Skip to main content

राजमाची

लेखक दशानन यांनी बुधवार, 06/06/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
DSC02377.jpg DSC02318.jpg DSC02328.jpg (हा देव कुठला? वेशीवरचा देव आहे हे नक्की) DSC02337.jpg DSC02346.jpg DSC02347.jpg DSC02351.jpg DSC02357.jpg DSC02359.jpg DSC02368.jpg DSC02373.jpg DSC02377.jpg

वाचने 8079
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

मस्त फोटो. तो वेशीवरचा देव बहुधा काळभैरव आहे. तिथेच झाडाखाली एक दोन वीरगळ पण आहेत. नुसत्या फोटोंचा धागा टाकलाय तर फोटो अजून जास्त हवे होते.

In reply to by दशानन

तो कदाचित वेशीवरचा राखणदार पण असू शकेल. संभाजीपुत्र शाहू महाराजांनी किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला होता. तेव्हा कोकणातील ही वेशीवरच्या राखणदाराची पद्धत सुद्धा राजमाचीच्या वेशीवर या मूर्तीच्या रूपाने आली असेल. कारण खुद्द माचीवर भैरवनाथाचे देऊळ आहेच, तेव्हा परत वेशीवर काळभैरवच असेल असे वाटत नाही.

राजे, फोटो लैच भारी आहेत पण लेख कुठे आहे?

In reply to by पैसा

सेम टू सेम बोल्तो. फोटोबरोबर काही वर्णन यायला पाहिजे होतं ना राव. -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

प्रभोसारखा कोणी असता तर नसतं विचारलं!
=)) बादवे तो दुसर्‍या फोटोतला किटक माशी आणी लेडीबगच्या मिलनातुन आला आहे काय?

In reply to by गणपा

पण खरच! पण कोण्या युरोपियनाने जर असा फोटो काढून 'बास्टर्ड' अश्या शीर्षकाखाली टांगला असता तर देश, समाज, समाजाच्या काठापलिकडची वस्ती असा मानववंशशास्त्र, इतिहास व्यापणारा, काहीसा गहन अर्थबोध करणारा फोटो म्हणून जगभर प्रसिद्ध झाला असता राव!! राज फोटो भारी!

In reply to by पैसा

पण राजे लिहू शकतो म्हणून विचारतेय. प्रभोसारखा कोणी असता तर नसतं विचारलं! का हो जाता जाता बिचार्‍या प्रभ्याला एक धपाटा घालताय ते. प्रभ्या, आता घेच मनावर. चल आता तू, डान्राव नि विमो युरो कपच्या निमित्ताने हो जाव शुरू. दिखा दो जमानेको की तुम भी क्या चीज हो.

In reply to by पैसा

लिहावे असे खूप वाटत होतं पण लिहायला सध्या वेळच मिळत नाही आहे, एक मंदिरे व शिल्पकला यावर लेखमाला लिहीत आहे, त्यावरच भरपूर वेळ जात आहे.

राजमाची वर आजच सकाळी जाउन आलो पाच मिनिटात ! ( संदर्भ गूगल अर्थ) हे सारे फोटो पाहून नेत्र सुख मिळाले पण थोडक्यात सुद्धा वर्णन नसल्याने चुकचुकल्यासारखे होतेय राव ! बा द वे गूगल अर्थ मधे दाखविलेला "ट्रेक " नावाचा रस्ता ( तुंगार्ली धरणाच्या बाजूने जाणारा) हा एकमेव रस्ता राजमाचीसाठी आहे का ? माहिती द्यावी ही विनंति .

In reply to by चौकटराजा

>गूगल अर्थ मधे दाखविलेला "ट्रेक " नावाचा रस्ता ( तुंगार्ली धरणाच्या बाजूने जाणारा) आम्ही याच रस्ताने गेलो, पण हा एकमेव रस्ता नसावा, कारण कर्जत कडून देखील एक रस्ता आहे व लोकलने येणारे पण एक वेगळाच रस्ता पकडून येतात असे कळले.

In reply to by दशानन

कर्जतहून येणारा रस्ता पायथ्याच्या कोंदिवडे गावाजवळून कोंडाणे लेण्यांच्या वाटेने वर चढत येतो. अतिशय खडी, दमछा करणारी वाट आहे पण तितकीच निसर्गसुंदर. अजून एक रस्ता कर्जत-वदप-सांडशी घाटाने ढाक बहिरीमार्गे येतो हा बराच लांबचा रस्ता आहे.

In reply to by प्रचेतस

वल्ली साहेब ( निश स्टाईल मधे ) , धन्यवाद माहितीबद्द्ल. ते उरलेले दोन मार्ग पुढच्या जन्मी करावे म्हणतो .

ती काळीकुट्ट जाडसर बोर्डरलाईन टाकून चांगल्या फोटोंचं पोस्टर करून टाकलं सालं.

मस्त फोटु!!!... पण लेख कुठे आहे दशानना!!..... ;) पहिल्या आणि शेवटच्या फोटोत काही सूक्ष्म १० फरक आहेत का?.. आणि ते फरक आम्ही ओळ्खावेत.. असे आपणास वाटते का? ;)

तुझ्या नावातच राजा असल्याने तू टाकलेले फोटो हे अविस्मरणीयच असणार ह्यात काय शंका ? बाकी हात कुठे अडकले होते ज्यामुळे लिखाण न करता फकस्त फटू टाकले ? आणि हो श्री. दशानन हे मिपावरती फक्त स्वतःचे लेख टाकण्यापुरते येतात असे आम्हाला आढळले आहे*. तरी त्यांच्यावरती कारवाई व्हावी. ;) *म्हणजे माझ्या लेखावरती तुझी प्रतिक्रिया का नाहीये ?

क्लास आहेत छायाचित्रे राजे. :-) ही चित्रे मुळ रेझोल्युशन मध्ये कुठे मिळतील ?

मस्त आलेत फोटो!!