Skip to main content

"गांधीजींनंतरचा महान नेता"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/06/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे. या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच आहेत.. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे. समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे. असो बघू यात नेमके काय होते ते.. स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते. पण दुसर्‍या अंगाने ते बरेच झाले कारण या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे आणि सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?. आले वागळेच्या मना तेथे कोणाचे चालेना

वाचने 21381
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by निनाद मुक्काम …

कोण सुब्रमण्यम स्वामी? तो तर राजकारणात दुर्लक्षला गेलेला आणि काहीही करून प्रसिध्दीच्या झोतात राहावे यासाठी धडपड करणारा मनुष्य आहे.१९९१ मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना यानेच लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना चंद्रशेखर यांच्याबरोबर फुटलेल्या ५ मंत्र्यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवायच्या प्रश्नावर "मी तुम्हाला अटक करीन" अशी धमकी दिली होती असे वर्तमानपत्रात वाचल्याचे पक्के आठवते संदर्भ . लोकसभा अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतर चौथ्या क्रमांकाचे पद असते. अशा पदावरील व्यक्तीला आपला राजकीय स्वार्थ साध्य होत नाही म्हणून अटक करण्याची धमकी देणारा मनुष्य कायदामंत्री कसा होऊ शकतो? पुढे जयललितांविरूध्द याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये परत त्याच जयललितांबरोबर युती करून त्याने खासदारकी पदरात पाडून घेतली. त्या निवडणुकांसाठी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे अलम दुनियेला माहित होते. तरीही त्यांना पाठिंबा देत असलेल्या जयललितांबरोबर युती करून खासदारकी तर पदरात पाडलीच पण पुढे तीन महिन्यात "जातीयवादी" सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा शाहजोगपणा त्यांनीच दाखवला. २००४-०५ मध्ये रामसेतू या अजिबात महत्वाच्या नसलेल्या प्रश्नावर त्याने रान उठवायचा व्यर्थ प्रयत्न केला. ए.राजाने २जी स्पेक्ट्रम मध्ये सरकारी खजिन्याचे मोठे नुकसान केले आहे असे २००८ पासून वर्तमानपत्रात येतच होते.त्यावरूनच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून स्वामींनी फुकटची प्रसिध्दी लाटायचा प्रयत्न मात्र जरूर केला. अशा माणसाला फारसे गांभीर्याने घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

सिब्बल साहेब आता कुठे गेलात?? यावर बंदि का बरे नाही घालत? या लिस्ट मधे सावर्कर १ क्रमांकावर असते तर मात्र ताबडतोब घात्ली असती बंदी.. :tired:

In reply to by क्लिंटन

या यादीत नरसिंह रावांचे नाव नसल्याचे बघून वाईट वाटले. अहो त्यांनी संधी मिळालेली असताना देखील गांधीजींची इच्छा* साकार केली नाही, म्हणून कदाचीत त्यांचे नाव नसेल. :-) (* स्वातंत्र्योत्तर काळात, काँग्रेस राजकीय पक्ष करण्याऐवजी विसर्जीत करण्यात यावी अशी गांधींजींची इच्छा होती. ;) )

In reply to by विकास

अजून एक गाळलेले नावः अण्णा हजारे.

आमच्या एन. डी. तिवारींचे नाव का नाही यात ? आणि कलमाडी, शरदचंद्रराव पण दिसत नाहीयेत. हाय रे ह्या देशाचे दुर्दैव.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+ १ आणी आणि बहन मायावती? आणि प्रकाश आंबेडकर? आणि आणि दादा? छ्या. एक डाकटरच आणी स्व. श्री. काशिराम यांचे नाव सोडले तर लिष्ट खुपच टाकाऊ आहे,.

In reply to by मृत्युन्जय

सहमत. आणि रामदास आठवले, ज्योतीराव फुले, सावित्रीबाई, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई ह्यांची पण नावे का नाहीत ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

+ १ आणी आणि बहन मायावती? आणि प्रकाश आंबेडकर? आणि आणि दादा? छ्या. एक डाकटरच आणी स्व. श्री. काशिराम यांचे नाव सोडले तर लिष्ट खुपच टाकाऊ आहे,.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिग्गूजींना विसरून कसे चालेल? ;)

In reply to by बॅटमॅन

हा हा हा! त्यांचे नाव त्या लिष्टमध्ये नसण्यात आरेसेस चा हात आहे हे नक्की "हात" म्हणले की फक्त काँग्रेसच डोळ्यासमोर येते ! :-)

पोल सर्व्हेचा तक्ता ' द ग्रेटेस्ट इंडियन' असे म्हणतो आहे. (आणि हो, 'आमच्या' श्री. आण्णा हजारेंचे आणि 'थोड्या आमच्या' बाबा रामदेव यांचे नाव का वगळले आहे?)

काही मिपाकर अगदी जिलेबी सारखे सरळ आहेत. अगदी नाका समोर बघून चालणारे. आता नाकच वाकडे असल्यामुळे असे विचित्र प्रतिसाद देतात. बाकी आपण महाराष्ट्रातीलच लोक जर सावरकरांसारख्या व्यक्तीचा आदर ठेवू शकलो नाही तर बाकीच्या राज्यातील लोकांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? मागे मला वाटते मागे (बहुतेक मनी शंकर ऐयरने) पण सावरकरांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. त्यांना माहित आहे महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणारे दिल्लीत गेले कि शेपटी आत घालून बसतात. वाईट ह्या गोष्टीचेच वाटते कि आपलीच माणसे ह्याला खतपाणी घालतात. सावरकरांनी जी बोटीतून उडी मारली तशी उडी ह्या तथाकथित टीकाकारांनी १० फुटांवरून मारून दाखवावी. नेसलेले वस्त्र बदलायची वेळ येईल. बाकी अगदी fashion म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशीच अवस्था आहे.

In reply to by Madhavi_Bhave

अगदी. अगदी... कुणीतरी जाब विचारायला हवा सावरकरांचे नाव का नाही म्हणून... काही मिपाकर अगदी जिलेबी सारखे सरळ आहेत. सरळ जिलेबी कशी असते? आमच्याकडे तर जिलब्या वाटोळ्याच असतात.

In reply to by Madhavi_Bhave

'अनुद्गार' हा शब्द वाचून सावरकरांचा आत्मा (सावरकर असल्याने तो असण्याची शक्यता नाही हा भाग वेगळा) तळमळेल हे मत्र नक्की.

In reply to by श्रावण मोडक

अनुदार + उद्गार = अनुद्गार. :) आणि सावरकरांना कदाचित आत्मा नसला तरी तळमळणारा 'प्राण' होता हे त्यांनी स्वतःच 'सागरास' सांगितले आहे, मोडक साहेब. ;)

In reply to by विसुनाना

अनुदार + उद्गार = अनुद्गार.
इतका 'संधी''साधू'पणा आम्हाला कळतच नाही ना! ;-)

In reply to by JAGOMOHANPYARE

तुमच्यासारख्या त्रिकालज्ञाला राजाजी ठाऊक नाहीत, आश्चर्य आहे ब्वॉ. राजाजी म्हणजे 'चक्रवर्ती राजगोपालाचारी'. बाकीची माहिती तुम्ही गुगलून मिळवालच.

सॉरी जीलबी चालली आहे ना जीलब्या टाकलेले प्रतिसाद फारच रोचक आणि मनोरंजनात्मक आहेत :-) त्यातल्या त्यात माधवी भावे यांचा एकच प्रतिसाद जबरा वाटला,
सावरकरांनी जी बोटीतून उडी मारली तशी उडी ह्या तथाकथित टीकाकारांनी १० फुटांवरून मारून दाखवावी. नेसलेले वस्त्र बदलायची वेळ येईल.
अक्षरशः अंगावर काटा आला :bigsmile: बाकी जसे हि शोध मोहिम टुकार लोकांची भिकार विचारसरणी आहे तसे इथले काही सन्माननीय सदस्यांचे नेहमी येणारे प्रतिसादही त्याच पठडितले, . . . . . अवांतरः- ठाकरे काका ,बाबासाहेब पुरंदरें , P L देशपांडे, मनोहर जोशी,गडकरी,अडवाणी, गीडवाणी, राजपुरोहित यांची नावं नसल्यामुळे तीव्र णीषेद (टरकूराम रामसे)

हा निवडशोध म्हनजे बोलाचाच भात......बोलाचीच कढी.... खुप नावे ह्यात नाहित. विनोबा भावे, जय प्रकाश , बाबा आमटे . निवडशोध वाले पण त्याच लायकीचे पाहज्येतना .

In reply to by नाना चेंगट

तात्यारावांचे नाव का नाही, हीच तर चर्चा आहे... तात्यारावांचे नाव आले की त्यांचेही नाव आपोआप येईल. :)

अरुण गवळी उर्फ डेडी ( किंवा युपी मधील राजाभय्या प्रकाश आंबेडकर राहुल ,सोनिया ,राजीव ( गांधी ) मनमोहक मनमोहन आमचे आदर्श व स्फूर्तीस्थान बरीच आहेत. सध्या इतकेच

रविंद्रनाथ ठाकुर कुमार गंधर्व ओपी नय्यर त्रिंदाद मास्तर जी ए कुलकर्णी पुल चिं वि जोशी हरिप्रसाद चौरसिया... ....असे अनेक कलावंत, लेखक, कवी, संगीतकार... हे खरे ग्रेटेस्ट इंडियन्स... ....नेत्यांबद्दल काही न बोलणेच बरे.

सेंचुरी झाली.

In reply to by चिरोटा

वाह... काय "शॉट" निवडलाय सेंचुरी कंप्लीट करायला !!! अर्धवटराव

४५ वर्षे सलग सत्तेवर असलेले देशातील सर्वात कमी वयात मुख्यमंत्री बनलेले(नं २ चे ) जाणता राजा नावाने ओळखले जाणारे 'शेतकर्‍यांचा राजा' देशाचे संरक्षणमंत्री असलेले (९३ सालचे बॉम्बस्फोट विसरा) भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आणणारे (आय पी ल ला १००० कोटी ची करमाफी मिळवणारे) इतके वर्षे सत्तेत असून पैसे खाण्याच्या आरोपावरून कधीही सत्तेवरून पाय उतार न व्हावे लागलेले. वन अँड ओनली शरद पवार यांचे नाव कुठेच नाही

In reply to by आशु जोग

पुरावा द्या हो.असे बोंबलुन काय होनार आहे. त्यांच साम्राज्य MALAYSIA,DUBAI,SINGAPORE,.,.,.पर्यंत पसरले आहे. असे म्हणंतात. त्यांच्या राजकुमारीकडे म्हणे मलेशियाचेही नागरिकत्व आहे, ........त्या केस च काय झाले कोणी सांगेल का?

ताजी स्थिती काय आहे? कोण पुढे, कोण मागे वगैरे ...

अशी चाचपणी असेलही. येत्या निवडणूकां मध्येही वोटींग SMS द्वारे करण्याची मुभा असावी उगा चालायचे कष्ट कोण घेणार? वागळे ,अण्णा हजारे आणि गँगने अशी एक मागणी लावून धरली पाहिजे.

In reply to by विकास

नाय हो.... पूज्य नथुराम’जी’ गोडसे. त्यांनी गांधी महान असल्याचे सर्टिफाय केले होते असे ऐकून आहे. [त्यांना आधुनिक भारताचे दधिची ही उपाधी मराठीतले श्रेष्ठ नाटककार दळवी यांनी दिल्याचे समजते]

In reply to by नितिन थत्ते

[त्यांना आधुनिक भारताचे दधिची ही उपाधी मराठीतले श्रेष्ठ नाटककार दळवी यांनी दिल्याचे समजते] खुलाशाबद्दल धन्यवाद! बाकी आपण प्रदीप दळवींचे फॅन दिसताहात! ;)

In reply to by विकास

१. तुम्हाला नेहरू हे आधुनिक भारताचे दधिची वाटतात का? - आधिनिक भारताचे दधिची म्हटल्यावर म्हणजे नेहरू का? असं तुम्ही विचारलं म्हणून हा प्रश्न. २. गांधी महान आहेत हा जावैशोध नेहरूंनी लावला असं तुम्हाला वाटतं का? असो.

In reply to by नितिन थत्ते

तुम्हाला नेहरू हे आधुनिक भारताचे दधिची वाटतात का? नेहरूंना अधुनिक भारत कसा असावा याबद्दलचे प्रामाणिक vision होते, जे त्यांचे विरोधक देखील नाकारणार नाहीत. पंतप्रधान झाल्यावर अधिकृत नेतृत्व म्हणून नेहरूंनी अनेक प्रकल्प चालू केले ज्यातून अधुनिक भारत घडू लागला. त्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांनी हाडाची काडे केली असे म्हणणे अतिशयोक्तीपर ठरणार नाही. म्हणून अधुनिक भारताचे दधिची म्हणणे काही गैर ठरणार नाही. आधिनिक भारताचे दधिची म्हटल्यावर म्हणजे नेहरू का? असं तुम्ही विचारलं म्हणून हा प्रश्न. तुमचा नेहरूंबद्दलचा अभ्यास आणि आदर लक्षात घेता, तसेच काही असू शकेल असे वाटले. गांधी महान आहेत हा जावैशोध नेहरूंनी लावला असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न ज्या मूळ प्रतिसादात होता, त्यातील "जावई शोध" वाक्प्रयोग मला तो पटला नाही आणि उपहास आहे म्हणून मी सोडून दिला होता.

जी हे विशेषण नथुराम ला ? ते तर ओसामाचे विषेशण ना ?

जी हे विशेषण नथुराम ला ? ते तर ओसामाचे विषेशण ना ?