मृत्यु
लेखनप्रकार
मृत्यु.
जीवनातील एक सत्य.
कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात. मग नंतर जग चालू राहिले काय किंवा न राहिले काय?
पण मग अशी जाणीव नाहीसे होणे झोपेत सुद्धा होते. गाढ झोप ही सुद्धा सर्व जाणीवांना स्वतःमधे विलीन करुन टाकते. कशाची सुद्धा शुद्ध रहात नाही. झोप ही एक प्रकारे मृत्युचेच रुप म्हणावे का? फक्त आपण झोपेतुन परत जागे होतो. जाणीव परत येते. मी माझे ही जाणीव परत डोके वर काढते आणि जी सुख दु:ख विहिन आनंदमयी अवस्था होती ती संपून जाते. मग मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का? आनंददायी अवस्था असावी का? सांगता येत नाही. की झोपेच्या पलीकडची अवस्था? जिचे भ्रष्ट रुप झोप आहे? मग झोप हवीसी वाटणारा जीव मृत्युच्या जाणीवेने का घाबरतो?
कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते.
मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...
वाचने
21039
वाचनखूण
प्रतिक्रिया
100
In reply to परीणामांची चिंता का? by संजय क्षीरसागर
एकदा आपण 'विदेह' आहोत हा
In reply to एकदा आपण 'विदेह' आहोत हा by कवितानागेश
अध्यात्म आणि लौकिक
In reply to अध्यात्म आणि लौकिक by संजय क्षीरसागर
थोडक्यात गडबडगुंडा करुन
असं होय!
शंभर वर्षे आयुष्य ...
In reply to शंभर वर्षे आयुष्य ... by चित्रगुप्त
आयला, मी काय म्हणतोय आणि तुमचं काय चाललय!
मृत्यु एकच सत्य
आमचे काही विचार.
In reply to आमचे काही विचार. by llपुण्याचे पेशवेll
जे काही विचार आहेत ते इथंच
हल्लीच ड्रॉप डेड डीव्हा