नाहीये. या यादीत प्रदिप रॉय, अनायडा आदि अनेक तथाकथित गायकांना अ‍ॅडावे लागेल... खुद के साथ बातां : मिपाकरांच्या डोक्यावर या विषयावरची आणखी एक लेख-माला आदळावी का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हिम्मत दाखवा आणि

jaypal
Fri, 06/08/2012 - 19:06 नवीन
मिपाकरांच्या डोक्यावर या विषयावरची आणखी एक लेख-माला आदळवा. लेख नेहमी प्रमाणे लै भारी हे.वे.सा.न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

लेख आवडला.

पैसा
Fri, 06/08/2012 - 19:59 नवीन
गाणं ऐकण्यापेक्षा त्याचे शब्द दिल्यामुळे जास्त आवडलं. आदळा तुमची लेखमाला मिपावर! स्वागत आहे. पण आणखी एक मालिका अर्धीच ठेवलीय हे लक्षात असू दे!
  • Log in or register to post comments

हेच बोलतोय. आणि सिटीझन

प्रचेतस
Fri, 06/08/2012 - 20:16 नवीन
हेच बोलतोय. आणि सिटीझन केनचं काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा