✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नियती ? नाय नाय टेंपोवरती!

स
संजय क्षीरसागर यांनी
Tue, 06/05/2012 - 17:23  ·  लेख
लेख
प्रेरणा : नियती ( http://www.misalpav.com/node/21857) रक्ताळलेल्या प्रार्थना या अत्यंत प्रभावी कवितेतून इथे पदार्पण करणार्‍या हजाक या कविश्रेष्ठांची ही दुसरी कविता नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते? या प्रश्नाला कविवर्यांनी "भळभळती वेदना कुठल्याही साच्याचा भाग बनु शकत नाही" असं उत्तर दिल्यानं आता वाचकांना अजून कायकाय सहन करावं लागणाराये याचा अंदाज येऊ शकतो. "इतरांचा विचार करावा की नाही याबद्दल काय वाटतं, का जाऊं द्या सगळे बाराच्या भावात?" यावर त्यांनी "इतरांचा विचार करुन लेखन केलं तर नवं काही देता येईल का?" असा प्रतिप्रश्न करून आम्हाला निरूत्तर केलय! तर आता ही कविता: कविनं जीवंतपणीच स्वत:ची अंतयात्रा काढली आहे त्यामुळे शेवट जरी : >आणि चालताना सोबत असते फक्त एक न संपणारी शवयात्रा असा दारुण असला तरी भळभळती वेदना समजल्याशिवाय गत्यंतर नाही. सुरुवात पाहा : >कधी कधी, सैरभैर, प्रश्नांकित होऊन, शरिर स्वतःला हरवुन बसतं गर्दीत लहान मुलासारखं "हुकलेला" या शब्दाचं हे काव्यात्मक वर्णन वाटत असेल तर "गंडलेला" म्हणजे काय हा प्रश्न वाचकांना पडणार हे ओळखून कविनं पुढे लिहिलय : >आणि कधी आपण मनाला हरवु देतो कधीकधी वेगळं जगता यावं म्हणुनसुद्धा.... आता अशा परिस्थितीत कर्मालाच (सॉरी नियतीला) दोष जातो, हो की नाही ? एकदम बरोब्बर ओळखलत! >पण नियती कधीच हरवुन बसत नाही स्वतःला ती आंधळ्या डोळ्यांनी नी बांधलेल्या हाताने धापा टाकत, मूकपणे चालत रहाते. आता अशा अवस्थेत गप घरी बसायला हवं ना? पण नाही, मूकपणे चालयच. आता "भंजाळल्यासारखं" म्हणजे काय? हा प्रश्न ओघानं येणारच, त्यावर कविराज म्हणतात: तिच्यात सापळ्याआड धडधडणारं असं काहीच नसतं. कुण्याच्याही स्पर्शाने उभे रहाणारे किंवा सुटणारे प्रश्न नसतात. म्हणजे एक वेळ पेशवे परवडले पण हे नाही झेपत म्हणायची वेळ आली असं म्हणायच का? तर नाही अजून पुढची वेदनेची कळ यायचीये : भंगणारी आकांक्षा, फाटलेलं ह्र्दय शोकाचे सुर पश्चातापाचे निश्वास जखमा आणि सारं काही असतं शवपेटीत बंद आता ही शवपेटी टेंपोवर ठेवली म्हणजे "न संपणारी शवयात्रा" व्यवस्थित मार्गस्थ होईल असं वाटत असलं तरी कवि आपला हट्ट सोडणार नाही, तो निरागसपणे विचारेल "हा टेंपो कुठे मिळेल हो?"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
देशांतर
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत

प्रतिक्रिया द्या
2531 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

आप्रतिम विरुपण

जोयबोय
Wed, 06/06/2012 - 14:46 नवीन
संजय राव सलाम, ़ज्या कवितेचा अर्थ लावता लावता नाकी नऊ आले तत्याचे तुम्ही सोप्या भाषेत अर्थबोध करून दीला त्याबद्दल अभार
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 06/06/2012 - 18:16 नवीन
एक नंबर रसग्रहण!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा