दीपोत्सव किल्ल्यांवरचा !
तिकोन्यावरील दीपोत्सव
या मंगलमयी सोहळ्यात कधी गडावरील किल्लेदार, गावकरी, पायथ्याच्या गावातली मंडळी कधी गडावरची ट्रेकर मंडळी आवर्जून सामिल होतात. राजगडावरील किल्लेदार ढेबे, रायरेश्वरावरचा दगडू जंगम, तिकोन्याचं वसंता बोडकेचं कुटूंब ही काही उल्लेखनीय नावं. त्यांना या सोहळ्याचं फार कौतूक ! दरवर्षीचा दीपोत्सव रायरेश्वरावरच व्हावा हा दगडूचा निरागस हट्ट !
जेवणं झाल्यावर रंगतो गप्पांचा फड आणि मग मागील दिवाळीच्या आठवणीत मंडळी रमून जातात. शिवकल्याण राजातील गीतांची आवर्तनं होतात. किल्ल्याच्या इतिहासाची माहीती आणि महती जमलेल्या उपस्थितांना दिली जाते. पुढल्या वर्षीच्या दीपोत्सवासाठी एखाद्या नवीन किल्ल्याची निवडही तिथेच होते.
ह्या सगळ्यातून काय मिळतं ? तर उत्तर एकच, आत्यंतिक समाधान ! या गडकिल्ल्यांशी जोडली गेलेली नाळ अधिकाधिक दृढ होते, ते अशाच सगळ्या सोहळ्यांमुळे. या सगळ्यातून मिळाणार्या समाधानाची तुलना अन्य कश्या सोबत होणं निव्वळ अशक्य आहे !!
टीपः ब्लॉग व ई-शिवसह्याद्री मासिकात पूर्वप्रकाशित
--
जातीवंत भटका
राजगडावरील दीपोत्सव
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप- आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ आणि या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव !!!
रायरेश्वरावरील दीपोत्सव
पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा सह्यगिरीतील किल्ल्यांवर माणसांचा राबता होता त्यावेळी गडांवर नक्कीच दीपावली साजरी होत असणार यात शंका नाही. त्यावेळचे गडवैभव नक्कीच डोळ्यांचे पारणे फ़ेडणारे असेल. या गडकोटांनाही वाटत असेलच की पुन्हा पहावी तशीच दिवाळी !!
याचसाठी गडांच्या भूतकाळात दडलेल्या स्म्रृतींना उजाळा देण्यासाठी डोंगरयात्रा ट्रेकिंग क्लबची दिवाळी दरवर्षी सह्याद्रीतील एखाद्या किल्ल्यावर साजरी होते.
घरचं लक्षीपूजन उरकलं की पावलं आपसूक सह्याद्रीकडे वळतात ते याच दीपोत्सवासाठी. थोडा फराळ एकवेळचा डबा, आकाशकंदील, तीन-चारशे पणत्या,२ लीटर गोडं तेलं, वातींचं बंडल, आणि प्रसादासाठी मोतीचूराचे लाडू इत्यादी सामानाची खरेदी उरकून सुर्यास्तापूर्वी गडावर पोहोचायची लगबग असते.
गडावर पोहोचल्यावर सगळी मंडळी आपापल्या कामाला लागतात. कोणी मंदीर झाडून घेतो, तर कोणी अंगणात सडे टाकतो, कोणी वाती वळायला लागतो तर कोणी पणत्याची मांडणी करतो, कोणी तेल भरण्याची जबाबदारी घेतो. उत्साही महिला मंडळाची रांगोळ्यांची तयारी चालू असते. मुख्य गाभार्यासमोर घातलेल्या मोठ्या गालीच्या पासून ते अगदी प्रत्येक पणतीच्या भोवती घातलेली सुरेख नक्षी वातावरण मंगलमय करून सोडते. कोणाच्या तरी मोबाईलवर मागे मंद आवाजातील बिस्मिल्लाची सनई सुरू असते. गडदेवतेसमोर धूपदीप लावले जातात. वातावरण एकदम उत्साहपूर्ण आणि प्रसन्न असते. मंदीर आणि परीसरात सगळीकडे पणत्या लावल्या जातात. पारंपारीक पेहरावात मग गडदेवतेची आरती होते. सगळीकडे मंत्रमुग्ध करणारं आणि काहीसं भारून टाकणारं असं वातावरण असतं.
तिकोन्यावरील दीपोत्सव
या मंगलमयी सोहळ्यात कधी गडावरील किल्लेदार, गावकरी, पायथ्याच्या गावातली मंडळी कधी गडावरची ट्रेकर मंडळी आवर्जून सामिल होतात. राजगडावरील किल्लेदार ढेबे, रायरेश्वरावरचा दगडू जंगम, तिकोन्याचं वसंता बोडकेचं कुटूंब ही काही उल्लेखनीय नावं. त्यांना या सोहळ्याचं फार कौतूक ! दरवर्षीचा दीपोत्सव रायरेश्वरावरच व्हावा हा दगडूचा निरागस हट्ट !
जेवणं झाल्यावर रंगतो गप्पांचा फड आणि मग मागील दिवाळीच्या आठवणीत मंडळी रमून जातात. शिवकल्याण राजातील गीतांची आवर्तनं होतात. किल्ल्याच्या इतिहासाची माहीती आणि महती जमलेल्या उपस्थितांना दिली जाते. पुढल्या वर्षीच्या दीपोत्सवासाठी एखाद्या नवीन किल्ल्याची निवडही तिथेच होते.
ह्या सगळ्यातून काय मिळतं ? तर उत्तर एकच, आत्यंतिक समाधान ! या गडकिल्ल्यांशी जोडली गेलेली नाळ अधिकाधिक दृढ होते, ते अशाच सगळ्या सोहळ्यांमुळे. या सगळ्यातून मिळाणार्या समाधानाची तुलना अन्य कश्या सोबत होणं निव्वळ अशक्य आहे !!
टीपः ब्लॉग व ई-शिवसह्याद्री मासिकात पूर्वप्रकाशित
--
जातीवंत भटका
वाचने
8887
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच. येत्या दिपोत्सवात
वल्ली शेठशी बाडिस
In reply to छानच. येत्या दिपोत्सवात by प्रचेतस
नक्कीच !
In reply to वल्ली शेठशी बाडिस by jaypal
म्या बी.... म्या बी
In reply to नक्कीच ! by जातीवंत भटका
+१
In reply to म्या बी.... म्या बी by सुहास झेले
अरे वा..
अगदी असेच म्हणतो.
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
असेच म्हणते
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
+१ असेच म्हणतो
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
फोटो मस्तच आहेत.
फोटो
व्वा !!! फोटो इतके सुरेख आले
सगळेच फोटो फार सुंदर आहेत!!
चांगला उपक्रम आहे
वा! सुंदर!
मनाला अतीव समाधान वाटलं आणि
असेच म्हणते!
In reply to मनाला अतीव समाधान वाटलं आणि by दीपा माने
पैसाबाय, एकदम सोप्पं आहे! काय
In reply to असेच म्हणते! by पैसा
सगळे फोटो सुंदर आहेत.
दिपोत्सवाला येणार म्हणजे
भटके... हटके .....
उत्तम
वाह. खुपच सुरेख. नितांत
फारच छान फोटो. तुमचा उपक्रम
सुरेख !!
अप्रतिम फोटो. पुढीलवेळी
+1 असेच म्हणते
In reply to अप्रतिम फोटो. पुढीलवेळी by दशानन
ह्या उपक्रमाची जमेल तिथे
ज्याची