✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शार्दूलविक्रीडित

र — राजघराणं, Mon, 06/04/2012 - 17:40
(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे. त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.) कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित वृत्त : शार्दूलविक्रीडित कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ. धाडसाचे वारे वाहत होते. वृद्ध झाडे जोर जोरात हलत होती. ठिणग्या उडत होत्या ... वणवा पेटणार होता.. अशाच एका ठिणगीकडे सिंहाच्या एका छाव्याची नजर गेली. आणी मग ...... वारे वाहत धाडसी धडधडे ; कल्लोळ ज्वालाग्रही झाडे घासत ही परस्पर उडे ; तो जाळ भूमीवरी सिंहाचा सुकुमार पुत्र अवघा ; झेपावला त्यावरी खेळाया गवसे पहाच भलते ; शार्दूल क्रीडा करी. ॥ छावा त्या विस्तवास खेळ समजी ; जाळात घेई उडी दाहाची न मला क्षिती उब हवी ; गर्जोन ऐसे कथी छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥ अंगारा सम नेत्र जाळच नखे ; हा पोत पंजा बने जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे वाटे तो नर स्वाभिमान जळता ; आगीस वाटे जनी ज्वाला चित्त बने शरीर जळते ; आत्माच यज्ञाहुती ॥ पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥ ही शार्दूल मशाल जाळ जळती ; धावे वनी वाटण्या आत्म्यातील जहाल तेज दिधण्या ; रानातल्या बांधवा साक्षात्कार ज्वलंततेच मधला ; सर्वांस दर्शावण्या आत्मा ना बनतो ज्वलंत कधिही ; दाहास घेण्याविना ॥ चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥ सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ? शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ? ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥ येता एक झुळुक चंदनमयी; मंत्रावली राख ही राखेतून पुनः उठेल उडण्या ; शार्दूल पेटोनिया निद्रेचा लखलाभ होत घुबडा ; शार्दूल जागा खडा रजेही घुबडे असोत वनिची शार्दूल नेता खरा . . . . . . . . झेपावेल सदा अवध्य नर तो ; शार्दूल क्रीडा पहा ॥ अभिराम दीक्षित. श्रीलंका २००५

प्रतिक्रिया द्या
18250 वाचन

💬 प्रतिसाद (54)

राजघराण साहेब, अप्रतिम व निव्वळ लाजवाब.

निश
Mon, 06/04/2012 - 17:47 नवीन
राजघराण साहेब, अप्रतिम व निव्वळ लाजवाब. शार्दूलविक्रीडितचा तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे माहीत करुन दिल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार. व चित्र एकदम जिवंत वाटता हेत. सुंदर.
  • Log in or register to post comments

कविता वगैरे नंतर... पहिला

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/04/2012 - 17:58 नवीन
कविता वगैरे नंतर... पहिला सलाम या चित्रांनाच.... Image removed.
  • Log in or register to post comments

कवी अभिराम दीक्षित . श्रीलंका

स्पंदना
Mon, 06/04/2012 - 18:05 नवीन
कवी अभिराम दीक्षित . श्रीलंका २००५?? प्रभाकरनवर लिहिल आहे का? की श्रीलंकेच ध्वजचिन्ह सिंह, यावर आहे ही कविता? बाकि इतक सुंदर काव्य अन इतक वृत्त धरुन लिहिण ...मति गुंग झाली. इतक च्छान काव्य इथ पोहोचवल्या बद्दल धन्यवाद राजघराण साहेब. अन त्याबरोबरची चित्र तर लाजवाब!
  • Log in or register to post comments

काव्य सुंदर!

पैसा
Mon, 06/04/2012 - 18:09 नवीन
काव्य आणि सोबतची चित्रे सगळंच फार सुंदर! अपर्णा, अभिराम दीक्षित म्हणजेच राजघराणं!!
  • Log in or register to post comments

गद्य लेखन टोपणनावाने .....

राजघराणं
Mon, 06/04/2012 - 18:17 नवीन
कवितेवरचा हक्क सोडवत नै हो तै :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झाल.

स्पंदना
Mon, 06/04/2012 - 18:44 नवीन
आधी ठाउक असत तर एव्हढी तारीफ नसती केली. उगा छान प्रयत्न वग्गैरे म्हंटल असत. पण काही म्हणा अतिशय सुरेख . आता सांगा कविता कुणावर आहे, की खरच शार्दुलावर आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भन्नाट.

प्रचेतस
Mon, 06/04/2012 - 18:17 नवीन
भन्नाट.
  • Log in or register to post comments

जाणे तो अभिराम दीक्षित करू सारे असे नेटके

नरेंद्र गोळे
Mon, 06/04/2012 - 18:26 नवीन
वा! अभिराम सुरेख!! कविता आवडली. मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा छाव्याचे हृदि काय ते उमजणे, हे ना असे खेळणे शार्दूलासम वन्हिला डिवचणे, हे ना मुळातच उणे भासावा वणवा खराच भडके, तैसे दिसे दृश्य हे जाणे तो अभिराम दीक्षित करू सारे असे नेटके
  • Log in or register to post comments

स्तब्ध !

चौकटराजा
Mon, 06/04/2012 - 18:32 नवीन
शार्दूल विक्रिडित मधे काव्य करणे यासाठी चार अक्षरी व तीन अक्षरी शब्दांचा मोठा साठा डोक्यात असावा लागतो. सबब यात लिहिणे तसे सोपे नाही. तेंव्हा प्रथम कवि राजास मानवंदना ! आणि कल्पकतेपलीकडील चित्रे जोडीला. कशाला जास्त चांगले आहे असे म्हणावे हे कळत नाही ! स्तब्ध ! Image removed.
  • Log in or register to post comments

आप्रतिम! फारच छान जमून आले

श्रीरंग
Mon, 06/04/2012 - 18:35 नवीन
आप्रतिम! फारच छान जमून आले आहे! :)
  • Log in or register to post comments

सुरेख !!!!!!!!

नाना चेंगट
Mon, 06/04/2012 - 18:41 नवीन
सुरेख !!!!!!!!
  • Log in or register to post comments

आहे वृत्त विशाल त्यास म्हणती

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 18:58 नवीन
आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित | पैं हे वृत्त कवींस सर्वसमयी साचे करे पीडित| त्याच्या आवळुनी समस्त मुसक्या जे हिंडवीले तया| खासा डौलचि केसरीगतिचिया रे दीक्षितांच्या अभ्या** || **वृत्तरचनेच्या बंधनामुळे असे संबोधन वापरले आहे, तदुपरि लेखकाचिया कवण्याही हेतुचेया उपसर्गू जाहला नसे हे आत्ताचि नमूद करोन ठेवितो. बाकी सेतुमाधवराव पगडींच्या आत्मचरित्रात एक मजेशीर कविता त्यांनी उद्धृत केलीये(मूळ कवीचे नाव विसरलो, कविता जशी/जेवढी आठवली तेवढी दिली आहे). वृत्तांचे तप आचरी निशिदिनी -------- ------------------------------------ (कुणी एक कवी कायम वृत्तबद्ध कविता करायचा हा इत्यर्थ) (एकदा काय झाले) आप्ते पत्र लिहूनि एक घरुनी, त्याच्याकडे धाडिले| काही वृत्त अलीकडे न कळले,-------------| चिंता घोरचि लागली बहु अम्हां, झालो पुरे पीडित| त्याचे उत्तर हा लगेच कळवी, शार्दूलविक्रीडित!!!!
  • Log in or register to post comments

रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ?

राजघराणं
Tue, 06/05/2012 - 16:51 नवीन
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी| वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां|| विदुषक उवाच : रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ? ओढूका शेपटीस खेचुनी दिवा दाव्वीन तुला अता ॥ (हसण्यावारी घ्यावे - केवळ जुगलबंदी आहे. :-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दुसर्‍या ओळीत एक सुधारणा: ओढू

बॅटमॅन
Tue, 06/05/2012 - 18:24 नवीन
दुसर्‍या ओळीत एक सुधारणा: ओढू का तव चर्म** खेचुनि तुला नेतो दिव्याशी चला| **वटवाघळाला शेपटी नसते आणि त्याचे पंख हे पिसांचे नसून कातड्याचे बनलेले असतात. आता यावर प्रत्युत्तरः हा हा! गॉथमराज मी, मज कसे आव्हान देशी असे | मी आहे जरि येकुटा तरि तुला मी धाकुटा पैं नसे | जल्दीने तव ही विदूषकगिरी त्वां थांबवी ते बरे | नस्तां वल्गुदक्रोधवन्हि तुजला जाळील हेची खरे || येता वीस जुलै, थिएटरिं पहा संघर्षगाथा खरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

दोघांचीही जुगलबंदी लै भारी.

प्रचेतस
Tue, 06/05/2012 - 18:52 नवीन
दोघांचीही जुगलबंदी लै भारी. :) २० जुलैच्या संघर्षगाथेत विदुषक नसून बेन आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो बॅटमॅन यालाच तर '

जेनी...
Tue, 06/05/2012 - 19:16 नवीन
अहो बॅटमॅन यालाच तर ' शार्दुलविक्रिडित म्हणतात ..:( अलंकारिक भाषेत आहे त्यापेक्षा चढवुन ,नसलेल्या गोष्टिंचा आव आणुन बोलण . मला तर एवढच कळतय . बाकि आपण जास्त ज्ञानी आहात :)....( पाजळवा ) :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दुष्टारी पुरता भारी | अवतरला

राजघराणं
Tue, 06/05/2012 - 20:11 नवीन
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी| वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां|| विदुषक उवाच : रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ? ओढू का तव चर्म खेचुनि तुला नेतो दिव्याशी चला| वाग्लुदेय उवाच : हा हा! गॉथमराज मी, मज कसे आव्हान देशी असे | मी आहे जरि येकुटा तरि तुला मी धाकुटा पैं नसे | जल्दीने तव ही विदूषकगिरी त्वां थांबवी ते बरे | नस्तां वल्गुदक्रोधवन्हि तुजला जाळील हेची खरे || विदूषक उवाच ही ही! गॉथम पुत्र मानवच चांडाळासवे गाठ रे। ही जाती असते तुझी स्खलनशाली मात्र ध्यानी रहे । ऐ वाल्ग्या भय भूक मैथुन धर्मी कीडे कुत्रे जाण रे । मानव्यास हवा विदूषक गुन्हेगारी हवी मानवे ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ वल्ली: मुद्दा नोंदविला

बॅटमॅन
Tue, 06/05/2012 - 23:06 नवीन
@ वल्ली: मुद्दा नोंदविला युरॉनर मनीं, टंकोनि थँकीतसे ;) @पूजा पवारः हल्के घ्या, बघताय ना कितिकसा घेतो कुणी ताण ते :) वाल्गुदेय उवाच भेटू लौकरि गॉथमात इथल्या मत् होम ग्रौंडावरी | चिंता तू न करी तुला झडकरी धाडीन फासावरी | किंवा आर्खम नाम त्या भयपरी कारागृहीं सत्वरी | थांबे तैंचि पुरी विदूषकगिरी या गॉथमीं शाहरी || पेंग्विन् बेन विदूषकू रिडलरू, टू फेस हे सर्वही | आय्व्ही ती विष घेवुनी बघ सवे आहे सदा सज्जही | सर्वांसी पुरुनी उरे, परि झुरे, बॅट्मॅन तो येकटा | वेन ब्रूस असोनिही जणु नसे , हे जाणितो येकटा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

मालक

रमताराम
Mon, 06/04/2012 - 19:02 नवीन
तुमचे पाय कुठे आहेत हो, करा इकडे जरा. _/\_. प्रचंड आवडली. भाषेवरचे प्रभुत्व अचाट आहे हो. आणि छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥ शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ? ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥ टोपी काढली आहे. एकदोन लहानशा गोष्टी: शार्दुल या शब्दात पहिला उकार आहे. तुमच्या कवितेत मात्रांचे तंत्र (आम्हाला त्यात शष्प कळत नाही) बिघडत नसेल तर बदल करायला हरकत नसावी. पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी हवी ऐवजी हवि हा शब्द हवा. दीर्घ ईकारान्त शब्दाचा अर्थ वेगळा असल्याने इथे कविचे स्वातंत्र्य जरा गोंधळात पाडणारे होते आहे. जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे जिव्हेची जणू.... असा बदल समर्पक वाटतोय का नि वृत्तात बसतोय का पहा. दादानुं, कं लिवलंय कं लिवलंय तुमी. एरवी कवितेकडे ढुंकून न पाहणार्‍या माझ्यासारख्याला गद्य माणसाला इतकी बारकाईने वाचायला लावलीत हेच मोठे श्रेय कवितेचे. रच्याकने इतकी समर्पक चित्रे कुठून मिळवलीत हो? (की तुम्हीच काढली आहेत? मग ही कलाही येऊ द्या की समोर.)
  • Log in or register to post comments

शार्दूल हाच योग्य

मनमेघ
Fri, 12/25/2015 - 06:21 नवीन
ररा, शार्दूल हाच बरोबर शब्द आहे. बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

जबरद्स्तच, लहानपणापासुन या

५० फक्त
Mon, 06/04/2012 - 19:26 नवीन
जबरद्स्तच, लहानपणापासुन या वृत्ताचे आकर्षण आहेच, आज त्यात अजुन भर पडली.
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/04/2012 - 19:26 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments

सुपर्ब डॉक्टर ..... डोळ्यांच

जेनी...
Mon, 06/04/2012 - 19:30 नवीन
सुपर्ब डॉक्टर ..... डोळ्यांच पारण वैग्रे .....मस्तच
  • Log in or register to post comments

मस्तच!

मराठे
Mon, 06/04/2012 - 21:54 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

सुपर डुपर हिट

jaypal
Mon, 06/04/2012 - 22:49 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख!

पिवळा डांबिस
Mon, 06/04/2012 - 23:55 नवीन
चित्रे सुरेख, काव्य तर त्याहून सुरेख! आणखी शब्द वापरून वाचनानुभव डागाळत नाही. जियो!!!!!
  • Log in or register to post comments

लाजवाब

नंदन
Tue, 06/05/2012 - 00:03 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

अभिराम, सुरेख!

संजय क्षीरसागर
Tue, 06/05/2012 - 01:16 नवीन
दादानु, असाच लिहित राहा! तो हरणाचा फोटो अफलातून आहे
  • Log in or register to post comments

मासाजातताग येती गण हे शार्दुलविक्रिडितं

अमृत
Tue, 06/05/2012 - 09:27 नवीन
काव्य आणि छायाचित्रे दोन्ही मस्त.. अमृत
  • Log in or register to post comments

मस्त लिहीले आहे. एक शंका:

स्वानन्द
Tue, 06/05/2012 - 09:31 नवीन
मस्त लिहीले आहे. एक शंका: शार्दुल म्हणजे वाघ ना?
  • Log in or register to post comments

नाहि

राजघराणं
Tue, 06/05/2012 - 12:28 नवीन
शार्दुल म्हणजे सिंह अथवा वाघ थोड सैलपणे वापरलं जातं http://spokensanskrit.de/index.php?tinput=lion&direction=ES&script=&link=yes
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

छान माहिती..

अक्षया
Tue, 06/05/2012 - 09:43 नवीन
सुंदर माहिती, कविता आणि चित्रे.. शाळेत अक्षरगणवृत्त शिकली त्याची आठवण झाली..:)
  • Log in or register to post comments

खूप मस्त फटु नी कविता देखील

प्यारे१
Tue, 06/05/2012 - 10:44 नवीन
खूप मस्त फटु नी कविता देखील ...! एकदम 'सिंघम' आठवला. ;)
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Tue, 06/05/2012 - 11:28 नवीन
सुंदर कविता. :)
  • Log in or register to post comments

कविता छान , मला २ न. चित्र

पियुशा
Tue, 06/05/2012 - 11:28 नवीन
कविता छान , मला २ न. चित्र फारफार आवडल :)
  • Log in or register to post comments

चित्र आणि शब्दांचा अद्भुत

मृत्युन्जय
Tue, 06/05/2012 - 13:21 नवीन
चित्र आणि शब्दांचा अद्भुत मिलाप. लाजवाब.
  • Log in or register to post comments

पायाचाही फोटो टाका!

ऋषिकेश
Tue, 06/05/2012 - 13:37 नवीन
पायाचाही फोटो टाका! __/\__ अप्रतिम रचना!
  • Log in or register to post comments

+१

मेघवेडा
Wed, 06/06/2012 - 14:20 नवीन
सुरेख जमली आहे!
सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?
या ओळी विशेष आवडल्या. वृत्तावरची पकड वाखाणण्याजोगी आहे मालक. आणखी येऊ द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सहमत

आगाऊ म्हादया......
गुरुवार, 12/24/2015 - 10:07 नवीन
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अप्रतिम__/\__

प्रीत-मोहर
Tue, 06/05/2012 - 13:43 नवीन
अप्रतिम__/\__
  • Log in or register to post comments

वा क्या बात है

प्रकाश घाटपांडे
Tue, 06/05/2012 - 13:51 नवीन
शब्द व चित्र याचा सुरेख संगम.
  • Log in or register to post comments

पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ;

मनीषा
Tue, 06/05/2012 - 16:12 नवीन
पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥ अप्रतिम ..! वृत्तबद्ध , चित्रमय काव्य .
  • Log in or register to post comments

चीं चित्कार उठे नभात - गगनी ;

मृगनयनी
Tue, 06/05/2012 - 19:08 नवीन
चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥ ज ब र द स्त !!!!!!!..... अप्रतिम!!!!!!!! आज हाही पैलू पाहायला मिळाला!!!! :)
  • Log in or register to post comments

भन्नाट..

चिगो
Tue, 06/05/2012 - 19:44 नवीन
भन्नाट कविता आणि चित्रे.. एक सुंदर काव्यानुभव देण्यासाठी धन्यवाद..
  • Log in or register to post comments

सुंदर...

सुमीत भातखंडे
Tue, 06/05/2012 - 20:44 नवीन
काव्य आणि चित्रे दोन्ही छान!
  • Log in or register to post comments

मस्त जमुन आलय... छान..

शैलेन्द्र
Tue, 06/05/2012 - 22:12 नवीन
मस्त जमुन आलय... छान.. :)
  • Log in or register to post comments

ते राहू द्या हो सगळा.....खूप

आगाऊ म्हादया......
Wed, 06/06/2012 - 09:48 नवीन
ते राहू द्या हो सगळा..... खूप मस्त आहे कविता!!!!! _________________________________________________________________ _________________________________________________________________
  • Log in or register to post comments

कसं काय जमतं

आगाऊ म्हादया......
Wed, 06/06/2012 - 10:10 नवीन
कसं काय जमतं राव......!!!! आयुष्यात एक छान कविता जमली तर घर डोक्यावर घेऊन नाचेन मी!!!!!!!!!! _____________________________________________________-- _______________________________________________________-
  • Log in or register to post comments

चित्र-काव्य आवडले. अप्रतिम

विदेश
Wed, 06/06/2012 - 18:02 नवीन
चित्र-काव्य आवडले. अप्रतिम ! फक्त एवढीच ओळ खटकली.. पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी "वृक्ष"च्या ऐवजी " तरु " असते तर ?
  • Log in or register to post comments

रैट्ट यू आर सार! वृत्ताच्या

बॅटमॅन
Wed, 06/06/2012 - 18:16 नवीन
रैट्ट यू आर सार! वृत्ताच्या चालीप्रमाणे हेच्च बरोबर है :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदेश
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा